🧚🏻♀️😱😰 तिने भविष्य पाहिले होते....!!😰😱🧚🏻♀️
🌺🌸🌺😱🧚🏻♀️😱🌺🌸🌺
दुपारची वेळ होती, संजना जेवण करून आज कितीतरी दिवसांनी निवांतपणे टीव्हीवरील मालिका पाहत बसली होती. (रोज तिला वेळ मिळत नसायचा, आजच्यासारखा निवांत. )
मालिका पाहत असताना, ती अचानक भूतकाळात हरवून गेली. तिला तिची आई, वडील, भावंडं, बालपण, मैत्रिणी या सगळ्यांची आठवण येऊ लागली. त्या जुन्या दिवसांची जणू चित्रफितच नजरेसमोर फिरू लागली.....🤗
तिला आठवलं तिचं छोटंसं गावं, त्यात असणारे तिच छोटसं पण टुमदार घर 🏠. खूप सुंदर होतं त्यांचं घर. खूप सार्या खोल्या (रूम) असणारा, छोटासा वाडाचं होता तो. खटल्याचं कुटुंब (जॉइंट फॅमिली) होती त्यांची. तिचे अजून दोन काका, त्यांचा परिवार, आजी आजोबा, आणि संजनाचा परिवार, आत्या ,अशी सगळे मिळून सतरा-अठरा माणसे होती घरात. तिचे बाबा घरात थोरले होते, त्यामुळे तिची आईही घरातली थोरली सुन होती. लग्नानंतर काही वर्ष सासुरवासात घालवल्यावर आताशी घरातील सुत्रे संजनाच्या आईकडे हळू- हळू आली होती. संजनाच्या आईने स्वतःवरील जबाबदाऱ्या व्यवस्थित रीतीने पार पाडल्या होत्या. प्रत्येकाची काळजी व्यवस्थित प्रकारे घेतली होती. संजनाच्या आजी- बाबांनाही आपल्या प्रेमाने संजनाच्या आईने आपलंसं करून घेतलं होतं, सर्व घरचं संजनाच्या आईचं कौतुक करताना थकत नसे ( जे संजनाच्या आईला कधीही आवडलं नाही.)
आईची आठवण येताच संजना अचानक उठली, टीव्ही बंद करून, जुना अल्बम घेऊन बसली. ते फोटो पाहत असताना तिची नजर एका फोटो वर खिळुन राहीली.....☺️
तो फोटो होता, (संजनाला इयत्ता आठवीत असताना) गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळाली होती, तेव्हा काढलेला. संजनाने ती ट्रॉफी स्वत: न घेता, मेडल व ट्रॉफी आईला अर्पण केली होती, आणि आईचे आशीर्वाद घेताना तो फोटो काढलेला होता. ती तिच्या आयुष्यातली खूप अविस्मरणीय आठवण होती, कारण त्याच दिवशी संजनाच्या आईने संजनाबद्दल एक वक्तव्य केलं होतं ( जे आज शब्दशः खरं ठरलं होतं.)
संजनाची आई म्हणाली होती , " संजना, माझी मुलगी म्हणून तुला सांगते असं नाही, तर तुझ्यातली गायनाची कला बघून सांगते,
" तू एक दिवस खूप मोठी प्रथितयश गायिका होशील, सगळ्यांना तुझ्या गाण्याने वेड लावशील, परंतु....." .
इतकं बोलून ती थांबली होती. तिच्या चेहऱ्यावर खूप घाम आला होता.....
त्यापुढे काहीतरी बोलायचं असावं तीला , (जे कोणालाच कधीच समजलं नाही, कारणं.......आपलं बोलणं पूर्ण होण्याआधीचं संजनाच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता...., बोलता बोलताचं स्टेजवर धाडकन कोसळल्या होत्या, संजनाच्या आई, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता, कोणाला काही समजण्याच्या आतच.......😭)
संजना व तिच्या बाबांना, खूप वेळ लागला होता या धक्क्यातून सावरायला, परंतु कुटुंबाची भावनिक , आर्थिक मदत असल्याने ते दोघे सावरू शकले एकमेकांना, नंतर मात्र यथावकाश संजनाच लग्न झालं, तिच्या भावंडाचीही लग्न झाली, सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते, सगळ्यांवरचं संजनाच्या आईचे सुसंस्कार झालेले होते, तसेच तिने सगळ्यांबद्दलचे जेही वक्तव्य केलं होतं. ते सर्व खरं ठरलं होतं, अगदी तंतोतंत.......
त्यामुळे संजनाच्या आईचा विषय कधी निघाला, तर सर्वजण असेच म्हणायचे, विशेषत: संजना चे आजी-बाबा....
" तिने भविष्य पाहिलं होतं....."
सगळ्यांबद्दलच तिने काहीतरी वक्तव्य केलं होत, जे कालांतराने खरंही ठरलं होतं, अगदी संजना बाबतही.....
संजना खरोखरच आज एक प्रतिथयश गायिका झाली होती.
"सिंगिंग बर्ड " म्हणून तीची ख्याती सगळीकडे पसरली होती , पण मग संजना बद्दल वक्तव्य करताना संजनाच्या आईला भीतीने घाम का फुटला होता, असं काय पाहिलं होतं तिने, ज्या धक्क्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.....
विचार करता करता संजनाला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी संजनाला एका अवॉर्ड फंक्शन साठी नागपूरला जायचे होते, म्हणून मग तिने रात्री जेवून झाल्यावर झोपण्याआधी आपले कपडे बॅगेत व्यवस्थित भरून ठेवले, व ती निवांतपणे झोपली असता, अचानक झोपेतून जागी झाली, तिला स्वप्न पडले होते. ज्यात तिने तोचं लहानपणीचा प्रसंग पाहिला होता, व तिची आई तिला खुणेने काहितरी समजावण्याचा प्रयत्न करत होती , जणू नागपुरला जाण्यापासुन तिला रोखत होती....
(पण संजनाच्या दुर्दैवाने, ती आईचा इशारा समजू नाही, आपण आज दिवसभर आईचा विचार करत होतो, त्यामुळे आईचा विचार मनात येऊन, आपण स्वप्न पाहिलं असेल असं संजनाला वाटलं.......)
दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रेमाने, सर्वांचा निरोप घेऊन, (संजना अवॉर्ड फंक्शन साठी)आईच्या फोटोला नमस्कार करून नागपूरला जाण्यास निघाली. तेव्हाही तिला असं वाटलं, जणू आई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण........ आई जिथे कुठे असेल, तिथुन आपलं कौतुकच करत असेल , असा विचार करून ती अवाॅर्ड फंक्शनला जाण्यास निघाली.........
आणी......
😭😭😭😭😭😭😭
सर्वांसोबत तिच्या अवॉर्ड फंक्शनचा लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी, तिच्या घरी आलेल्या बाबांनी, आणी सर्वांनीच टीव्हीला एक बातमी पाहिली.....
( " ब्रेकिंग न्यूज "- ज्या बातमीने खरोखरच तोडून टाकलं त्यांच हसर-खेळतं विश्व....) , ती बातमी अशी होती....
" सिंगिंग बर्ड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या, लोकप्रिय तसचं सर्वांच्या लाडक्या गायिका, सौ. संजना इनामदार यांचा नागपूरला अवॉर्ड फंक्शन साठी जात असताना अपघाती मृत्यू......"
संजनाच्या घरावर, चाहत्यांवर, सर्व मराठी इंडस्ट्रीत ही बातमी ऐकून शोककळा पसरली.....😭😭😭
संजनाच्या बाबांना मात्र, आता उलगडा झाला, कि संजनाच्या आईला काय सांगायचं होतं, (संजना लहान असताना/आठवीत असताना तिच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये),
संजनाच्या आईला ह्या अपघाताची जाणीवं तेव्हाच झाली असावी, ज्यामुळे तिला तेव्हा भीतीने घाम आला असावा, व आपल्या मुलीचा मृत्यू होणार आहे, तेही प्रसिद्धीच्या शिखरावर असताना , हा धक्का सहन न झाल्याने संजनाच्या आईचा जागीच मृत्यू झाला असावा....
या घटनेची चौकशी करत असताना, जेव्हा पत्रकार, संजनाच्या बाबांना या दुःखद घटनेबद्दल विचारत होते, तेव्हा संजनाच्या बाबांनी संजनाच्या लहानपणीच्या या घटनेचा उल्लेख केला, तेव्हा त्यांच्या तोंडी दुःखी अंतकरणाने 😭😭 संजनाच्या आईबद्दल एकचं वाक्य आलं...
" तिने भविष्य पाहिलं होतं..!! "
😭🙏😭😭🌺🌺🙏🧚🏻♀️🙏🌺🌺😭😭🙏😭
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुपच सुंदर लेख 👌🙏🏼🙏🏼✍️
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअत्यंत हृदयस्पर्शी कथा लेखन केले सखी ✍️✍️🌟🌟🌟
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप सुंदर स्टोरी.... कधीतरी आपल्याला घडणाऱ्या गोष्टींचा संकेत आधीच मिळतो....खूप छान....👍👌✍️✍️🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर होत अस कधी कधी...तेच कथेतुन मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न
हटवाकेला आहे....मन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
खरंय,मॅडम . अप्रतिम शब्दगुंफण...✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाहो ना सर...असही घडत कधी-कधी...मन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय सुंदर कथा ��������
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवादृष्टांता बद्दल सुंदर कथा लिहिली आहेस 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद गणेशदा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवा