माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१
प्रेम म्हणजे..!!
शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१
सांगना सख्या..!!
अभीनंदन मोहनदादा...💐💐💐
मदतीचा देखावा..??
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
" जे का रंजले ,गांजले त्यांसी म्हणे जो आपुले...तोची साधु ओळखावा...देव तेथेची जाणावा..."
या अभंगातुन...जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी...मदतीचं महत्त्व पटवुन दिले आहे...
काही लोक अगदी मनापासून गरजवंतांची मदत करतात..तर काही लोक मात्र...मदतीचा देखावा करतात...!!
आता मदतीचा देखावा म्हणजे काय...??
तर काही लोक...मुखवटा घेऊन वावरतात...त्यांचा खरा चेहरा वेगळाच असतो..पण ते फक्त असं भासवतात...की ते आपले हितचिंतक आहेत..आपल्या बरोबर आहेत...पण प्रत्यक्षात मात्र...असं काही नसतंच...!!
असे दोन चेहरे घेऊन फिरणारे लोक वरवर चांगुलपणाचा आवं आणतात... आपल्याबद्दल काळजी आहे असं दाखवतात...पण त्यांच्या मनात मात्र काही वेगळचं असतं...आपली प्रगती ,आपली भरभराट त्यांच्या डोळ्यांत खुपत असते...अशी माणसे...वरवर चांगल बोलून...आपल्याशी जवळीक साधतात..व योग्य संधी मिळताच आपला हेतु साध्य करुन...आपल्याला एकटं सोडून निघून जातात...आपल्या भावनांची...कदर नसतेच त्यांना...पण आपण मात्र त्यांच्या जाण्याने..त्यांच्या कृत्याने खुप दुखावले जातो...!!
पण खरचं यात चुक कोणाची असते..?? त्या संधीसाधु , स्वार्थी माणसांची की...त्यांना ओळखण्यात कमी पडलेल्या आपल्या स्वत:ची..??
निश्चीतच , यात आपलीच चुक असते...आपण माणसांची पारख निट करत नाही..आपण...डोळे बंद करून सर्वांवर विश्र्वास ठेवतो...आणी हेच तर हवं असतं अशा चुकीच्या व्यक्तींना...ते आपल्याला नेहमी हे पटवून देतात त्यांच्या वागण्या- बोलण्यातुन की ते आपल्याबरोबर आहेत..पण मुळात ते आपले विरोधक असतात...याची जाणीव जेव्हा आपल्याला होते...तेव्हा वेळ निघून गेलेली असते...मग...पश्र्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही आपल्या हातात...आपण नैराश्याने ग्रासतो, एकटे पडतो..दु:खी होतो...आपण मग कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही...मग आपल्या झालेल्या या
विश्वासघातानंतर...आपला चांगुलपणावरचा विश्र्वासच उडून जातो...आपण चांगल्या माणसांना.. मनापासून आपली मदत करु ईच्छीणाऱ्या , आपलं भलं चिंतणाऱ्या व्यक्तींना संशयाच्या नजरेने पाहतो...त्यांना वेळप्रसंगी वाईट बोलून त्यांचं मन दुखावतो...आपल्याही नकळत...आणी मग याचा दुष्परीणामही आपल्यालाच भोगावा लागतो...आपण परत एकटे पडतो...आपल्याच चुकीमुळे...कारण यावेळीही चुक आपलीच असते...आपण चुकलेले असतो परत एकदा...
माणसांची पारख करायला...!!
म्हणूनच...म्हण पडली असावी...
" मुॅंह मे राम, बगलमे छुरी "
त्यामुळे गरज आहे..डोळसपणे माणसांची पारख करण्याची...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
✍️.....🧚♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
रहस्य आनंदाच..!!
धुळमाती स्वप्नांची
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१
मळभ..!!
मळभ दाटले खुप मनावर
सापडेनाच ऊमेद कणभर
जीवनात सकंटाचींच भर
आता गणरायाचा आधार
🙏🙏🙏🙏🙏 रचना : - काल्पनिक 🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१
शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१
शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१
पुरुष तो पुरूषच असतो..!!
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१
रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१
बालदिन ( हायकु काव्यरचना )
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१
मनाची तृप्ती ( हायकु काव्यरचना )
झालयं मन
आज पाखरासम
सोन्याचा दिन
सोन्याचा दिन
राहो असा सदैव
हेच मागणं
हेच मागणं
माझं आहे बाप्पानां
हेच सांगणं
हेच सांगणं
व्हावीच स्वप्नंपुर्ती
नित्य प्रगती
नित्य प्रगती
होत रहावी सदा
यशाची प्राप्ती
यशाची प्राप्ती
देतसे समाधान
मनाची तृप्ती
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आज " डॉ. सलीम अली " यांचा जन्मदिवस म्हणजेच...,
" जागतिक पक्षी दिन "
सर्व पक्षीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१
हसणं तुझं ( पंचाक्षरी काव्यरचना )
मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१
सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१
शुभ दिपावली ( हायकु काव्यरचना )
हिरकणी माता
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
-
🧚🏻♀️😱😰 तिने भविष्य पाहिले होते ....!! 😰😱🧚🏻♀️ 🌺🌸🌺😱🧚🏻♀️😱🌺🌸🌺 दुपारची वेळ होत...
-
🙏🙏🌺🌺 देवाची माया 🌺🌺🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺 // देवा तूझ्या कृपेची राहो सदा छाया // // राहो देवा अखंड अश...
-
होऊ लहान विसरू भुक- तहान पुन्हा एकदा पुन्हा एकदा विसरु मतभेद हाच ईरादा हाच ईरादा बालदिन सर्वांचा सुखाचा जावा 💐💐💐💐💐💐💐💐💐...