रंग किती छान, लाल , पिवळा, हिरवा,निळा.....
सर्व जणांनाच आवडायचा, तो बर्फाचा गोळा.....
एका एका रंगांची , जणू एक एक कहाणी....
गेले ते दिवस , आणि राहिल्या आठवणी.....
घरा जवळही मिळायचा, रंगी बेरंगी गोळा.....
खायचे मग तो मी, आईचा चुकवून डोळा.....
दिवसामागून दिवस सरले, अन वयही वाढले....
गोळ्या प्रती प्रेम मात्र ,कधीच कमी नाही झाले....
आपलासा वाटतो हा, छान आठवणींचा मेळा...
वाटतो मग हवाहवासा , माझा आवडता गोळा....
🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अप्रतिम..खूप सुंदर आठवणी👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान आठवण...,👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवागोळा... व्वाव.मॅडम,बालपण आठवले.अप्रतिम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा व्वा सखी अगदी मनातलं बोललीस गं ✍️✍️🌟🌟
उत्तर द्याहटवागोड आठवणी 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा