भातु कलीच्या, खेळा मधले, राजा आणिक राणी....
संपता संपेच ना, अशी ही, सीरिअल ची कहाणी....
गुरु आणि रधिकाच, कधी भांडण, कधी प्रेम....
एकूण असे, सर्व सीरियलची, कहाणी ही सेम....
राणा आणि अंजलीबाईंची, अबोल असे प्रीत.....
समजतच नाही मला, ही सीरिअल ची हो रित.....
नवऱ्या पेक्षा, जास्त असे त्या, सुमीचाच रुबाब.....
मोहनला मात्र, द्यावा लागतो, बायकोला जबाब.....
कधी कधी ,खुप येतो, सीरिअल चा कंटाळा.....
कधी मात्र ,असतो आपला, टीव्ही कडे डोळा.....
कधी हसवतात, कधी आणतात, डोळ्याला पाणी.....
कशी वाटली, सांगा मग, ही सीरिअल ची कहाणी.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अगदी खरं सांगितलं आहेस कंटाळा येईपर्यंत ताणतात सिरियल्स. 😀😀
उत्तर द्याहटवाहो ना...😅
उत्तर द्याहटवामनस्वी आभार गणेशदा...🙏🧚🏻♀️😊💐🍫