माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩
१६७४ ला किल्ले रायगडावर
राज्याभिषेक राजांचा झाला
अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी
राजधानीसाठी होता निवडला

सुर्यास्तावेळी दरवाजे बंद होत
चिटपाखरू नसे तिथे फिरकत
राजांनीच लावली होती शिस्त
पहारेकरी आज्ञापालन करीत

कडक शिस्तीच्या वातावरणात
झाली होती घटना एक विपरीत
हिरा धनगरीण होती वाकुसरीत
दुध विकुनी होती घर चालवित

रोज गडावरती येणं- जाणं होतं
दुध विकुन घरी होती ती परतत
घडल त्यादिवशी भलतं आक्रीत
झाली हीच हिरा गडामधे बंदिस्त

बसली ती पहारेकऱ्यांना विनवत
पहारेकरी दरवाजा नव्हते उघडत
राजाज्ञेचं पालनच होते ते करीत
हिरकणीने सोडलीच नाही हिंमत

गडावरी फिरली होती वाट शोधत
तान्हुल्यासाठीच हिरा माई चिंतीत
प्रयत्नांचीही केलीच तिने शिकस्त
तरीही मार्ग नव्हता तिला सापडत

चमत्कारच झाला जणू एका क्षणात
हसु आलचं थोर हिरामाईच्या मनात
एक कडा आला होता तिच्या नजरेत
तिथुन उतरताना जीव होता धोक्यात

विचार स्वत:चा नव्हता तिच्या ध्यानात
तान्हुल्याचीच चिंता तीच्या काळजात
ऊतरली गड वाघीण बाळाला आठवत
जाहल्या होत्याच जखमा तिला अनंत

घरी पोहोचली लेकराच्या ओढीने धावत
काळजाच्या तुकड्यास पाहुन हर्ष मनात
वार्ता ही ऐकुनी राजेही पडलेच संभ्रमात
साडी-चोळी बहाल केली हिराला गौरवत

हिराच्या नावाने बांधला बुरुज रायगडात
हिरकणीवाडी गावही प्रसिद्ध ईतीहासात
अभिमान वाटतो हिरकणीमाईचा सतत
करते वंदन हिरकणीमाईला मनात जपत

🚩🚩🚩जय शिवराय 🚩 🚩 🚩
...हिरकणी मातेचा विजय असो...
🚩🚩🚩जय शिवराय 🚩 🚩🚩

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१७ फेब्रुवारी २०२२


रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

स्वराज्यसौदामिनी ताराराणी

ई. सन १४ एप्रिल १६७५ रोजी 
मोहीतेंच्या घरी कन्या जन्मली
पत्नी राजारामांची ती जाहली
महाराजांची स्नुषाही शोभली

वैधव्यानंतरही नाही ती खचली
मराठ्यांची गादीही सांभाळली
बाळाजी , उदाजी आदी सोबत
पन्हाळा किल्ला लढुन जिंकली

कारंजा राजधानी तिने बनवली
रामचंद्रपंत अमात्यांच मार्गदर्शन
ईतिहासातील यशस्वी स्त्री ठरली
भद्रकाली ठरवले सार्थ संबोधन

मोघलांशी नेहमी लढत राहीली
रणरागिणीच ताराराणी बनली
९ डीसेंबर १७६१रोजी निवर्तली
अंजिक्यतारावर समाधीस्त झाली

🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१३ फेब्रुवारी २०२२

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

पराक्रम पावनखिंडीचा

पावनखिंड म्हणजेच मुळची घोडखिंड ही दोन डोंगरांच्या मध्ये वसलेली एक अतिशय अरूंद अशी खिंड आहे... इतकी अरुंद की, या खिंडीतून केवळ एका घोडेस्वाराचचं जाणं-येणं शक्य होत त्यामुळेच या खिंडीच नाव "घोडखिंड होत. पन्हाळगड व विशाळगड या दोन गडांमधील अंतर घोडखिंडी मुळे कमी झालेल होत.

ई.स. २ मार्च १६६०ला सिद्दी मसूद याने पन्हाळगडास वेढा घातला व राजे अडचणीत सापडले. पुढे पावसाळ्यातही मसुदचा हा वेढा सुटेना. या गंभीर परीस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी शिवरायांनी " शिवा काशिद " यांच्यासह मिळून गनिमी कावा केला. शिवा काशिद यांची अंगकाठी व नावं राजांशी मिळतं-जुळतं असल्याने राजांची ही क्लृप्ती कामी आली व सुमारे १३ जुलै १६६० रोजी महाराज पन्हाळगड्याच्या वेढ्यातुन निसटले.

काही वेळानंतर सिद्धी मसुदला सत्य कळाले व त्याने अतिशय निर्दयीपणे शिवा काशिद यांची हत्या केली तर ३००० सैनिकांची एक तुकडी शिवरायांच्या मागावर पाठवली. पुढेही शत्रु व मागेही शत्रु अशी त्यावेळी शिवरायांची अवस्था झाली. अशावेळी प्रसंगावधान राखत बाजीप्रभू व त्यांचे बंधु फुलाजी प्रभु यांनी राजांना विशाळगडाकडे कुच करण्यास सांगीतले.आम्ही तोपर्यंत खिंड लढवतो असे वचन दिले ,परंतु बाजी ईतर मावळ्यांना अशा गंभीर परीस्थितीत सोडून जाण्यास राजांच मन मानतचं नव्हतं...मग बाजींनी थोडसं दरडावून व निक्षुन राजांना सांगितले की...,
" राजे , लाख मेले तरी चालतील ,परंतु लाखांचा पोशिंदा जगायलाच हवा , तुम्ही निश्चिंत मनाने विशाळगडाकडे निघा व गडावर पोहोचताच तोफांना बत्ती द्या. जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही , तोपर्यंत एकाही गनिमाला ईंचभर पुढे हलू देणार नाही. "

हे ऐकल्यावर मात्र राजांचा नाईलाज झाला व जड अंतःकरणाने ते ३०० मावळ्यांसह विशाळगडाकडे रवाना झाले.

उरलेल्या ३०० मावळ्यांसह बाजी प्रभू, फुलाजी प्रभु प्राणपणाने लढले. अनेक वार बाजींच्या अंगावर झाले..पण बाजींना तसुभरही फरक पडत नव्हता. हर हर महादेव म्हणत हा नरसिंह त्वेषाने शत्रुंवर तुटुन पडत होता. बाजींचा हा जोश बघुन मावळ्यांच्या अंगातील रक्तही ऊसळत होत. दोन्ही हातात तलवारी घेऊन बाजी शत्रुला कापत होते. बाजी लढत असले तरी त्यांच सगळं लक्ष तोफांच्या आवाजाकडेच लागलं होत. दोन्ही बाजूंच्या या धुमश्चक्रीत एक घाव बाजींच्या वर्मी लागला... तरीही बाजी लढतच राहीले... तोपर्यंत... जोपर्यंत विशाळगडाहुन तोफांचा आवाज आला नाही.... अखेरीस तो आवाज आला व बाजींनी समाधानाने आपला प्राण सोडला.

बाजींच्या मृत्युनंतर मावळेही मारले गेले. मावळ्यांच्या रक्ताने  पावन झालेली घोडखिंड या घटनेनंतर "पावनखिंड" म्हणून ओळखली जाऊ लागली.

धन्य होते सर्व मावळे , धन्य होती त्यांची शिवरायांवरील निष्ठा....धन्य होते शिवराय...!!

मानाचा त्रिवार मुजरा सर्व मावळ्यांना व शिवरायांना
...🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️...

🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ)
११ फेब्रुवारी २०२२


हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...