माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

पावसातली ती..!!

🌧️ 👩🌧️ पावसातली ती....!!! 🌧️👩🌧️

  🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹🧚🏻‍♀️🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹
        
            शेखर ऑफिसला निघाला होता, त्याच्या चार चाकी गाडीमधून, आज त्याची महत्वाची मिटींग होती, ड्रायव्हरला तो, गाडी फास्ट चालवण्यासाठी सांगत होता, पण नेमका सिग्नल लागला, व सिग्नलला बराच वेळ गाडी थांबली.
           वेळ फुकट जाऊ नये म्हणून, शेखर आपला लॅपटाॅप उघडून, काम करू लागला, ईतक्यात......

          त्याच्या गाडीच्या काचेवर टिकटिक झाली....
   
         आधी तर त्याने दुर्लक्ष केलं, नंतर मात्र आवाज वाढला,म्हणून त्याने तोंड वर करून खिडकीबाहेर पाहिलं असता, त्याला दिसली ......

                  "  पावसात भिजणारी ती..... "

          ती विकत होती, आपल्या "भारत देशाचा राष्ट्रध्वज (तिरंगा )". हो कारण आज " १५ ऑगस्ट " होता ना. तसं शेखरच्या ऑफिसला आज सुट्टीच होती , पण झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी, सर्वांना हजर राहण्याची सुचना, त्याने कालच दिली होती. 

       " झेंडावंदनाचा कार्यक्रम " झाल्यावर, तो एक मीटिंग अटेंड करणार होता, आजच्या दिवशी, सुट्टी असूनही, कारण " काम हीच पूजा " असं मानणाऱ्यांतला तो होता. म्हणून तो आता ऑफिसच्या दिशेने चालला होता. आणि जाता जाता त्याला दिसली होती, सिग्नलवर, आपल्या गरिबीचा बाऊ न करता, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, झेंडा विकून, खुशी मिळवू पाहणारी, त्यासाठी पावसाचीही तमा न बाळगता, प्रामाणिकपणे आपलं काम करणारी......

     ‌                 " पावसातली  ती....."

  🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹👼🌹🌹🌹🌧️🌹🌹🌹

 ©️®️                                
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू    
( वैशाली पडवळ )               

२ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...