माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, ३० जानेवारी, २०२२

प्रयत्नं

करावा प्रयत्नं
मानु नये हार
कष्टांनी तुमच्या
यश लाभणार

करा मेहनत
यश प्राप्तीसाठी
जपा स्वाभिमान
तुम्ही स्वत:साठी

लाभेल ईश्वर
ह्याच प्रयत्नांती
करता प्रयत्नं
होईल प्रगती

ही परीश्रमाची
जोड प्रयत्नांस
खात्री वाटे मग
यशाची मनास

ठेवा जीवनात
सकारात्मकता
नांदेल मनात
तुमच्या शांतता

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
 ३१ जानेवारी २०२२

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

हे गीत गाऊया ( बाणाक्षरी )

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तिरंग्याचा असे खुप अभिमान
देशासाठी देऊ वेळप्रसंगी प्राण
देशभक्ती हेच जगण्याच कारणं
राखु भारतीय संस्कृतीचा मान
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
रक्षा करण्यास देशाची
सैनिक लढती जोमाने
रक्षा मग त्यांच्या देहाची
मस्तकी लावुया गर्वाने
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳बाणाक्षरी🇮🇳🇮🇳         
        हे 
       गीत
     गाऊया
   देशभक्ती
  मनी वाढवू
आपण मिळुनी
भारत मातेप्रती
      वंदन
      मातेला
      करुया
      सारेच
      महत्व
      जाणुया
       क्रांतीचे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
२६ जानेवारी २०२२

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

आयुष्याच्या चित्रपटातील आपण कलाकार ( द्रोणकाव्य )

आयुष्याच्या चित्रपटातील आपण कलाकार
   सुख-दुःखाच्या भुमीका सदैव वठवणार
      संकटांशी लढताना कधी न हरणार
     ज्योत सकारात्मकतेची मनी जळणार
       भूमीका आपली चोख साकारणार
          संकटातही कधी न खचणारं
           अडचणीत धीरही देणार
             जीवननाट्यात रमणार
              न्याय भूमिकेस देणार
                जिवंत भासवणार
               भुमीकाही स्वत:ची
                ‌    सुरेख होणार
                    हा आविष्कार
                       लाभणार
                        आनंद
                         खास
                           हा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

२३ जानेवारी २०२२

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

कहाणी तिच्या जिद्दीची..!!

" राष्ट्रीय कन्यादिनानिमीत्त खास कथा "

👩🌹👩♥️🙏🧚🏻‍♀️♥️🙏👩🌹👩

             आपल्या एसी गाडीत बसून आजूबाजूचं निसर्गसौंदर्य पाहत आपली आवडती गाणी ऐकत श्रेयाचा प्रवास चालू होता...!!

               कोण होती श्रेया...??

             श्रेया सबनीस...!!

     एक प्रथितयश माॅडेल , बालीवूडवर अधिराज्य गाजवणारी आघाडीची नटी , माजी विश्वसुंदरी , आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सौंर्दयाची खाणं...!!

         तिचं सौंदर्य शब्दात वर्णन करणं तसं कठीणच...!!
आज काय नव्हतं तिच्याकडे. सर्वसामान्य माणूस ज्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही , अशा सर्व अत्याधुनिक महागड्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या तिच्याकडे...!!

        प्रॉपर्टी , बँक बॅलन्स यांची तर गिणतीचं करणं सोडलं होतं तिने आता...!!

        आपल्या गाडीत मनपसंत गाणी ऐकत प्रवास करत असताना ..., "  मॅम , ईथे थांबायचं का जेवण्यासाठी ??"
अचानक आलेल्या ड्रायव्हरच्या आवाजाने श्रेया भानावर आली. ( एका सप्त तारांकित /७ स्टार हॉटेल समोर ड्रायव्हरने गाडी थांबवून विचारलं होतं...!!)

         पण श्रेयाने निघतानाच नाष्टा केलेला असल्याने , तसेचं ती डायटिंग करत असल्याने ती ठराविक वेळेवरचं जेवण करत असायची. म्हणून तिने ड्रायव्हरला पैसे देऊन जेवून येण्यास सांगितले व स्वत: गाडीतचं थांबली. ( आधी तर , ड्रायव्हरने पैसे घेण्यास नकार दिला ,पण श्रेयाच्या आग्रहापुढे त्याचे काही चालले नाही , त्यामुळे तो जेवण्यास निघून गेला.)

         श्रेया एकटिच गाडीत बसून होती. गाणे ऐकून कंटाळा आला असल्याने, तिने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. ईतक्यात गाडीच्या बंद असणारा काचेवर टकटक झाली. तिने व्हिडिओ बघताना डिस्टर्ब झालं म्हणून थोडसं चिडून बाहेर पाहिलं असता , बाहेर एक लहान मुलगी होती , जी पुस्तकं विकत होती....!!

         श्रेयाला वाचनाचा छंद असला तरी पुस्तक वाचण्यास  हवा तसा निवांत वेळ मिळत नसायचा, पण तरी तिने ती सर्व पुस्तकं विकत घेण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांची किंमतही न विचारता तिने त्या मुलीकडील सर्व पुस्तकं विकत घेतली व तिला पाच हजार रुपये देऊ केले. ती मुलगी आश्चर्यचकित होऊन म्हणाली ,
" दिदी एवढे पैसै , ह्या सर्व पुस्तकांची किंमत मिळून २००० /- रू. च्या आसपास असेल , तेवढेच पैसै द्या मला. " 

      मुलीचा प्रामाणिकपणा खुप भावला श्रेयाला , व त्या गरीब पण स्वाभिमानी मुलीचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून श्रेया तिला म्हणाली....,

          " बरोबर आहे बच्चा तुझं , पण काय आहे ना तु मला दिदी बोललीस ना, मग दिदीच ऐकणार नाही का?? , २००० रू./- तुझ्या पुस्तकांचे आणी उरलेल्या पैशांत तुझ्यासाठी छान कपडे , खाऊ , खेळणी घे. मीचं आले असते तुझ्यासोबत शाॅपिंगला पण... , मला आता जायचं आहे ना लगेचचं , म्हणून हे पैसे दिले तुला , गैरसमज करून घेऊ नकोस ग बाळा...!!"

        श्रेयाच्या या प्रेमळ शब्दांनी ती मुलगी खूप भारावून गेली व " धन्यवाद ताई "असं म्हणून हसत-नाचतचं निघून गेली.

        ती मुलगी आली तशी गेली पण श्रेया मात्र विचारात हरवून गेली . त्या मुलीत ती जणू स्वत:ला पाहत होती...!!

        हो स्वत : लाच....!! 

     श्रेयाचं लहानपण खूप हलाखीत गेलं होतं. तिच्या आईचा प्रेमविवाह झालेला होता , तोही एका मुस्लिम तरुणाशी. तिची आई हिंदुधर्मीय होती तर वडील मुस्लिम असल्याने त्यांच्या लग्नाला विरोध झाला होता , पण तरीही श्रेयाच्या आईने घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने माहेरचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद झाले होते. शिवाय ती अस्लमची तिसरी बायको आहे हे सुद्धा तिला लग्नानंतरचं समजलं होतं .

      आपण केलेल्या कृत्याचा श्रेयाच्या आईला पश्र्चाताप होतं असला तरी आता काय उपयोग होता या सगळ्याचा...!!

     म्हणून श्रेयाची आई अस्लमच्या मुस्लीम बायकांकडून , सासू- सासर्यांकडून होणारा छळ सोसत जिद्दीने तिथेच राहीली होती , कारण अस्लम मात्र , तिच्याशी चांगलं वागत होता..!!

      मग अश्याच परीस्थितीत श्रेयाचा व तिच्या भावाचा जन्म झाला व प्राॅपर्टीवरुन घरात वाद सुरू झाला. श्रेयाच्या  आईवर  तिच्या वडीलांच्या दुसऱ्या बायकांकरवी प्राणघातक हल्ला झाला व तिला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले , तिचे वडील अशा प्रसंगी श्रेया व तिच्या भावाची साथ न देता आपल्याला अटक होईल या भितीने फरार झाले...!!

      आईचा इलाज करण्यासाठी ही त्या भावंडाजवळ पैसा नव्हता , खुप भयानक प्रसंग ओढवला होता श्रेया व तिच्या भावावर....!!

      आईवर उपचार करण्यासाठी त्यांना लोकांकडून भिक मागावी लागली , काही दयाळू लोकांनी मिळून त्या भावंडांची मदत केली व श्रेयाच्या आईचा उपचार झाला पण तरीही श्रेयाच्या आईला काही महीने बेड रेस्ट करण्यास सांगितले गेले होते....!!

     अश्या परीस्थितीत श्रेयाने हार न मानता ती जीद्दीने उभी राहिली , आपला घरखर्च चालवण्यासाठी ती शिक्षणाला रामराम ठोकून धुण्याभांड्याची , साफसफाईची कामे करू लागली. तिचा भाऊ एका कुल्फीवाल्याला त्याच्या कामात मदत करत असे. असे करुन ती भावंडं जिद्दीने घरखर्चाचा गाडा हाकत होते. मग नंतर श्रेयाची आई आजारातून पुर्ण बरी झाली व घराची सुत्र तिने आपल्या ताब्यात घेतली. आता त्यांनी पशूपालन / दुग्धव्यवसाय करण्यास सुरुवात केली व त्यांची परीस्थिती थोडीशी सुधारली.

        ते ज्या परीसरात राहत होते त्या परीसरात श्रेया व तिच्या भावाचं गुणगान गायलं जाऊ लागलं. तिच्या वडीलांना त्यांच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं, त्यामुळे मग तेही श्रेयाच्या आईकडे परत आले व श्रेयाच्या आईनेही मोठे मन करून , हिंदू संस्कृतीनुसार कुंकवाच्या धन्याला माफ केलं व घरात स्थान दिलं....!!

        असेचं दिवस जात होते, कधी चांगले तर कधी वाईट पण , एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे ते सर्व एकत्र होते.
असेच एक दिवस शेजारील काकूंनी त्यांच्या मुलीचा फोटो काढत असताना, श्रेयाला बरोबर येण्याचा आग्रह केला व  आपल्या मुलीबरोबर श्रेयाचेही काही फोटो काढण्यास फोटोग्राफरला सांगितलं व तिथेच तिचं नशीब पालटलं...!!

        तिचा फोटो खुप सुंदर आला व त्यामुळे त्या फोटोग्राफरने तो फोटो त्यांच्या मॅक्झिनमध्ये छापण्यास देऊ का ?? अशी विचारणा तिच्याकडे केली...!!

       हाच तो क्षण होता जेव्हा श्रेयाला समजलं , कि ती किती   सुंदर दिसते. मग श्रेयाने मनाशी काहीतरी ठरवलं व तिने आपलं गाव सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला...!!

        तशी हीरोइन बनण्याची इच्छा तिला लहानपणापासूनच होती , पण आता फोटोग्राफरच्या कौतुकामुळे त्याला खतपाणी मिळालं होतं . तिच्या आई-वडिलांचा तिला एकटीला शहरात पाठवण्यास विरोध होता. त्यामुळे एक दिवस अंगावरील कपड्यांनिशी व तुटपुंज्या पैशांसह श्रेया मुंबईला पळून आली.

         पण स्वप्ननगरी मुंबईत आल्यावर मात्र , तिला खरी परिस्थिती समजली व पश्र्चातापही होऊ लागला. पण ती हार मानणाऱ्यांतली नव्हतीचं....!!

      तिने दिवस-रात्र संघर्ष केला.अगदी रेल्वे स्टेशनवर झोपून व रेल्वे स्टेशन वरील स्वच्छतागृहात आंघोळ करून , वेळप्रसंगी वडापाव खाऊन दिवस काढू लागली. तिला कळालं की तिच्या सारख्या अनेक मुली येथे हीरोइन बनण्यासाठी आल्या आहेत , रोजचं येतात....!!

          तिने खूप संघर्ष केला , खूप हलाखीत दिवस काढले . तिला अनेक वाईट अनुभवही आले पण त्या प्रत्येक अनुभवातून ती शिकत गेली , घडत गेली. तिच्या घरच्यांनी असा समज करून घेतला होता की ती कोणत्यातरी मुलाबरोबर पळून गेली...!! 

     तिच्या खऱ्या परिस्थितीबद्दल फक्त तिच्या भावाला माहित होतं , पण तिने भावाला आपल्या आई-वडिलांना काही सांगण्यास मनाई केली होती.

    मुंबईत कधी उपाशीपोटी राहून , कधी वडापाव खाऊन तर कधी नुसतंच पाणी पिऊन ती दिवस काढत होती. प्रत्येक दिवस भलाबुरा अनुभव घेऊन येत होता. तिचं व्यक्तिमत्व घडवण्यात मदत करत होता आणखी शेवटी तिने एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला व तिच्या नशिबाने पुन्हा एकदा कलाटणी मारली. ती त्या स्पर्धेत पहीली आली व नंतर तिने विश्वसुंदरीचा किताबही आपल्या माथ्यावर आणून बसवला...!!
    त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर येणं सुरु झालं..!! तीची राहण्याची स्थिती मात्र तोपर्यंत सुधारलेली नव्हती. ज्या स्त्रिने तिला सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केले होते. तिनेंचं आपल्या मोकळ्या असलेल्या घरात तिची राहण्याची व्यवस्था तर केली होती खरी , पण तरीही श्रेयाकडे घरातील कोणतेच सामान नव्हते. मग तिच्या शेजारच्या माणसांनी तिची मदत केली व तिला आपल्या अडगळीच्या खोलीत ठेवलेली शेगडी व इतर काही भांडी , तसचं काही गरजेच्या वस्तू तिला दिल्या....!! ( कारण तिने आपल्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकून घेतलं होतं. )

         मग हळूहळू तिची परिस्थिती सुधारू लागली. ती मन लावून चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने , एक दिवस एका मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली व तो चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला....!!

         तो चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर , अशा अनेक चित्रपटांच्या ऑफर तिला येऊ लागल्या. यश जणू तिच्या पायाशी लोळणचं घेत होतं. एक दिवस तिच्या आई-वडिलांनी तिची मुलाखत टीव्हीवर पाहिली तेव्हा त्यांना अगोदर विश्वासचं बसला नाही. नंतर जेव्हा त्यांनी तिच्या भावाला त्याबाबत विचारणा केली तेव्हा ही गोष्ट खरोखरचं खरी आहे हे त्यांना पटलं. मग त्यांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटला....!!

         " निघायचं का मॅडम आता " जेवून आलेल्या ड्रायव्हरच्या आवाजाने श्रेया भानावर आली...!!
        
        आपला आजवरचा प्रवास आठवून श्रेयाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते त्यामुळे " हो " ईतकचं बोलू शकली ती ड्रायव्हरला....!!

         गाडी सुरू झाली व श्रेया पुन्हा आपल्या विचारात हरवली. श्रेयाने आपल्या मेहनतीने स्वतःला चित्रपट सृष्टीत सिद्ध केलं होतं. कधी- काळी भीक मागितलेली श्रेया आज अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत होती. इतकेच नव्हे तर तिचा स्वतःचा एक एन. जी .ओ. सुद्धा होता....!!

         एक काळ असा होता की तिला दोन वेळचं जेवणही मिळत नसे पण आता मात्र सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. ती कामात इतके बिझी असायची की स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठी निवांत वेळही मिळत नसायचा तिला. तिची इच्छा होती , की तिच्या कुटुंबानेही तिच्यासोबत शहरात राहावे , पण तिच्या आई-वडिलांना मात्र गावचं आवडत असल्याने , त्यांनी तिथेच राहणं पसंत केलं होतं...!!

         श्रेयाने त्यांच्या म्हणण्याचा आदर केला होता पण ती मात्र न चुकता दिवाळी, ईद , होळी , गणपती अशा ठरावीक सणांसाठी आपल्या कामांना सुट्टी देऊन आपल्या आई-वडिलांकडे गावी राहण्यास येत असे. जमवता येतील तितके आनंदाचे क्षण व नवी ऊर्जा घेऊन ती शहरात येत असे...!!

         आजही ती अशीच आपल्या बिझी शेड्युलमधून
वेळ काढून , आपल्या जन्मगावी आई-वडिलांना भेटण्यास चालली होती . आईच्या हातचं चविष्ट जेवण खाण्यासाठीचं , तिने आपली भुक शिल्लक ठेवली होती. ( ही तिची नेहमीची सवय ड्रायव्हरला माहीत असल्याने त्याने हॉटेलमध्ये
जेवण्याचा आग्रह  तिला केला नव्हता...!!)

         श्रेयाने आजवर खूप कठीण प्रसंग पाहिले होते. कमी वयात खूप संकटांचा सामना केला , पण तिने आपली जिद्द सोडली नाही. तिच्या संघर्षात तिला वाईट माणसांप्रमाणे चांगली माणसही खूप भेटली..., 

       त्यांची ती नेहमीच ऋणी असते...!!

 🌹👩🌹🙏🧚🏻‍♀️🙏🌹👩🌹  

           कथा : काल्पनिक  

       तर , अशी ही कहाणी तिच्या जिद्दीची...!!
(कशी वाटते , प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा...!!🙂)
              
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  ©️®️                                 
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू 
( वैशाली पडवळ )
२४ जानेवारी २०२२                      
  
       

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

सफाईवाला

😇🙏☺️🙏 सफाईवाला 🙏☺️🙏😇             
सकाळची वेळ असल्याने, (त्यातच दिवाळसणं असल्याने) माझी गडबड चालु होती काम लवकर आवरण्याची, बच्चे कंपनी अजुन गाढ झोपेत होती,मी त्यांना तसंच झोपु दिल ( निदान सुट्टीत तरी आराम मिळावा म्हणून).            मी माझं काम करत असले तरी लक्ष मात्र घड्याळाकडेच ⌚लागलेल होत, कारणही तसंच होतं ना...             आमच्या सोसायटीचा झाडूवाला, अजुन आला नव्हता कचरा नेण्यासाठी, तो एकतर कालही आला नव्हता कचरा नेण्यास, आणी आजही इतकं लेट (रोज ९ च्या ठोक्याला हजर होणारा कचरेवाला, आज १० वाजत आले तरी आला न्हवता, कालचा पेंडीग कचरा आणी त्यात भर म्हणून आजचा कचरा, मला तर खूप राग आला होता कचरावाल्याचा...)                 ( सोसायटीच्या महिला मंडळाची अध्यक्षा होते मी, असा आगाऊपणा कसा आणी का खपवून घेणार होते मी??)             येऊ देत कचरावाल्याला चांगली, कान- उघाडणी करु त्याची,असं शेवटी मनाशी ठरवून मी कामाला लागले.           थोडा वेळ झाला असेल काम करता करता आणि मग बेल वाजली, मला वाटलं माझे पती आले असतील, जे मुलांना फटाके व त्यांची आवडती गोष्टीची, चित्रकलेची पुस्तक, रंग, मिठाई इत्यादी गोष्टी आणण्यासाठी बाजारात गेले होते.                        मी घाईने दरवाजा उघडला (उत्सुकता लागली होती मला त्यांची शॉपिंग बघण्यासाठी, जास्त पैसे तर खर्च केले नाहीत ना त्यांनी?? )           ‌             मी दरवाजा उघडला खरा, अन दरवाजाबाहेर माझे पती नव्हते, माझा थोडा हिरमोड झाला कचरावाल्याला समोर बघून, मी लगेच त्याला सर्व पेंडिंग कचरा आणून दिला आणी घड्याळात पाहिल.......                            ⌚(१० वाजून १० मी. झाले होते.)           मी त्याला कालच्या खाड्याबद्दल तसेच आज उशिरा येण्याबद्दल ओरडणार होतेच इतक्यात.....,                    माझं लक्ष त्याच्या उदास चेहऱ्याकडे व रडवेल्या डोळ्यांकडे गेलं , जणू मोठ्या कष्टाने त्याने त्याचे अश्रू थोपवले होते. (त्याची तशी अवस्था बघून मला जरा प्रश्न पडला, रोज इतका हसतमुख असणारा, आपल्या कामाबद्दल लाज न मानता अभिमान बाळगणारा कचरेवाला, आज असा उदास का असेल??)   ‌        अचानक माझ्यातली माणुसकी जागी झाली आणि मी त्याला विचारलं, " दादा काय झालं तुम्हाला?? आज इतके उदास का दिसताय?? सर्व ठीक आहे ना???                   माझ्या अशा विचारण्याने, तो जणू भारावून गेला, आणि माझ्याकडे पहात राहिला कसल्यातरी विचारात हरवून गेला (कदाचित त्याला सवय नसावी कोणी असे विचारण्याची). मग पुन्हा तो त्याच्या कामाला सुरुवात करत होता, इतक्यात मी त्याला पुन्हा विचारलं, सांगा दादा तुम्ही काल का आले नव्हते, कचरा न्यायला ??                    त्यावर तो घाबरतच म्हणाला," मॅडम, माफ करा पुन्हा अशी चूक होणार नाही." (केविलवाणा चेहरा करून माझ्यासमोर हात जोडून उभा होता तो )      ‌       नजाने का ? मलाच ते योग्य वाटल नाही..!!         म्हणून मी त्याला म्हटलं," दादा मनात संकोच ठेवू नका, तुमच्याशी सोसायटीच्या महिला मंडळाची अध्यक्षा बोलत नसून, तुमची बहीणच बोलत आहे, असं समजून सर्व सांगा, काय झालं ते काल....           माझं हे बोलणं ऐकल्यावर मात्र त्याचा अश्रूंचा बांध फुटला (मला समजेना, तो कशामुळे रडतोय, माझ्या बोलण्यामुळे, की दुसरं काही कारण....)                माझा गोंधळलेला चेहरा पाहून, त्याने त्याचं आवरलं व मला म्हणाला," ताई, तुम्ही खूप धन्य आहेत, तुमच्यासारखी माणसं, या जगात आहेत म्हणून अजून माणुसकी टिकून आहे." आमच्या सारख्या सफाई कर्मचाऱ्यांकडे फक्त तिरस्काराने बघतो समाज. बोलन तर लांबच राहिल....(आणि खिन्नपणे बघू लागला तो कुठेतरी)             मी म्हटलं,"दादा तुम्ही कचरे वाले नाही, तुम्ही तर सफाई वाले आहात, कचरावाले तर आम्ही आहोत, आम्हीच कचरा करतो सगळीकडे, तुमच्यामुळेच तर आमची सोसायटी, आमचा परिसर, आमच शहर, आमचं गाव, आमचं राज्य नव्हे आमचा देशच स्वच्छ राहतो, त्यामुळे तुम्ही तर सफाईवाले, स्वच्छतावाले, आणि आम्हीच कचरा वाले..☹️☹️☹️           माझ्या बोलण्याने पुन्हा गहिवरून आले त्याला, आणि आणि तो पुढे सांगू लागला, "ताई, तुम्ही मला दादा बोललात, म्हणून सांगण्याची हिम्मत करतोय...."                ताई, काल माझ्या मुलीचा वाढदिवस होता, म्हणून ती खूप हट्ट करत होती, की बाबा आज माझा वाढदिवस आहे, आणि दिवाळी पण, तर तुम्ही नका जाऊ आज कामाला, आजचा दिवस माझ्याबरोबर घालवा, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ही लहानच, ऐकायला तयारच नव्हती, त्यामुळे मला काल जमलं नाही कामावर यायला, आजही ती तसाच हट्ट करत होती बाबा, आज तर भाऊबीज, नका जाऊ कामाला...             कसतरी तिला समजावून आलो कामाला तरीही थोडा उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो मी तुमची...🙏            हे सर्व ऐकून मलाच अपराधी असल्यासारखं वाटु लागल, किती सहजतेने विसरून जातो आपण अशा असंख्य अगणित लोकांच्या कष्टांना, मेहनतीला जी त्यांनी, आपल्यासाठी केलेली असते, आपल्याला दिवाळीची, प्रत्येक सणाची सुट्टी हवी असते, परंतु आपण अशा लोकांच्या मेहनतीचा, त्यांनी दिलेल्या सेवेचा जराही विचार करत नाही, उलट अपेक्षा करतो त्यांच्याकडूनच, अखंड सेवेची (सणासुदीला सुद्धा...☹️☹️, किती स्वार्थीपणे वागतो आपण)....   ‌            मग ते दादा पुन्हा जायलाच निघाले होते, त्यांचं राहिलेला काम करण्यासाठी, तर मीच त्यांना म्हणाले, दादा थांबा जरा, आज भाऊबीज आहे, या बहिणीला ओवाळणी करण्याचा हक्क द्या..., या दादा आत या, चिंता करू नका....            माझं बोलणं ऐकावं की न, ऐकावं याच संभ्रमात, मग मी त्याला म्हणाले, तुमच्या बहिणीचं घर आहे दादा, निसंकोचपणे या.....             इतक्या आग्रहानंतर त्याला येणं भाग पडलं घरात, थोडासा घाबरतच तो आत आला व अवघडल्यासारखा उभा राहिला. मी त्याला सोफ्यावर बसण्यास सांगितले. तो थथोडा संकोचच करत होता, मी त्याला म्हणाले, तुमच्या बहिणीचं घर आहे दादा, चिंता सोडा व निवांतपणे बसा.                      मग मी आत गेले, व त्याच्यासाठी चहा घेऊन आले ,(त्याला ☕चहा दिला त्याच्यासोबत मीही चहा☕ घेतला माझ्यासाठी, माझाही ☕चहा राहिला होता सकाळपासून...)         आम्ही चहा पीतच होतो, इतक्यात माझे पती आले, खरेदीच्या पिशव्या हातात घेऊन (फटाके, मिठाई, पुस्तके, रंग इ.)                कचरे वाल्याला घरात चहा पीत बसलेल पाहून त्यांना थोडं आश्चर्य जरूर वाटलं, पण एव्हाना माझ्या स्वभावाची सवय झाल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही, मीही त्यांना सर्व घटनाक्रम सांगून टाकला, त्यांनाही माझं कौतुकच वाटलं, त्यांच्या चेहर्‍यावरील  हलकसं स्मितहास्य बरच काही सांगून गेल, मग ते त्यांच आवडतं पुस्तक📚📖 वाचण्यासाठी बेडरूम मध्ये निघून गेले.             मीही त्यांच्या मागो माग यांचा चष्मा 😎शोधून देण्यासाठी गेले (त्यांचा विसरभोळा स्वभाव माहीत होता ना मला.....☺️), त्यांना चष्मा देऊन परत येत असताना, त्यांनी हातवारे करून हसतच मला खुणावलं कि भावाला ओवाळल्याशिवाय जाऊ देऊ नकोस, मला त्यांचा क्षणभर अभिमान वाटला, भारावल्यासारखे त्यांच्याकडे पहात राहिले मी एकटक, मग त्यांनीच टाळी वाजवून भानावर आणलं मला......... (मी हसतच तिथून निघाले.....☺️, खुप भाग्यवान होतो मी, मला त्यांच्यासारखे समजूतदार, हसतमुख आणि प्रेमळ पती मिळाले होते)             त्याच आनंदात बाहेर आल्यावर, मी सफाई वाल्या दादांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन आले, दादा मात्र पुन्हा अवघडून गेले, उदास झाले.......☹️☹️                मी त्याच कारण विचारलं असता, ते मला म्हणाले, "ताई तुम्ही तर मोठ्या मनाने ओवाळाल तुमच्या या गरीब भावाला, पण माझ्याकडे माझ्या या लाडक्या बहिणीला देण्यास काहीच नाही हो, उलट मीच तुमच्याकडे दिवाळी मागण्याचा विचार करत होतो"......(हे बोलत असताना पुन्हा त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले......😧😧)                 मलाही जरा गहिवरून आलं, तरी मी स्वतःला सावरून, दादांना म्हणाले "दादा मन तर तुमच मोठा आहे, गरीब तर ही बहीण आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही स्वतःला का गरीब समजताय, देशसेवेची, मेहनतीची, कष्टांची श्रीमंती आहे माझ्या ह्या भावाकडे, आणि राहिला प्रश्न ओवाळण्याचा तर ती तुम्ही रोजच देत असता मला, आपली सोसायटी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, स्वच्छता राखून, या पेक्षा श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल माझ्यासाठी तुम्हीच सांगा बरं.....??           दादांचा चेहरा समाधानाने उजळून निघाला....😂              मग बहिणीच्या मायेने मी त्यांना ओवाळलं,.... त्यांनीही ताटा चा मान ठेवण्यासाठी ,वीस रु. ची नोट माझ्या ताटात टाकली, आज ती २०/- रू. ची नोट, मला माझ्या सख्ख्या भावाने ओवाळणीत दिलेल्या २००० /- रू च्या    नोटेपेक्षा खुप श्रेष्ठ, वरचढ वाटत होती.......😂😂             ते दादा नको नको म्हणत असताना मी त्यांच्या मुलीसाठी, माझ्या मुलीचे नवीनच परंतु वापरात नसलेले सर्व कपडे देऊन टाकले, सोबतच माझ्या पतींने आणलेले फटाके, मिठाई, पुस्तक, रंग हेही दिलं. दादांना खूप आनंद झाला, हात जोडतच, त्यांनी ती बहिणीच्या प्रेमाची भेट स्वीकारली, आमच्या दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, त्यांच या क्षणी आम्हाला वाईट वाटत नव्हतं......😂😂(ही पहिलीच अशी आगळीवेगळी भाऊबीज होती, ज्यात बहिणीने आपुलकीने भावाला भेट दिली होती, आम्हाला दोघांनाही खूप अप्रूप वाटलं ह्या जगावेगळ्या भाऊबीजेच....🙂🙂😇😇            शेवटी पुन्हा एकदा आभार मानून दादा निघाले, मला काही तरी आठवून मी त्यांना थांबवलं, आणि म्हणाले दादा, सर्व सांगितलं पण, तुमचं नाव विचारायचंच राहून गेलं... दादा मात्र हसून म्हणाले "माझं नाव तर तेच....."   सफाईवाला.....😂😂 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ©️®️ ✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू ( वैशाली पडवळ ) २२ जानेवारी २०२२

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

जगावेगळी

....जगावेगळी....
ऐका हो आज, कहाणी हि तिची आगळी.....
ती जगात राहूनही, असे मग जगावेगळी.....
  
तीच आजची दुर्गा, आणि तीच भासते काली.....
ठेवत असते तीच, साऱ्यांची ख्याली खुशाली.....

कधी करी माया, कधी आणि डोळ्या पाणी.....
कधी बनत असे मग, ती झाशी वाली राणी.....
   
करी प्रेम साऱ्यांवर, करून दुसऱ्याची चाकरी.....
किचेन मध्ये राबतसे, सर्वांना मिळण्या भाकरी.....

दूर ठेवीतसे हो मुद्दाम, ती स्वतःचे सारेच छंद.....
जपण्या साऱ्यांच्या, चेहऱ्यावरचा तो आनंद.....

आवडे तिलाही पोहणे, गायन आणि वाचन.....
येता मनी आठवण, आक्रंदते हो तिचे मन.....

करी प्रेमाने सार, करी रोज ती धावाधाव.....
सुटण्याच्या वेळीच येई, काम मग वाढावं.....
       
रोजच होते तिची ही, तारे वरची कसरत.....
स्वतःकडे बघायला, नसे तिला फुरसत.....

दुसऱ्यांच्या आनंदाने, होई खुप तिला हर्ष.....
नाही कळलं मग,सरली वर्षा मागून वर्ष.....

आजारपणात कुणाच्याही, रात्र जागून काढली.....
तिची मात्र तब्येत मग, दिवसेंदिवस खालावली.....

तिच्या मनाची स्पंदन, कुणीच नाही जाणली.....
देवी म्हणून ती नेहमीच, दुर्लक्षितच राहिली.....
    
ठेवलं तिला नेहमीच, परंपरांच्या जोखडात.....
तिच्याकडून अपेक्षा, निभवावी रीत- भात.....

तिनेच द्यावा जन्म, करावं पालन पोषण.....
डोळ्यात मात्र खुपे, तीच ते सुंदर दिसणं.....

तिच्याही असतात काही, अपेक्षा वेड्या.....
पायात पडल्या मात्र, नियमांच्या बेड्या.....

देवी म्हणून तिच्यावरच, अत्याचार करणं.....
तिचा चिमुकला जीव, पोटातच संपवणं.....
    
बंद करा हे नाटक, सर्व सोंग - ढोंग करणं.....
मुठीत ठेवण्याची तिला, शोधू नका कारण.....

सहन करा हो तिचं, कधी लटक रागावणं.....
आठवा तीच, न सांगताही मन ओळखण.....
      
तिचं असे दुर्गा, आणी तिचं महिषासुरमर्दिनी.....
तिच्यामुळेच असे, आनंद तुमच्या हो जीवनी.....

तीच्यापोटी जन्म घेऊन, होती सर्व धन्य.....
तिच्यामुळेच असतं ना, घरात धन धान्य.....
     
ती असे मंगल, कल्याणकारी, तिचं असे पवित्र...
तिच्याशिवाय रखडती, मग घराची सारीच सूत्र.....

अशी ही आजच्या स्त्रीची, कहाणी हि वेगळी.....
सामावून ही ह्या जगात, असे ती जगावेगळी.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१९ जानेवारी २०२२

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...