माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

ही धरीत्री ( द्रोणकाव्य )


ही धरीत्री असे माझी जननी
कशी वर्णावी मायेची कथा..??
 समजुनी घ्यावी ही व्यथा
    ह्रास पर्यावरणाचा
     वेळीच थांबवावा
      वृक्षारोपणाचा
       दृढ संकल्प
        जोपासावा
          जपावा
            मंत्र
             हा

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

तुमची आवडती लेखीका..!!

सागरकिनारा..!!

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🏖️🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

"रुपेरी वाळुत माडांच्या बनात ये ना"

" चंदेरी चाहुल लावीत प्रितीत ये ना"
" बनात ये ना...जवळ घे ना...हाय..."

हे गाणं ऐकलं...की आपसुकच आठवतो...रम्य सागरकिनारा...!!

        आपल्याला सर्वांनाच आवडतो..आपलासा वाटतो
" सागरकिनारा.."


          सुर्योदय , सुर्यास्ताच विलोभनीय दृश्य पहायचं असेल...भेळ खात..मित्र- मैत्रींणीसोबत मजा करायची असेल...तर योग्य जागा म्हणजे
" समुद्रकिनारा "....हो ना...??

        समुद्राच्या लाटांचा आवाज...मन सुखावणाराच...मन नैराश्याने ग्रासलेल असेल...काय करावं काही सुचत नसेल...कुणाशी बोलावंसं वाटत नसेल...एकांत हवा असेल...तर...,

हमखास...आपली साथ देणारा...आपलं म्हणणं शांतपणे ऐकुन घेणारा एक मित्र असतोच...,
" समुद्रकिनारा "

याच समुद्रकिनाऱ्याशी किती आठवणी जोडलेल्या असतात आपल्या...काही चांगल्या..तर काही वाईट...पण...या आठवणींचा साक्षीदार असतो आपला आवडता हाच " समुद्रकिनारा... "

         वरवरं शांत भासणारा हा समुद्रकिनारा म्हणजेच पर्यायाने समुद्र नजाणे कितीतरी वादळ घेऊन बसलेला असतो मनात..अगदी स्थितप्रज्ञासारखा...!!

आपलं मनही असंच असतं ना...समुद्रकिनाऱ्यासारखचं...
कितीतरी विचारांच्या , ईच्छांच्या , अपुर्ण स्वप्नांच्या लाटा आदळत असतात दररोज मनाच्या किनाऱ्यावर...मनाच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या या लाटा शांत करण्यासाठी...शेवटी प्रत्येकाला गरज भासतेच कधीनाकधी...

" समुद्रकिनाऱ्याची...!!"

समुद्राशीच संबंधीत..तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लीहीलेल गीत...सहजच आठवलं आता...

" ने मजसी ने...परत मातृभुमीला..."
" सागरा..प्राण तळमळला...!!"

🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊

©️®️

✍️...🧚‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

संदेश तुझा..!!

संदेश तुझा माझ्यासाठी...,
खुपच अनमोल असतो..!!
कस सांगुरे सख्या तुला..??
जीव टांगणीला लागतो..!!

येताच तुझा प्रेमळ मेसेज...,
मनमोरही थुईथुई नाचतो..!!
कसं सांगु मी सजना तुला..??
सहवास तुझा मज भावतो..!!

❤️🥰❤️🥰❤️ रचना : - काल्पनिक ❤️🥰❤️🥰❤️

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

लिहायच होत... ( शेलकाव्य )

लिहायचं होतं बरंच काही
काही लिहावस वाटलं नाही
थिजल्या मनातल्या भावनाही
भावनाही सापडल्याच नाही

🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁

©️®️
✍️.....🧚‍♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

बिन फेरे हम तेरे




नको वाटते आम्हाला आजकाल लगीनघाई...!!
लिव-इन-रिलेशनशिपची वाटे नवी नवलाई...!!

खूपच भयानक आहे पाश्चात्त्य संस्कृतीचं खुळ...!!
हलून न जावे त्यामुळे भारतीय संस्कृतीचं मूळ...!!

पुरुषप्रधान संस्कृतीला आहेचं ही ऊपकारक... !!
स्त्रियांसाठी ठरे मात्र ही संस्कृती हानिकारक...!!

पुरुषाच्या अन्यायाला राहत नाही जेव्हा हद्द...!!
स्त्रीलाच नडते तिच्या आधुनिकपणाची जिद्द...!!

फायदे कमी आणी आहेत मात्र तोटेचं जास्त...!!
करावे सर्व भारतीय स्त्रियांनी लग्न बिनधास्त...!!

पश्चिमेलाचं शोभतात सर्व आधुनिकतेचे वारे...!!
आपल्या भारतासाठी मांडवातील लग्नचं बरे...!!


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

स्वप्नं नवे ( शेलकाव्य )


डोळ्यात माझ्या भाव नवे
नवे स्वप्नं हे साकारावे
ध्येय मनी जागृत हवे
हवे प्रयत्न नित्य नवे

🙏😊🙏😊🙏😊🙏

✍️...‌‌..🧚‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

शांतता

 


कोलाहलात या जीवनाच्या...,

हरवलीच मनाची एकाग्रता..!!
  

शोधू सुखवाटा आयुष्याच्या...,

असावीच सोबतीला शांतता..!!


🌈🕊️🌈🦚🌈🕊️🌈🦚🧚‍♀️🦚🌈🕊️🌈🦚🌈🕊️🌈

©️®️

✍️.....🧚‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

मैत्री..!!

मैत्री असावी दोन मनांना जोडणारी..!!
मैत्री असावी सदा सन्मार्गावर नेणारी..!!
मैत्री असावी ह्रदयापासुन ह्रदयापर्यंत..!!
मैत्री जपावी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत..!!

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

ओंजळ

ओंजळ माझी भरलेली आहे 

सख्या तुझ्या निरागस प्रितीने

नदीप्रमाणे सदैव वाहत आहे

तुझ्याकरीता सजना ओढीने

❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

अपुरे शब्द


प्रेम व्यक्त करण्यास मला
शब्दसुद्धा अपुरेच पडतात
बोलके भावही डोळ्यांतले
तुला न बोलताच कळतात

सौंदर्य तुझे वर्णन करण्यास
शब्दसुद्धा अपुरेच पडतात
नयणबाण सजनी ह्रदयास
नकळतच घायाळ करतात

❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

चांदण्यात फिरताना ( मधुदिप काव्य )

  

                         हे
                       प्रेम
                      सुंदर
                    एकमेव
                  जीवनातल
                    प्रेमरत्न
                    आहेस
                      मनी
चांदण्यात फिरताना सखे तुझ्यासोबत
  कालवाकालव झाली माझ्या मनात
       प्रेम आपले भिनले श्वासात
          अलगुज असे कानात
              जपल ह्रदयात
                 सहवासात

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

किनारा


देशील का तु मज सजना...,
तुज नेत्रांनी काही इशारा..!!
काय सांगू मी बेचैन मना..??
भेटेल ना प्रेमाचा किनारा..??


❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️

©️®️

✍️...🧚‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )


मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

सख्या रे ( शंकरपाळी काव्यरचना )

              


              रे
           सख्या
         अवखळच
      खट्याळ असा
   दरवळत होता मनात
त्या वळणावर पाऊस होता
   भिनतच होता श्वासांत
       मृदगंध हा असे
           प्रेमाचाच
             सख्या
                रे

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🙏🧚🏻‍♀️🙏🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

कहाणी सर्प जातीची..!!

🐍🐍🐍🐍  कहाणी सर्प जातीची  🐍🐍🐍🐍🐍
              🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍


आहे हि आमच्या सर्प जातीची कहाणी . . . ! !
ऐका आमची कैफियत आमची जुबाणी . . . ! !

       करतो जेव्हा आम्ही आवाज फिस्स् फिस्स् . . . ! !
       दर्शनाने आमच्या होते ना काळजात धस्स् . . . ??

किती असती रुपे आणी नावे आमची . . . ! !
का बाळगता मनी तुम्ही भीती सर्पांर्ची . . . ??

           नागपंचमीला तुम्ही आमची पूजा करता . . . ! !
           तुमच्या औषधासाठी जीव आमचा घेता . . . ! !

म्हणता हो आम्हाला शेतकऱ्यांचे मित्र . . . ! !
बघून आम्हाला गर्भगळीत होता मात्र . . . ! !

          आमच्या कातड्यांचे बेल्ट घालून मिरवता . . . ! !
         आम्ही दंश केल्यावर वाटे जीवनाची चिंता . . . ! !

नाही आम्ही पृथ्वीवरचे निरुपयोगी किटक . . . ! !
आम्ही आहोत अन्नसाखळीतले एक घटक . . . ! !

      आमचे नागराज आहेत महादेवांनाही प्रिय . . . ! !
      विषारी असण्यात सांगा आमचा दोष काय् . . . ? ?

जगु द्या आम्हांलाही शांतीने सोडा आमची भिती . . . ! !
आहे ऋणी सर्व सर्पमित्रांची आमची सर्प प्रजाती . . . ! !

🐍🐍🐍🙏🐍🐍🐍🙏🧚🏻‍♀️🙏🐍🐍🐍🙏🐍🐍🐍
  

©️®️                                        

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )


                        


अभीनंदन चारोळाक्वीन रंजुताई


" चारोळीक्वीन " असा प्रतीलिपीवर नावलौकीक असलेल्या , मनमोकळ्या स्वभावाने सर्वांना आपलस करणाऱ्या , इतरांच्या मदतीसाठी नेहमी तप्तर असलेल्या , सातत्याने सुंदर सुंदर चारोळ्यांची बरसात करणाऱ्या , सदैव उत्साहाने वाहत असलेल्या काव्यसरीता....,
" ऊर्मीला परुळकर " ऊर्फ रंजुताई ( काव्यसखी)
यांनी नुकत्याच " ३००० " चारोळी लिहुन स्वत:चाच जुना १००० चारोळी लिहीण्याचा विक्रम मोडीत काढला आहे , त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभीनंदन...💐💐💐🎉🎉🎉💐💐💐

ऊत्साहमुर्ती व सदा हसतमुख असलेल्या , सतत नवीन गोष्टी शिकण्याची ऊर्मी मनात असलेल्या उर्मीला म्हणजेच रंजुताईंचा प्रेमळ सहवास मला लाभतोय ही माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट...!!

रंजुताईंच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
💐👍

रंजुताई तुम्ही असचं छान लिहीत रहा...आम्हा सर्वांना तुमच्या चारोळीच्या " वर्षाराणीत " मनसोक्त भिजु दे...तुमच्या जीवनात हा
" क्षण " अविस्मरणीय ठरूदे..!!

तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत...तुम्हाला तुमची ओळख बनवण्यात यश मिळाव...सर्वदुर तुमचा नावलौकिक व्हावा...हीच बाप्पाचरणी प्रार्थना...🙏🙏🙏

🎉🎉🎉🎉🎉💐💐💐🙏💐💐💐🎉🎉🎉🎉🎉

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
वैशाली पडवळ )


सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

लाल स्कार्फवाली तरुणी


पाहिली मी एक लाल स्कार्फवाली तरुणी...!!
स्वर्गातल्या अप्सरेहुन सुंदर होती रमणी...!!
तिची हर एक अदा होती ईतकी देखणी...!!
काळजावर वार करुनच गेली ती हरीणी...!!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

बळीराजा...( बळी की राजा..??)

          बळीराजा....( बळी ?? की राजा ?? )


🙏🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏🙏👳🙏🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏🙏

              🙏... रामराम समद्या पाव्हण्यांनो...🙏

            मी कोण ??

        समद सांगतो,  ऊलीसा धीर धरा की....!!

         म्या शिरप्या, ( म्हणजे श्रीपत बळवंत भोसले.) आज मी मांडणार आहे तुमच्यापुढं , कैफियत माझ्या दर्दभऱ्या आयुष्याची. ऐकसालं ना लक्ष देऊन , ईळ हाय नव्हं , तुमच्याकडं तेव्हढा....??

               तर म्या हाय शिरप्या (तेच ते तुमच्या शहराकडच्या भाषेतलं श्रीपती. ) आमच्या गावाचं नाव वडगावं -बुद्रुक ( एकाच नावाची दोन गावं असली की लहान-मोठे समजण्यासाठी खुर्द आणि बुद्रुक असं म्हणत्यातं नव्हं , जाऊद्या तुम्हास्नी ठाव नसलं ).

               तस आमचं हे वडगाव खूप सुंदर गाव बरं. निसर्गानी सौंदर्याची अगदी उधळण केली हाय जणू ,आमच्या गावावर मोकळ्या हातानी. डोंगर- दरी , झाडं , नदी यांनी वेढलेला आमचं गावं म्हंजी स्वर्गचं होता बघा आमचा. सर्व लोकं गुण्यागोविंदाने नांदत व्हती गावात. (तशी छोटीमोठी वादावादी व्हायची बरं गावात, पण मोठी थोरली माणसं सोडवायची भांडणं. आता गावं म्हणलं की बारा भानगडी आल्याचं, न्हवं का ??)

                तर अशा आमच्या गावामंदी समदीचं पिक व्हायची की , गहू , बाजरी , ज्वारी , भुईमुग, ऊस , कांदे इ.
मला आठवतयं की, एकदा तुकाराम काकांनी तांदूळ/ भात लावण्याचा प्रयत्न  बी केलता की, भाव चांगला मिळतुया म्हणून , पण न्हाय हो पाव्हणं, त्यांचा तो प्रयत्न फसला बघा, अन वरून कर्ज झालं ते वेगळं....😔

                 तसं सगळ्यांचं बरचं चाललं व्हतं की , पण गेल्या दोन वर्षापासून पावसानी जणू दडीचं मारलीया , आमच्या धरतीमायेला पार भेगा पडल्या होत्या की , आमच्या डोक्यावर ची कर्ज वाढत चालली हायती, अन् अशातचं तुकाराम काकांच्या शेतात त्यांनी गळफास लावून घेतल्याची बातमी आली....👳😔😔😢😢

               समदा गाव हळहळला ,आन् माझा बा तर खचून गेला पार , ह्या बातमीनं , त्याचा जीवलग दोस्त होता न्हवं तुकाराम काका. आन् त्याची अवस्थाबी काही यगळी न्हाय  न्हवं. पण माझ्या मायनी खूप समजावलं माया बा ला , आपुण ली कष्ट करू पण तुम्ही मामंजीसारखी अन् तुकाराम भावजींसारखं वंगाळ पाऊल न्हाय ऊचलायचं , माह्या बानी होकार दिला होता या गोष्टीला. माया बाचे डोळे भरुन आले कौतुकाने, माह्याकडं बघूनं , त्यांनी वचन दिलं नव्हं आम्हास्नी,  कायबी झालं तरी वाईट, वंगाळ कायबी न्हायं करणार...!!

             मंग आम्ही समदी डोळ्यातलं पाणी पुसून आन् मन  घट्ट करून पुन्ह्यांदा जोमाने कामाला लागलो, लय कष्ट केलं दिस- रातं , ( पोटाला चिमटा घेऊन ), शिवार फुलवलं आम्ही समद्यांनी मेहनत करून ,कांद्याला भाव चांगला होता म्हणून कांदा लावला होता बघा शेतामंदी, मी बारावीला व्हतो त्या साली , म्हावं पूढलं शिक्षणं आता तो कांदाचं ठरीवणारं होता, माह्या बानी अन् मायनी लयी स्वप्नं बघितली हायती बघा
माझ्यासाठी. मी ती समदी स्वप्नं पुरी करणार हायं, लय कष्ट केले त्यांनी आयुष्यभर, म्हातारपणाला त्यांना सुखं द्यायचं हाय मला. आता हा कांदा चांगल्या किमतीला विकला गेला की बास....!!

              फुलंल्यालं शिवार बघून , माया बाचं ऊर बी अभिमानानं अन् आनंदानं भरुन येतय बघा. आम्ही समदे खुश हाय आज, ऊदया तो कांदा काढून मग नंतर विकणार हाय माव्हा बा पेठेत नेऊन. मंग आमचे कष्टाचे दिवस संपलेच म्हणून समजा....!!😂😂

                 पण......, हाय रे आमच्या सर्वांच कर्म.....😢
आमचं फुटकं नशीब शेवटी आड आलचं की , दोन वर्षापासून जणू दडी मारलेला पाऊस , आज लय मुसळधार बरसला , इतका बरसला , का आमच्या समद्या मेहनतीवर पाणीचं फिरवून गेला. आमचं समद पीक आन् आमची सारी स्वप्नं जमीनदोस्त झाली आमच्या डोळ्यांदेखतं , कायबी न्हायं करू शकलो आम्ही.....!!

              आन् दुष्काळात तेरावा महिना , हा धक्का सहन न होऊन, माह्या बा नी त्याचं शिवारात आत्महत्या केली , जिथं आम्ही समदी मिळून कष्ट करायचो....!!
  माह्या मायलाबी लय मोठा धक्का बसला आन् माझी अवस्था तर ईचारूच नका....😭😭😭

पण तरीबी मला सावरायला हवं , माह्या मायसाठी...!!

फकस्त एकच विनंती हाय, " जय जवान जय किसान अशी नुसती घोषणा देऊ नका , तर त्याचा अर्थबी जरा समजून घ्या, शेतकरी पोशिंदा असतोय तुमच्या समद्यांचा, तव्हां पाव्हणं त्याच्या कष्टांची जाण ठेवून , भाजीपाला विकत घेताना मोल-भाव करू नका , कारण तो आम्ही रक्त आटवून, आमचा जीव गहाण ठेवून पिकवलेला असतोयं , याचं थोडं भान ठेवा"

             "🙏👳🙏 राम-राम पाव्हणं यतो म्या, काळजी नका करू, न्हाय आत्महत्या करत मी, कारण मी आत्महत्या केल्यावर तुमचं पोट कसं भरणारं ...!! "

🙏🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏👳🙏👳🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏🙏  

रात्र भयाण सरली, पहाट होत आहे...
परी पोशिंदा जगाचा जग सोडून गेला आहे...!!!

भार जगाचा वाहत होता सारा...
देह आज त्याचा दोरीला लटकत आहे...!!!

येतील हजारो मदतीचे हात...
होते दडून जेव्हा होता तो हयात...!!!

जीव ओतून कष्ट केले पण दैवाने ओढून नेले...
काळ्या आईचे मोती पाण्यात वाहून गेले...!!!

होती गरज जेव्हा हात मदतीचे होते मंद...
आज गोळा झाली दुनिया पण आवाज होता बंद...!!!

झालं गेलं आता सगळं ते राहुद्या...
'बळी'च्या बकऱ्याला थोडं 'राजा'सारखं वागू द्या...!!!
                    

👳👳👱👳👳🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏👳👳👱👳👳

 ©️®️                                    

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

गुलाबी प्रेमकण


केली आहे मनातचं त्या सुंदर क्षणांची साठवण...!!

अचानकच होत कधी पहिल्या प्रेमाचही स्मरण..!!

डोळ्यांतही येतातचं अश्रू आठवल्यावर ते क्षण...!!

जपलेत मनाच्या डायरीत कैद गुलाबी प्रेमकण...!!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

फुलले रे क्षण माझे..!!

फुलरे रे क्षण माझे , फुलले रे...!!


😍💞😍💞😍💞😍♥️🧚🏻‍♀️♥️😍💞😍💞😍💞😍


वीरहात तुझ्या मी , किती झुरले रे...!!


आठवणींत तुझ्या हे , मन रमले रे...!!


पाहूनीया तुला सख्या, मी हसले रे...!!


तुझ्या रे येण्याने ,बघ मी मोहरले रे...!!


फुलले रे क्षण माझे फुलले रे , फुलले रे...!!


♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️


स्वप्नांच्या हिंदोळ्यावर , मन झुलले रे...!!


तुझ्या सहवासात दु:ख , माझे  सरले रे...!!


तुझ्या जादूने तु , मन माझे जिंकले रे...!!


प्रेमाने तुझ्या माझे जीवन बहरले रे...!!


फुलले रे क्षण माझे , फुलले रे , फुलले रे...!!


♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️


जीद्दीसमोर तुझ्या सख्या मी हरले रे...!!


प्रेमळ क्षण सारे काळजात जपले रे...!!


प्रेमाने तुझ्या मन माझे तृप्त झाले रे...!!


प्रेमगीत हे नवे ओठी माझ्या आले रे...!!


फुलले रे क्षण माझे फुलले रे , फुलले रे...!!


😍💞😍💞😍💞😍♥️🧚🏻‍♀️♥️😍💞😍💞😍💞😍

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )


त्या रात्री ३ वाजता..!!

त्या रात्री ३ वाजता...!!

                 

दिवसभराच्या धावपळीनंतर मी खूप थकलो होतो . कामावरून घरी आल्यावर फ्रेश झालो व मुलाशी थोड खेळल्यानंतर मी टीव्हीवर बातम्या पाहू लागलो . बातम्या पाहतचं मी जेवण उरकलं. मला आज घरी यायला थोडासा उशीर झाला होता , त्यामुळ माझ्याच सांगण्यावरून पत्नी व मुलाने जेवण केलं होतं.

             आज-कालच्या बातम्या म्हणजे काय सांगायचं , लोक इतके विकृतपणे कसे वागू शकतात हेच समजत नाही..?? स्त्रियांची अवस्था तर विचारूचं नका. आपल्याही घरात आई बहीण आहे याचा विचार का करत नाहीत हे लोक असं वाईट कृत्य करताना. असो...!!

           आधीच दमलो होतो मी, ती बातमी पाहून मन सून्न झालं अगदी व मी लगेच शयनकक्षात झोपण्यासाठी निघून गेलो. मुलगा आणि पत्नी आणि झोपी गेले होते मग मीही बेडवर अंग टाकलं. पण इतका दमलेला असूनही रोजच्याप्रमाणे मला झोपच येईना. सारखा टीव्हीतील मुलीचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता , फार वाईट वाटत होतं तिच्यासाठी , जणू काहीतरी नातच होतं माझं तिच्याशी . मागच्या जन्मी माझी बहीण असावी बहुतेक ती. तिचाच विचार करत होतो मी , त्यामुळे मला झोपचं येत नव्हती.
कुस बदलत होतो ईकडून तिकडे सारखा , पण काही केल्या झोप येत नव्हती . डोळे बंद केल्यावर त्या ताईचा चेहरा डोळ्यासमोर येऊन अस्वथ होतं होतं , अचानक मला पंखा सुरु असताना घाम फुटला , घसा कोरडा पडला...!!

      अश्या बातम्या तर नेहमी पाहत असतो आपण , वाईटही वाटत आपल्याला पण आज असं काय होतं होतं अचानक ?? मला कळतच नव्हतं. शेजारी निद्राधीन असलेल्या बायकोला माझ्या या मनोवस्थेचा थांगपत्ताही नव्हता. दिवसभर काम करून तीही दमली असेल असा विचार करून तीला उठवणं मी टाळलं...!!

        खुप तहान लागली असल्याने मी पाणी पिण्यासाठी उठलो. त्याचवेळेस आमच्या घड्याळात तीनचा टोला पडला. बापरे , म्हणजे मध्यरात्र झाली तरी आज मला झोप नाही लागली , का बरं असं विचीत्र घडतंय आज ?? कोणती वाईट गोष्ट तर घडणार नाही ना?? असे संकेत आपल्याला वेळोवेळी मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो , कळत नकळत....!!

       हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत असं स्वता: ला समजावत मी पुन्हा झोपण्याचा असफल प्रयन केला पण आज निद्रादेवी बहूतेक नाराज होती माझ्यावर. इतक्या रात्री एकट्याने काय करावं बरं ?? पत्नी आणी मुलगा गाढ झोपेत होते . चंद्रप्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर पडून दोघांचाही रुप खुलून आलं होतं , मी तर दोन क्षण पाहत बसलो त्यांच्याकडे . किती सुखी कुटुंब आहे आमचं...,असा विचार मनात येऊन हलकस स्मित हास्य उमटलं माझ्या गालावर. स्वतःचाच हेवा वाटू लागला क्षणभर , ईतक्यात...,

        कसला तरी आवाज आला बाहेरून. इतक्या रात्री कशाचा आवाज आला असेल ?? कोण बरं जाग असेल असा विचार करून मी माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गॅलरीत येऊन उभा राहिलो आणी , समोरचे दृश्य पाहून मला घामच फुटला...,

         एक मुलगी धावत येत होती व तीच्या मागे ५ शस्त्रधारी पुरुष धावत होते. त्यांचा इरादा काय आहे हे समजण्याइतका मी लहान नक्कीच नव्हतो पण एक तर रात्रीची वेळ , त्यात मी एकटा ते पाच जण व तेही गावठी कट्टा , चाॅपर , हॉकी स्टिक , साखळी ई. शस्त्रांनी सुसज्ज असलेले , मला त्या तरुणीची मदत करण्याची इच्छा असुनही , आपण अशा परिस्थितीत काहीच करू शकत नाही , याची खुप खंत वाटली...!!

           ती मुलगी धावता-धावता एका खड्ड्यात अडखळून पडली , आता त्या नराधमांची हिम्मत वाढली. ते पाचही जण तीच्या भोवती गोलाकार फिरू लागले. आता काहीतरी करणं गरजेचं होतं , नाहीतर....

           हा अत्याचार घडत असताना हतबलपणे आणी दुर्दैवाने याची देही याची डोळा पहावा लागला असता . खूप घृणा वाटत होती स्वतःची , काहीच करू शकत नाही का आपण ?? हे विचार चक्र सुरुचं होते डोक्यात आणी , अचानक डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. कॉलेजला असताना मिमिक्री करायचो मी , ऐनवेळेला ते आठवून , मी पोलिस व्हॅनचा आवाज काढला व हा अतिप्रसंग टळला....!!

         मला झोप न येणं , माझं अस्वस्थ होणं , ऐनवेळेला मला ही आयडिया सुचणं हे विधिलिखित असावं बहूतेक...!!

        अचानक आलेल्या पोलिस व्हॅनच्या आवाजाने ते राक्षसी मनोवृत्तीचे लोक घाबरले व वाट फुटेल तिकडे पळून गेले. ती तरुणीही कावरीबावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली. अचानक तीचं लक्ष समोर गेल. माझ्याकडे पाहून तिने हात जोडले. मीही माझ्या उजव्या हाताचा अंगठा तिला दाखवला व खुणेनेचं आमच्या घरी आज रात्री मुक्काम करणार का असे विचारले ??
मी काही क्षणांपुर्वी केलेल्या कृतीमुळे तीला माझ्यावर विश्वास बसला असावा व ती आमच्या घरी मुक्काम करण्यास तयार झाली.
मग मी बिल्डींगच्या गेटजवळ जाऊन तिला आमच्या घरी घेऊन आलो. दरवाजाच्या आवाजाने पत्नी जागी होऊन बाहेर आली होती. त्या तरुणीची अवस्था पाहून ती सर्व काही समजून गेली. तिने मला एकही प्रश्न विचारला नाही. तशी समजूतदार होती माझी पत्नी , माझ्या स्वभावाची तिला माहिती होती , विश्वास होता माझ्यावर तिला , आणि मी तो जपत आलो होतो . त्यामुळे मी काहीही न बोलता ती सर्व समजून गेली.

      त्या तरुणीची दुसऱ्या दिवशी सकाळी चौकशी केली असता , ती अनाथ असल्याचं कळालं , लहानपणापासून ती एका अनाथाश्रमात राहिली होती व वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिला तो आश्रम सोडावा लागला होता.‌ ती कामाच्या शोधात खूप फिरली पण , आपल्या समाजात एकट्या मुलींची अवस्था तर खुपचं बिकट आहे , काम मिळणे तर दूरचं , काल रात्री तर तीच्यावर..भयानक संकट कोसळलं होतं...!!

          सकाळी नाश्ता झाल्यावर , ती तरुणी घरातून जाऊ लागली. तेव्हा माझ्या पत्नीने तीला हात धरून थांबवलं व तिला म्हणाली ,

         " आता तुम्ही इथून कुठे जायचं नाही , ताई . आमच्या यांना बहीण नव्हती , मला ननंद नव्हती , आजपासून हे तुमचे भाऊ व मी तुमची वहिनी , आता इथेच रहा. "

         " ठीक आहे वहिनी , तुम्ही म्हणाल तसं ". अतिशय आनंदाने ती म्हणाली.

            आधीचं समाधानी असणारं आमचं कुटुंब , आता पूर्णही झालं होतं . न बोलताच मला बहीण दिली होती देवाने. हो म्हणजे त्यासाठी एका रात्रीची झोप गमावली होती मी पण त्या रात्री बहिणीच्या रूपात मिळालेली ही दैवी भेट अनमोल होती माझ्यासाठी...!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

                   कथा : काल्पनिक / स्वरचीत     

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

           


शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

आले तुझ्या दारी ( अभंग )

🙏🙏🙏🌟🌟 आले तुझ्या दारी  🌟🌟🙏🙏🙏
                   🌟🌟🌟🌟🌟🌟🌟


// आले तुझ्या दारी देवा पाहण्या रे श्रीमुख् //
// तुझे नाम घेण्यात रे असे माझे सर्व सुख //

                  // नाम तुझे घेता देवा झाले रे मी धन्य  //
                 // नको रे मला आता दुजे काही अन्य  //

// राहो तुझे नाम देवा सदा माझ्या मुखी //
// आहे ह्या जगी आता मीच सर्व सुखी //

         ‌         // असो देवा माझी नित्य अशीच रे भक्ती //
                  // येई तुझ्या कृपेची मला नेहमी प्रचिती //

// सेवा तुझी करण्याची असो मला आवड //
// तुझी भक्ती करण्याची मिळो मज सवड //

                  //चढुदे रे आता देवा तुझ्या भक्तीचा रंग //
                  // होऊदे मला आता तुझ्या नामात दंग //

// आले तुझ्या दारी देवा पाहण्या रे श्रीमुख //
// तुझे नाम घेण्यात रे असे माझे सर्व सुख //

🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🌟

©️®️

✍️..... 🧚‍♀️ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )



शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

ऊपवास ( विनोदी कविता )

 😂😂😂🤦😂😂  उपवास   😂😂🤦😂😂😂
                        😂😂😂😂😂


मनात एक दिवस आला विचार हा खास...
करून पहावाच म्हणलं निर्जळी उपवास...

               नाश्त्याकडे निग्रहाने ठरवून दुर्लक्ष हो केलं...
              पोटातल्या भुकेने मात्र जस बंडच पुकारल...

भुकेमुळे आमच कशातच लक्ष्य लागत नव्हते...
पत्नीने मात्र समोर आमच्या पोहे खाल्ले होते...

           पोहे खावे आम्ही असा करतच होती ती हट्ट...
          आमचाही होता ना उपवासाचा विचार फिट्ट...

पत्नीला वाटलं तिचीच काही चूक झाली...
उपवासाची गोष्ट आम्ही मुद्दाम लपवली...

             ‌ राग मग जणू हा आमचा कमी करण्यास...
              आखला तिने काही जेवणाचा मेनू खास...

स्वयंपाक घरातून येतच होता छान सुगंध...
होऊ लागल आमचंही मन नकळत बेधुंद...
 
                सांगा वर्णु कसा तो अवघड असे प्रसंग...
                बांधलाच पुन्हा आम्ही उपवासाचा चंग...

रात्रीपर्यंत पोटाने कसाबसाच तग धरला...
जेवणाने रात्रीच्या आमचा संयम सुटला...
             
             पोटाने आमच्या अचानक उठाव केला...
             आम्हीही जेवणावर यथेश्च ताव मारला...  

अशी झाली आमच्या निश्चयाची सुंदर फजिती...
पोहोचलीच सर्वदूर आमच्या उपासाची किर्ती...

            बायकोची झाली ऐकून हसताना पुरेवाट...
            ठरवलं नाही घालायचा उपवासाचा घाट...
                           
  😂😂😂😂😂🤦🤦🧚🏻‍♀️🤦🤦😂😂😂😂😂

 ©️®️                                ‌      

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )

          

नातं आपलं


नातं आपलं होतं लाख मोलाचं...!!
नातं आपलं होतं मनातचं जपलेल...!!
नातं आपलं होतं बाप्पांनी जोडलेलं...!!
नातं आपलं होतं पवीत्र भावनांनी दाटलेलं...!!
नातं आपलं संपेल असं नव्हतं कधी वाटलेलं...!!

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

©️®️

✍️...ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

सिरीअलची कहाणी..!!


भातु कलीच्या, खेळा मधले, राजा आणिक राणी....
संपता संपेच ना, अशी ही, सीरिअल ची कहाणी....
        
           गुरु आणि रधिकाच, कधी भांडण, कधी प्रेम....
          एकूण असे, सर्व सीरियलची, कहाणी ही सेम....

राणा आणि अंजलीबाईंची, अबोल असे प्रीत.....
समजतच नाही मला, ही सीरिअल ची हो रित.....

       नवऱ्या पेक्षा, जास्त असे त्या, सुमीचाच रुबाब.....
      मोहनला मात्र, द्यावा लागतो, बायकोला जबाब.....

कधी कधी ,खुप येतो, सीरिअल चा कंटाळा.....
कधी मात्र ,असतो आपला, टीव्ही कडे डोळा.....

    कधी हसवतात, कधी आणतात, डोळ्याला पाणी.....
    कशी वाटली, सांगा मग, ही सीरिअल ची कहाणी.....
   

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 ©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

पावसातली ती..!!

🌧️ 👩🌧️ पावसातली ती....!!! 🌧️👩🌧️

  🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹🧚🏻‍♀️🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹
        
            शेखर ऑफिसला निघाला होता, त्याच्या चार चाकी गाडीमधून, आज त्याची महत्वाची मिटींग होती, ड्रायव्हरला तो, गाडी फास्ट चालवण्यासाठी सांगत होता, पण नेमका सिग्नल लागला, व सिग्नलला बराच वेळ गाडी थांबली.
           वेळ फुकट जाऊ नये म्हणून, शेखर आपला लॅपटाॅप उघडून, काम करू लागला, ईतक्यात......

          त्याच्या गाडीच्या काचेवर टिकटिक झाली....
   
         आधी तर त्याने दुर्लक्ष केलं, नंतर मात्र आवाज वाढला,म्हणून त्याने तोंड वर करून खिडकीबाहेर पाहिलं असता, त्याला दिसली ......

                  "  पावसात भिजणारी ती..... "

          ती विकत होती, आपल्या "भारत देशाचा राष्ट्रध्वज (तिरंगा )". हो कारण आज " १५ ऑगस्ट " होता ना. तसं शेखरच्या ऑफिसला आज सुट्टीच होती , पण झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी, सर्वांना हजर राहण्याची सुचना, त्याने कालच दिली होती. 

       " झेंडावंदनाचा कार्यक्रम " झाल्यावर, तो एक मीटिंग अटेंड करणार होता, आजच्या दिवशी, सुट्टी असूनही, कारण " काम हीच पूजा " असं मानणाऱ्यांतला तो होता. म्हणून तो आता ऑफिसच्या दिशेने चालला होता. आणि जाता जाता त्याला दिसली होती, सिग्नलवर, आपल्या गरिबीचा बाऊ न करता, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, झेंडा विकून, खुशी मिळवू पाहणारी, त्यासाठी पावसाचीही तमा न बाळगता, प्रामाणिकपणे आपलं काम करणारी......

     ‌                 " पावसातली  ती....."

  🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹👼🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹

 ©️®️                                
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू    
( वैशाली पडवळ )               

शेवटचं पत्र..!!

अंतिम पत्र...!!

💌💌🌹🌹💌💌💟🧚🏻‍♀️💟💌💌🌹🌹💌💌


प्रिय...(???)

         तुला प्रिय म्हणू की अजून काही ?? समजतचं नाही मला , कारण तु व्यापून टाकल आहेस माझं सगळं विश्वं ,पण तरीही तुला प्रिय म्हणण्याचा हक्क कुठे आहे मला??..☹️

         हो मला माहित आहे, हे सत्य ऐकून तुला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसेल , पण सत्य हेच आहे की...,

मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते , अगदी शेवटपर्यंत...!!

           हो शेवटपर्यंत, कारण हे पत्र जेव्हा तुझ्या हातात पोहोचलेलं असेल , तेव्हा कदाचित मी या जगात नसेन...!!

          कारण मला ब्रेन ट्यूमर झालेला आहे , आणि तो माझ्याही नकळत शेवटच्या स्टेजला पोहोचला होता.

     खूप खूप प्रेम करत होते रे मी तुझ्यावर. मला माहित आहे तुही माझ्यावर तितकचं प्रेम करत होतासं. मी खूप स्वप्नं बघितली होती रे, आपल्या भावी आयुष्याची. पण....!!

         शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य असतं , प्रत्येकाच्या आयुष्याचं, बरोबर ना...!!??

          मृत्यू येण्याची वेळ प्रत्येकाची वेगळी, वय , परिस्थिती, कारणही सर्वांचं वेगळचं, पण शेवटी अंतिम सत्य मृत्यूचं...!!

          लोकांना आपली जन्मतारीख माहीत असते पण मृत्यु बद्दल माहित नसतं , मला मात्र निश्चित समय माहीत नसला, तरी आपला मृत्यू जवळ आलेला आहे हे मात्र कळलं होतं मला, आणि तुझ्या हृदयात फुलणार माझ्यासाठीचं प्रेमही सुखावत होतं मला , पण मला आनंद देणाऱ्या तुझ्यासारख्या व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख कसे देऊ शकत होते मी ?? सांग ना इतकी स्वार्थी कशी होऊ शकतं होते मी ?? तू खूप चांगला आहेस रे , तुझ्याबरोबर आयुष्य घालवणं , ही भाग्याची गोष्ट ठरली असती माझ्यासाठी, पण..

        हा पण खूप मोठा होता रे , खूपच दुःखदायक होता माझ्यासाठी, तुझा बरोबर लग्न करण्या इतकी भाग्यवान कुठे होते मी. असो, तुझ लग्नही झालं असेल आता , तुझ्या बायकोला खूप सुखात ठेवत असशील तू , पण हे सत्य मनात ठेवून, मृत्युचं अंतिम सत्य स्विकारणं जमलंचं नसतं मला...!!

        तुला कदाचित खूप राग आला असेल माझा ?? पण माफ कर रे मला 🙏🙏🙏

     तु मला माफ करशील या आशेनेचं हे अंतिम सत्य , या अंतीम पत्रातुन तुला सांगण्याचं धाडस करू शकले मी...

                        ...तुझीच पण तुझी होऊ न शकलेली, ‌
                                    प्रेमवेडी (ओळखलसं ना ??)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💟🧚🏻‍♀️💟🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

                ( रचना काल्पनिक / स्वरचित )

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💟🧚🏻‍♀️💟🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )

      

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

पश्चातापातले अश्रु...!!

  🧚🏻‍♀️😭😭...पश्चातापातले अश्रू...😭😭🧚🏻‍♀️

     

      

  फोनची रिंग वाजली, आणि श्री कुलकर्णींनी फोन उचलला, फोन पोलीस स्टेशन मधून आला होता....
            
             त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते,(त्यांची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये बसून अश्रू ढाळत होती ) फोन ठेवला नंतर लगेच तातडीने ते पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास निघाले.....
          
             " श्री. महेश कुलकर्णी " (पेशाने शिक्षक, त्यामुळे शिस्तप्रिय), आपल्या मुलीला त्यांनी खूप मायेने व प्रेमाने वाढवले होते, सुसंस्कार दिले होते, पण त्यांना कुठे माहित होतं, ज्या मुलीला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, (तिच्यासाठी त्यांनी तिच्या आईचा मृत्यू नंतर, दुसरे लग्नही केलं नाही ), आई-वडिलांचं प्रेम एकट्यानेचं देण्याचा प्रयत्न केला.....

          तीच मुलगी एक दिवस, त्यांच्या सर्व अपेक्षांचा भंग करून, त्यांच्या प्रेमाचा अपमान करून, त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेचा विचार न करता, एक दिवस तिच्याशी लग्न करण्यास योग्य नसलेल्या मुलाबरोबर पळुन लग्न करेल...

          पोलीस स्टेशनला जात असताना, रिक्षात बसल्या बसल्याचं, त्यांचं मन भूतकाळात हरवलं. त्यांना आठवलं सीमाचं बालपण, सीमाने केलेला हट्ट, तिचा केलेला लाड, तिने लावलेला लळा, ते दोघेचं तर विश्व होते एकमेकांचे.....

         पण सीमा जशी जशी मोठी होत होती, तसतसं तिचं विश्व व्यापक होत चाललं होतं, आणी एक दिवस अचानक... 

         सीमा घेऊन आली, तिच्यासोबत एका तरुणाला, त्याचं नाव स्वप्निल होतं, सुखी संसाराची अनेक स्वप्नं दाखवून त्याने जणू भूलचं पाडली होती, सीमाला....

         महेश रावांना, तो तरुण बघताक्षणीच आवडला नव्हता, पण मुलीच्या आग्रहापोटी त्यांनी त्या तरुणाची चौकशी केली असता, खूप धक्कादायक गोष्टी समजल्या त्यांना, स्वप्निलबद्दल.......

         त्यांनी सीमाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सीमा स्वप्नीलच्या प्रेमात आंधळी झाली असल्याने , महेश रावांना दिलेलं वचन मोडून, त्यांचं प्रेम, माया पायदळी तुडवून, एक दिवस सीमा स्वप्निल सोबत घरातून पळून गेली. घरात होते नव्हते ते पैसे, दागीने घेऊन....

            जाताना सोडून गेली होती ती, एक छोटीशी  चिठ्ठी , आणी तिच्या असंख्य आठवणी......

             महेश रावांच्या तर पायाखालची जमीनचं सरकली होती , ती चिठ्ठी वाचुन, त्यांना समजत नव्हतं, त्यांची चूक नक्की कुठे आणि कोणती झाली, ते खूप प्रेम करत असणारी त्यांची पहिली  प्रेमळ पत्नी "लीला" हिच्या अपघाती मृत्यूनंतर, खूप मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं होतं, सीमा कडे पाहून, आणी सीमाचाचं विचार करून, त्यांनी आपल्या नातेवाईकांचा दुसर्या लग्नाचा प्रस्ताव कधीच स्विकार केला नाही. सिमाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची एक इच्छा मात्र सिमा नाही पूर्ण करू शकली, असं पळून जाऊन, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून, त्यांचा कन्यादानाचा हक्कही हिरावून घेतला होता तिने, त्यांच्या पासून......

          ‌ काळीज पिळवटून निघालं होतं त्यांच, या घटनेने, आणि वर शेजार्यापाजार्यांचे , नातेवाईकांचे टोमणे , कुस्तीत नजरा, अपमानास्पद बोलणे हे सर्व असह्य होऊन, जीवचं नकोसा झाला होता त्यांना, गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्नही केला त्यांनी, पण आपली प्रेमळ पत्नी लिला, हिला तिच्या शेवटच्या क्षणी दिलेला शब्द त्यांना आठवला, कि ते कधीच सीमाला अंतर देणार नाहीत, तिच्यावरची माया आटु देणार नाहीत, सीमाला कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नाहीत, तिच्याकडून काही चूक झाली तर, मोठ्या मनाने, आईच्या मायेने ती चूक पोटात घालतील....😭😭

           गळफास घेत असतानाच, आपल्या प्रिय पत्नीचा फोटो पाहून, त्यांना हे वचन आठवलं, आणि गहिवरून आलं, माफ करून टाकलं त्यांनी, सीमाच्या अक्षम्य अपराधाला..... आईचा मायेने......

            त्या दिवसानंतर ते शोध घेऊ लागले सीमाचा (जरी तिने चिठ्ठीत अस लिहिलं होत, की माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, तरीही )त्यांच बापाचं काळीज, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं..... त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, सीमाला शोधण्याची, पण त्यात यश न आल्याने, नाई लाजाने शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती (तिथेही त्यांना खूप अपमानास्पद बोल ऐकावे लागले होते, एका कृतघ्न मुलीचा बाप म्हणून....😞)

             आणि आज जवळपास तीन महिन्यानंतर, त्यांची मुलगी सिमा सापडली होती, व तिला ओळख पटवुन घरी घेऊन जाण्यासाठी महेशरावांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते.....

               रिक्षात बसले असतानाचं , खूप विचार चालू होते महेशरावांचे , सीमा कशी असेल आता ?? (मनात खूप राग असुनही तितकिच काळजी आपुलकीही वाटत होती त्यांना, आपले एकुलती एक लेक सिमाबद्दल....., शेवटी आई व बाप दोघांचं काळीज होत ना त्यांच ).....

              रिक्षातून उतरल्यावर घाईगडबडीत त्याचे पैसे देऊन, त्यांनी पोलिस स्टेशन गाठले, आणि इतक्या दिवसांनी सीमाला पाहून त्यांना गहिवरूनच आले......

कारण सिमा ढाळत होती जणू, पश्चातापातले अश्रू......!

       ‌     सीमाजवळ जाऊन त्यांनी, सिमाला आपल्या छातीशी कवटाळून घेतले, त्यामुळे त्या दोघांचेही अश्रू पाहून कोणत्याही ओळखीच्या पुराव्याची गरज पडली नाही, पोलिसांना.....

            ( स्वप्निलने सीमाला सुखी संसाराची स्वप्न दाखवून, तिला फसवून तिचे पैसे व दागिने याची उधळपट्टी करून, तिच्याशी शारीरिक लगट करून, तिचा अतोनात मानसिक, शारीरिक छळ करून , तिला देहविक्रीच्या किळसवाण्या गर्तेत ढकलून, कागदाच्या काही तुकड्यांमध्ये तिच्या समोरच तीचे मोल लावून , निघून गेला होता कायमचा, कदाचित तिच्यासारखी दुसरी सीमा शोधायला......)

               पण दैव बलवत्तर, आणि महेशराव तसचं मरणानंतरही असलेल्या लिलाताईंच्या मायेमुळेच सीमा वाचली होती पुढील संकटांमधुन.....

              महेशरावांनी सिमाला तिचे पश्चातापातले अश्रू पाहून, जरी माफ केले असले , तरी एक सलं मात्र होती त्यांना, की आपल्याला स्वप्निलबद्दल सर्व काही माहित असतानाही, आपण सिमासाठी वेळेवर काहीच करू शकलो नाही, आपण आपलं कर्तव्य निभावण्यात कुठे कमी तर नाही ना पडलो...??

    याचं जाणीवेने महेशरावांच्या डोळ्यातही होतेचं....
      
                 " पश्चातापातले अश्रू ".....😭

  🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏☺️☺️🧚🏻‍♀️☺️☺️🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏
(कथा, कथेतील नावे, पात्रे पूर्णपणे काल्पनिक, कोणाच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध असल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.....🙏👼)
🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏☺️☺️🧚🏻‍♀️☺️☺️🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏

 ©️®️                             

 ✍️... ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )



         


एक दिवाळी अशीही..!!

🏮...सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...🏮

🙏🎇🎆🎁🎆अशीही एक दिवाळी🎆🎁🎆🎇🙏
                      🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
                                 

  "उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली"

  
        हेच वाक्य टी. व्ही. वरील जाहिरातीत ऐकुन मोठी झालेली आपली पिढी ( आताही ह्या वाक्यावर आधारित अनेक विनोद, फिरत असतातच मोबाईलवर आणि हे वाक्यही पडत कानावर पण थोड्या बदललेल्या रुपात...😂😂 )
         
          तर हेच वाक्य ऐकून आपण सर्व मोठे झालो, म्हणजे आपल्याला इतकी सवय आहे ना या वाक्याची, नव्हे मोती साबणाची, दिवाळी आणि मोती साबण हे समीकरणच बनून गेले आहे जणू.....

            लहानपणी हे वाक्य, मोती साबण याबरोबरच अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत आपल्या सर्वांच्याच......
       
    दिवाळी म्हणजे पणती, रांगोळी, दिवाळी फराळ, नवे कपडे, आणि खुप सारी मजा, खुप सारा आनंद.....
                                

 ते दिवाळी पाडव्याच्या दिवशी सुगंधी तेल आणि उटण  लावून केलेलं अभ्यंगस्नान.....बायकोने प्रेमाने नवरोबाला ओवाळण...नवऱ्यानेही तितक्याच प्रेमाने बायकोस ओवाळणी म्हणून भेटवस्तु देण...( बहुधा साडीच...😅)

नरक चतुर्दशीच्या दिवशी दाराबाहेर फोडलेल कारीट 

( नरकासुराच प्रतीक म्हणून )......

  

                             

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेली लक्ष्मीची पूजा

( घरातील  नवीकोरी केरसुणी, पैसे, सोन्याचे दागिने ई. ठेवून करण्यात आलेली पूजा), पांढरेशुभ्र बत्तासे ,लाह्या , धने - गुळं याचा नैवैद्य , अगरबत्ती , धुप यांचा सुगंध...... 

   भाऊबीजच्या दिवशी वेड्या बहिणीची भावाप्रती

वेडी माया, बहिणीच प्रेमाने भावाला ओवाळणं.....
               
            किती भारलेले, मंतरलेले दिवस असायचे ते...
( आताही असतात पण आता इतकं नाही.., आताच्या पिढीला हे सगळ साग्रसंगीत अनुभवायला मिळेलच असं नाही...😔😔, काही ठिकाणी मिळत असेलही त्या लहानग्यांना असा अनुभव पण ते फक्त अपवादानेच....🙁🙁)  

आपल्याा लहानपणी किती मजा करायचो ना आपण दिवाळीला.....
            
               आम्ही तर सर्वजण खूपच मस्ती मजा करायचो, शेजारच्या काकूंना फराळ करण्यात मदत करायचो, आई  घराची साफसफाई करत असताना उगाच मध्ये मध्ये लुडबुड कराचो आणि कधी कधी आईचं कौतुक तर कधी ओरडा ऐकायला भेटायचा....☺️☺️
 

                   

दिवाळीच्या दिवसांत तर रांगोळी हा जिव्हाळ्याचा विषय असायचा सर्वच जणींचा..!!

 एकमेकांच्या मदतीने छान ,सुंदर रांगोळी काढणं 

( कलर कमी पडला तर मैत्रिणीकडे उधार मागून रांगोळी पूर्ण करायची. रांगोळी वाला त्याची हातगाडी घेऊन आला की मग कलर विकत घेऊन उसना घेतलेला रंग परत करायचा....😂😂) पण रांगोळी मात्र आकर्षक असायला हवी, लक्ष वेधून घेणारी.....      आता मात्र स्वतःची  रांगोळी काढायला वेळ नसतो कधी कधी 🙏 😂😂 ( रांगोळीच्या साच्याच्या मदतीने रांगोळी काढतात आजकाल, उरकायच म्हणुन उरकुन घेतलं जात🙏 जागेचाही अभाव असतोच....😂😂)

               
      ह्या सर्वाबरोबरच दिवाळीचा गृहपाठ असायचा दिलेला , छंद वही सुद्धा सांगितलेली असायची बनवायला  शाळेतून,ज्याचा विषय दर वर्षी वेगळा असायचा. ज्याची छंद वही सर्वात छान असायची त्याला बक्षीस ही असायचं...!! 
           गृह पाठात पाढे लिहा, ठिपके जोडून चित्र रंगवा, कंदिलाच चित्र, रांगोळी काढून रंगवणं, अस सगळ असायचं गृहपाठ वहीत करायला, खुप मजा यायची हे सर्व करायला......😂☺️😇


फटाक्यांच्या आतषबाजीच तर विचारूच नका,

🎇🎆💥✨💫🌠🎆🎇💥⭐✨💫🌟🌠🎆🎇
इतकी धमाल करायचो आम्ही सर्व, खूपच मजा यायची....कोणाचे फटाके संपले तर आम्ही देत असू एकमेकांना फटाके वाजवायला ( हे तुझ - ते माझं अस काहीच नसायचं खरं तर...)

     ‌ आता मात्र जरा वेगळचं चित्र मिळतय पाहायला, फटाक्यांच्या वाढलेल्या भरमसाट किमती ,कमाईही वाढली तशी तेव्हाच्या तुलनेत, पण तरीही मिळकत आणि खर्चाची सांगड घालताना नकी नऊ येतात सर्वांच्याच....🙏☺️ त्यामुळे फटाके वाजवण्याच प्रमाण कमीच, एका अर्थाने बरचं म्हणा, प्रदूषणाला आळा बसतो जरा..त्यातही फटाके दुसऱ्या कुणाबरोबर वाटून घेणे म्हणजे ...बोलायलाच नको, आतेभावंड, मामे भावंडं, चुलत, मावस भावंडं यांच्याबरोबर सुद्धा वाटून घेत नाही मुलं फटाके....🤔🙄 आपलीच चूक असावी कदाचित, आपण शेअर करायला शिकवण्यात कमी पडलो बहुधा ह्या पिढीला...🙁🙁...असो..!!

  

        दिवाळीच्या वेळी नवीन कपडेही भेटायचे घालायला..त्याच तर विशेष कौतुक असायचं, जोपर्यंत आजूबाजूच्या सर्व काकूंना कपडे दाखवत नसू तोवर चैन पडत नसे.....
( तेव्हा नवीन कपडे वाढदिवस आणि दिवाळीलाच मिळायचे फक्त त्यामुळे अप्रूप असायचं नवीन कपड्यांचा खुपचं....😅)

        विशेष म्हणजे, भाऊबीजेला ओवाळणी म्हणून जमा झालेल्या पैश्यांतूनही कपडे घ्यायचे, तेव्हा कपडेही स्वस्त असायचे आता पेक्षा ( तेव्हा दीड दोन हजारात सर्वांचे  नवीन कपडे  घेऊन व्हायचे...., दिवाळीला आता मात्र एकाच व्यक्तीला लागतात तितके ब्रँडेड कपड्यांसाठी..., बरोबर ना..?.. क्षमस्व🙏😂) 
      

        हल्ली , दिवाळीत सुद्धा बहीण भावाची भेट होईल का..?? याबद्दल खात्री नसते...( कटु सत्य, कारण आपण आत्मकेंद्री बनत चाललो आहोत सर्व, सगळ्यांचे आपापले वेगळे प्लॅन्स ठरलेले असतात दिवाळीचे..., हा अजुनही आवर्जुन निभावली जाते भाऊबीजची प्रथा, मी सांगितलेली स्थीती अपवादानेच दिसते, तरीही पहिल्यासारखी आपुलकी, जिव्हाळा मात्र नाही दिसून येत आता, हेही तितकचं खर....)

          तरीही अजुनही दिवाळीचं महत्व मात्र तसचं अनन्यसाधारण आहे आपल्या आयुष्यात, आजही आणि नेहमीच राहील तसच...!!

 माझ्या सर्व वाचक , लेखक, मित्र, मैत्रिणी, बंधू ,भगिनी आणि त्यांच्या परिवारास मी आणी माझ्या परिवारातर्फे....,

"दिवाळीच्या लक्ष - लक्ष शुभेच्छा, शुभ दिपावली"


🎆 " दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा " 🎆

आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत,
आपल्या जीवनात सुख - समृद्धी नांदो, आपल्याला सुदृढ आरोग्य मिळो हीच माझी बाप्पाचरणी प्रार्थना... 🙏🙏🙏🙏

मित्रमंडळी , मला एक विचारायचं आहे तुम्हा सर्वांना, खरतरं मलाही तो प्रश्न पडलाच आहे स्वतःला...!!

     आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो, आपल्या पद्धतीने, आपल्या बजेटनुसार, जमेल तेवढा, वाटेल तितका खर्च करतो, काही गोष्टींकडे दिवाळी आहे, होऊदे खर्च म्हणून दुर्लक्ष करतो, पण आपण हा विचार कधीच नाही करत...!!
         
      आपल्यापेक्षा आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेले, गरीब असलेले लोक आपली दिवाळी कशी साजरी करत असतील......???🤔🤔😞😞

         
          पेटत असेल का दिवा त्यांच्याही घरात दिवाळीला ?? मिळत असतील का त्यांनाही फराळाचे पदार्थ ?? त्यांच्या नशिबात असतील का नवे कपडे , दिवाळी फराळ, फटाके ?? त्यांचं घराचं अंगणही होत असेल का रांगोळीने सुशोभित ?? येत असेल का लक्ष्मी माता त्यांच्याही घरात ??

     दिवाळी घेऊन येत असेल का तोच आनंद त्या गरिबांच्या , आर्थिक दुर्बल लोकांच्या चेहऱ्यावर ....??? जो आपल्या चेहऱ्यावर असतो ??☺️🤔
   
               खरंच खुपच अंतर्मुख करणारा प्रश्न.....

               कल्पनाही करवणार नाही आपल्याचाने त्या दुःखाची,त्या उनिवेची, त्या अभावाची, त्या वेदनेची......

आर्थीकदृष्ट्या दुर्बल खुप लोक असतात, आहेत... अगदी आजच्या जमान्यात ही....आपल्याच आजूबाजूला पण...,    

          आपण स्वतः मध्ये इतके गुंतलेले असतो की आजूबाजूला लक्षचं नाही जात आपलं...!!
    
                 ह्या सर्व गरीब लोकांना आनंदी राहायचा, दिवाळी साजरी करण्याचा, खुश राहण्याचा अधिकारच नाही का????  
                 नाही मी मान्य करते की , त्यांच्या आर्थिक परिस्थिती साठी आपण जबाबदार नाही, पण तीही आपल्यासारखीच माणसं आहेत आणि देवाने त्यांना गरीब बनवलं यात त्यांची काय चूक?? आपण सर्व त्यांच्यापेक्षा थोड्या, म्हणजे बऱ्याच प्रमाणात चांगल्या आर्थिक परिस्थितीत आहोत, आणि 
म्हणूनच....,

माणुसकी म्हणून हे आपलं कर्तव्य नाही का, की आपण त्यांना थोडीशी मदत करावी....???

                           

  (आर्थिक स्वरुपातच असावी मदत असंही काही नाही, कोणत्याही स्वरुपात करु शकतो आपण त्या गरजू लोकांना मदत, म्हणजे ......

(१)आपण त्यांना दिवाळीचा फराळ देऊ शकतो.......
( घरी बनवलेला असेल तर ऊत्तमच, अन्यथा बाजारातुन विकत घेऊनही देऊ शकतो....😂😂)

(२)त्यांना थोडेसे फटाके घेऊन देऊ शकतो....( शक्य असेल तर...)

(३) आपल्याला जमत असेल तर नवे, अन्यथा आपण वापरत नसलेले पण सुस्थितीत असलेले कपडे देऊ
शकतो.......( असे कपडे असतातच आपल्याकडे जे घालावेसे वाटत नाहीत, आणि टाकून देण्याचीही हिम्मत होत नाही आपली, असे कपडे आपण नक्कीच देऊ शकतो त्या गरजवंतांना.....)

(४)आपण कंदील देऊ  शकतो त्यांना...(जे आपण घरीही कमी खर्चात बनवू शकतो, आपल्या चील्या- पिल्यांचीही मदत घेऊ शकतो ह्या कामात, मुलांना आणि आपल्यालाही आनंद भेटेल आणि संस्कारही होतील त्यांच्यावर चांगले.....

(५)पणत्या, केरसुणी(लक्ष्मी)रांगोळीचे रंग, रांगोळीचे साहित्य, मिठाई, जुन्या सुस्थितीत असलेल्या चप्पल, बूट ई.देऊ शकतो आपण अश्या लोकांना.....

(६)आपण त्यांना गोष्टींची, कलरिंग बुक, कलर, शालोपयोगी साहित्य देऊ शकतो(  हेही कपड्यांसारखचं सुस्थितीत असलेले, पण वापरलं जात नाही आणि टाकणं जीवावर येतं असं साहित्य....)

(७)आणि सर्वात महत्त्वाचं यातलं काहीच नाही जमलं तर निदान अश्या लोकांना भेटून, त्यांना हस्तांदोलन करून हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.....
( बरोबर ना, आणि त्यासाठी पैसे नाही तर आपला थोडासा अमूल्य वेळ मात्र खर्च करावा लागेल.....😂😂☺️☺️)

          तर जे मला सुचलं ते मी सांगितलं, तुम्हाला अजुन काही सुचत असेल तर कमेंट मध्ये सांगाच 

( ज्याने सर्वांना दिशा मिळेल एक वेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी...)
   
          मला खात्री आहे तुम्ही जरूर एखादा यातील किंवा तुम्हाला सुचलेला मार्ग निवडाल दिवाळी खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी........

         आपण निवडलेल्या ह्या मार्गाने थोडीशी आर्थिक, वेळेची झळ बसेल ही आपल्याला, पण त्या गरीब , गरजवंत लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदा समोर हे नुकसान काहीच नाही, शिवाय जितका आनंद त्यांना भेटेल तितकीच प्रार्थना ते आपल्या सुख समृद्धी साठी करतील देवाकडे, तोंड भरून मायेने आशीर्वाद देतील ते आपल्याला, कौतुकच करतील ते आपलं आणी ते सर्व कौतुक ऐकुन ,त्यांचा आनंद बघून आपल्यालाही जाग जिंकल्याचा आनंद होईल, आपली फक्त दिवाळीचं नाही तर सर्व आयुष्य समृद्ध होईल, सार्थकी लागेल...पटतयं ना मित्रमंडळी...??

            आपल छोटंसं पाऊल आणेल , त्या गोरगरीब, उपेक्षित लोकांच्या जीवनात आनंद आणि त्याचे पडसाद उमटतील आपल्या आयुष्यात.....बरोबर ना....

             बघा माझ्या वाचक/ लेखक, मित्र - मैत्रिणींनो, बंधू - भगिनींनो मला जे योग्य वाटल ते मी सांगितलं....... (काही चुकलं असेल तर क्षमस्व......🙏🙏 लहान तोंडी मोठा घास घेतला अस समजुन माफ करा मला....☺️☺️),पण तरी एकदा विचार जरूर करा ह्याबाबतीत, ही नम्र विनंती आपल्या सर्वांना...🙏🙏☺️☺️

               
         माझा हा लेख आणि आयडिया तुम्हाला कशी वाटली ?? तुम्ही काही करायचं ठरवलतं, केलंत तर नक्कीच कळवा मला..!!

माझ्या ह्या लेखाने एका गरिबाच्या चेहऱ्यावर जरी आनंद आला तरी माझी ह्या वर्षीची दिवाळी सार्थकी लागेल......

  आनंद भेटेल मला आणि तुम्हालाही...हो ना..??😇  

      पुन्हा एकदा  माझ्या तमाम वाचक, लेखक , मित्र - मैत्रिणींना, बंधु - भगीनींना आणी आपणा सर्वांच्या गोड परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा......🙏🙏🙏
   

               

         🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

©️®️                                  

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )            

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

किलबिलाट ( हायकु )

किलबिलाट
सुरु झाला पक्ष्यांचा
झाली पहाट

झाली पहाट
सोनेरी किरणांची 
नव्या आशेची

नव्या आशेची
वाट चालु कष्टाची
सुखी जीवन

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

©️®️
✍️ ...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

एक बालपण असही..!!

🤔😞👦....एक बालपण असही....👦😞🤔


मातीत काम करून मळकटलेल.....
उन्हात फिरून मग काळवंडलेल.....

              मंदिराच्या पायरीवर उपाशी पहुडलेल.....
              शिक्षणापासून असे वंचित राहिलेलं.....

फाटकी, मळकी , जुनी वस्त्र ल्यालेल.....
अपमान अन् निराशेच घोट प्यालेल.....
   
              अन्याय अत्याचाराच्या बेड्यांत अडकलेलं.....
              चेहऱ्यावरचं निरागस हसू जणू मावळलेल.....

आनंद सोडून दुःखच वाट्याला आलेलं.....
खेळणं सोडून श्रमच वाट्याला आलेलं.....

              आई - वडिलांच्या मायेला पारख झालेलं.....
               एक बालपण असही, स्वप्नं विस्कटलेल.....
       
      🌺🌺🌺🌺 🙏🧚🏻‍♀️🙏  🌺🌺🌺🌺                    

©️®️                                       
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...