माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

शुभ दिपावली ( हायकु काव्यरचना )

घराघरात
सुवास फराळाचा
सण सौख्याचा

सण सौख्याचा
मनात जपलेला
आपुलकीचा

आपुलकीचा
धागा हाच मायेचा
आनंद ऊरी

आनंद ऊरी
छान रांगोळी दारी
ती घरोघरी

ती घरोघरी
शोभते किती भारी
माळ दिव्यांची 

माळ दिव्यांची
ती भरभराटिची
बाप्पा पार्थना 🙏

बाप्पा प्रार्थना
व्हावी पुर्ण सर्वांची
मनोकामना
🪔🪔🎇🏮🎇🪔🪔🎇🏮🎇🪔🪔🎇🏮🎇🪔🪔

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )


११ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. मन:पुर्वक धन्यवाद सर...🙏🧚🏻‍♀️😊💐🍫

      तुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...🪔🪔🪔

      हटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...