धुके गैरसमजाचे हे विरत जावे
पहाटेचे स्वप्नं आता सरत जावे
मनी मी सतत तुलाच आठवावे
तुच माझे जीवन व्यापुन टाकावे
उमेदीने आज परत एकदा हसावे
दु:खानेही मग हास्यामागेच दडावे
प्रेमभऱ्या नजरेने तु मजकडे पहावे
जीवनही पुन्हा छान बहरून जावे
आज पुन्हा गीत नवे सुंदरसे गावे
जीवनच जणु हे संगीतमय व्हावे
तुझ्या साथीने मीही पुन्हा फुलावे
संसाराने अवघ्या सोन्याचे व्हावे
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
व्वा.... खुपच सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर रचना मॅडम... सकारात्मक विचार लिहिले!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवामनापासून धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवावाह छान
उत्तर द्याहटवाखुप छान रचना 👌👌
उत्तर द्याहटवावाह छान 👌🏻👌🏻🍧
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवा