माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

" माझा आवडता गोळा "


शाळेबाहेर असायचा , एक गोळेवाला मामा.....
आम्ही सर्व मुलं व्हायचो, तिकडेच मग जमा....


रं किती छान, लाल , पिवळा, हिरवा,निळा.....

       सर्व जणांनाच आवडायचा, तो बर्फाचा गोळा.....
            

 एका एका रंगांची , जणू एक एक कहाणी....

गेले ते दिवस , आणि राहिल्या आठवणी.....


घरा जवळही मिळायचा, रंगी बेरंगी गोळा.....

खायचे मग तो मी, आईचा चुकवून डोळा.....
                       

दिवसामागून दिवस सरले, अन वयही वाढले....

गोळ्या प्रती प्रेम मात्र ,कधीच कमी नाही झाले....
        

आपलासा वाटतो हा, छान आठवणींचा मेळा...

वाटतो मग हवाहवासा , माझा आवडता गोळा....

🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )
            
                     
         ‌


६ टिप्पण्या:

  1. व्वा व्वा सखी अगदी मनातलं बोललीस गं ✍️✍️🌟🌟

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...