सकाळची वेळ असल्याने, (त्यातच दिवाळसणं असल्याने) माझी गडबड चालु होती काम लवकर आवरण्याची, बच्चे कंपनी अजुन गाढ झोपेत होती,मी त्यांना तसंच झोपु दिल ( निदान सुट्टीत तरी आराम मिळावा म्हणून).
मी माझं काम करत असले तरी लक्ष मात्र घड्याळाकडेच ⌚लागलेल होत, कारणही तसंच होतं ना...
आमच्या सोसायटीचा झाडूवाला, अजुन आला नव्हता कचरा नेण्यासाठी, तो एकतर कालही आला नव्हता कचरा नेण्यास, आणी आजही इतकं लेट (रोज ९ च्या ठोक्याला हजर होणारा कचरेवाला, आज १० वाजत आले तरी आला न्हवता, कालचा पेंडीग कचरा आणी त्यात भर म्हणून आजचा कचरा, मला तर खूप राग आला होता कचरावाल्याचा...)
( सोसायटीच्या महिला मंडळाची अध्यक्षा होते मी, असा आगाऊपणा कसा आणी का खपवून घेणार होते मी??)
येऊ देत कचरावाल्याला चांगली, कान- उघाडणी करु त्याची,असं शेवटी मनाशी ठरवून मी कामाला लागले.
थोडा वेळ झाला असेल काम करता करता आणि मग बेल वाजली, मला वाटलं माझे पती आले असतील, जे मुलांना फटाके व त्यांची आवडती गोष्टीची, चित्रकलेची पुस्तक, रंग, मिठाई इत्यादी गोष्टी आणण्यासाठी बाजारात गेले होते.
मी घाईने दरवाजा उघडला (उत्सुकता लागली होती मला त्यांची शॉपिंग बघण्यासाठी, जास्त पैसे तर खर्च केले नाहीत ना त्यांनी?? )
मी दरवाजा उघडला खरा, अन दरवाजाबाहेर माझे पती नव्हते, माझा थोडा हिरमोड झाला कचरावाल्याला समोर बघून, मी लगेच त्याला सर्व पेंडिंग कचरा आणून दिला आणी घड्याळात पाहिल.......
⌚(१० वाजून १० मी. झाले होते.)
मी त्याला कालच्या खाड्याबद्दल तसेच आज उशिरा येण्याबद्दल ओरडणार होतेच इतक्यात.....,
माझं लक्ष त्याच्या उदास चेहऱ्याकडे व रडवेल्या डोळ्यांकडे गेलं , जणू मोठ्या कष्टाने त्याने त्याचे अश्रू थोपवले होते. (त्याची तशी अवस्था बघून मला जरा प्रश्न पडला, रोज इतका हसतमुख असणारा, आपल्या कामाबद्दल लाज न मानता अभिमान बाळगणारा कचरेवाला, आज असा उदास का असेल??)
अचानक माझ्यातली माणुसकी जागी झाली आणि मी त्याला विचारलं, " दादा काय झालं तुम्हाला?? आज इतके उदास का दिसताय?? सर्व ठीक आहे ना???
माझ्या अशा विचारण्याने, तो जणू भारावून गेला, आणि माझ्याकडे पहात राहिला कसल्यातरी विचारात हरवून गेला (कदाचित त्याला सवय नसावी कोणी असे विचारण्याची). मग पुन्हा तो त्याच्या कामाला सुरुवात करत होता, इतक्यात मी त्याला पुन्हा विचारलं, सांगा दादा तुम्ही काल का आले नव्हते, कचरा न्यायला ??
त्यावर तो घाबरतच म्हणाला," मॅडम, माफ करा पुन्हा अशी चूक होणार नाही." (केविलवाणा चेहरा करून माझ्यासमोर हात जोडून उभा होता तो )
नजाने का ? मलाच ते योग्य वाटल नाही..!!
म्हणून मी त्याला म्हटलं," दादा मनात संकोच ठेवू नका, तुमच्याशी सोसायटीच्या महिला मंडळाची अध्यक्षा बोलत नसून, तुमची बहीणच बोलत आहे, असं समजून सर्व सांगा, काय झालं ते काल....
माझं हे बोलणं ऐकल्यावर मात्र त्याचा अश्रूंचा बांध फुटला (मला समजेना, तो कशामुळे रडतोय, माझ्या बोलण्यामुळे, की दुसरं काही कारण....)
माझा गोंधळलेला चेहरा पाहून, त्याने त्याचं आवरलं व मला म्हणाला," ताई, तुम्ही खूप धन्य आहेत, तुमच्यासारखी माणसं, या जगात आहेत म्हणून अजून माणुसकी टिकून आहे." आमच्या सारख्या सफाई कर्मचाऱ्यांकडे फक्त तिरस्काराने बघतो समाज. बोलन तर लांबच राहिल....(आणि खिन्नपणे बघू लागला तो कुठेतरी)
मी म्हटलं,"दादा तुम्ही कचरे वाले नाही, तुम्ही तर सफाई वाले आहात, कचरावाले तर आम्ही आहोत, आम्हीच कचरा करतो सगळीकडे, तुमच्यामुळेच तर आमची सोसायटी, आमचा परिसर, आमच शहर, आमचं गाव, आमचं राज्य नव्हे आमचा देशच स्वच्छ राहतो, त्यामुळे तुम्ही तर सफाईवाले, स्वच्छतावाले, आणि आम्हीच कचरा वाले..☹️☹️☹️
माझ्या बोलण्याने पुन्हा गहिवरून आले त्याला, आणि आणि तो पुढे सांगू लागला, "ताई, तुम्ही मला दादा बोललात, म्हणून सांगण्याची हिम्मत करतोय...."
ताई, काल माझ्या मुलीचा वाढदिवस होता, म्हणून ती खूप हट्ट करत होती, की बाबा आज माझा वाढदिवस आहे, आणि दिवाळी पण, तर तुम्ही नका जाऊ आज कामाला, आजचा दिवस माझ्याबरोबर घालवा, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ही लहानच, ऐकायला तयारच नव्हती, त्यामुळे मला काल जमलं नाही कामावर यायला, आजही ती तसाच हट्ट करत होती बाबा, आज तर भाऊबीज, नका जाऊ कामाला...
कसतरी तिला समजावून आलो कामाला तरीही थोडा उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो मी तुमची...🙏
हे सर्व ऐकून मलाच अपराधी असल्यासारखं वाटु लागल, किती सहजतेने विसरून जातो आपण अशा असंख्य अगणित लोकांच्या कष्टांना, मेहनतीला जी त्यांनी, आपल्यासाठी केलेली असते, आपल्याला दिवाळीची, प्रत्येक सणाची सुट्टी हवी असते, परंतु आपण अशा लोकांच्या मेहनतीचा, त्यांनी दिलेल्या सेवेचा जराही विचार करत नाही, उलट अपेक्षा करतो त्यांच्याकडूनच, अखंड सेवेची (सणासुदीला सुद्धा...☹️☹️, किती स्वार्थीपणे वागतो आपण)....
मग ते दादा पुन्हा जायलाच निघाले होते, त्यांचं राहिलेला काम करण्यासाठी, तर मीच त्यांना म्हणाले, दादा थांबा जरा, आज भाऊबीज आहे, या बहिणीला ओवाळणी करण्याचा हक्क द्या..., या दादा आत या, चिंता करू नका....
माझं बोलणं ऐकावं की न, ऐकावं याच संभ्रमात,
मग मी त्याला म्हणाले, तुमच्या बहिणीचं घर आहे दादा, निसंकोचपणे या.....
इतक्या आग्रहानंतर त्याला येणं भाग पडलं घरात, थोडासा घाबरतच तो आत आला व अवघडल्यासारखा उभा राहिला. मी त्याला सोफ्यावर बसण्यास सांगितले. तो थथोडा संकोचच करत होता, मी त्याला म्हणाले, तुमच्या बहिणीचं घर आहे दादा, चिंता सोडा व निवांतपणे बसा.
मग मी आत गेले, व त्याच्यासाठी चहा घेऊन आले ,(त्याला ☕चहा दिला त्याच्यासोबत मीही चहा☕ घेतला माझ्यासाठी, माझाही ☕चहा राहिला होता सकाळपासून...)
आम्ही चहा पीतच होतो, इतक्यात माझे पती आले, खरेदीच्या पिशव्या हातात घेऊन (फटाके, मिठाई, पुस्तके, रंग इ.)
कचरे वाल्याला घरात चहा पीत बसलेल पाहून त्यांना थोडं आश्चर्य जरूर वाटलं, पण एव्हाना माझ्या स्वभावाची सवय झाल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही, मीही त्यांना सर्व घटनाक्रम सांगून टाकला, त्यांनाही माझं कौतुकच वाटलं, त्यांच्या चेहर्यावरील हलकसं स्मितहास्य बरच काही सांगून गेल, मग ते त्यांच आवडतं पुस्तक📚📖 वाचण्यासाठी बेडरूम मध्ये निघून गेले.
मीही त्यांच्या मागो माग यांचा चष्मा 😎शोधून देण्यासाठी गेले (त्यांचा विसरभोळा स्वभाव माहीत होता ना मला.....☺️), त्यांना चष्मा देऊन परत येत असताना, त्यांनी हातवारे करून हसतच मला खुणावलं कि भावाला ओवाळल्याशिवाय जाऊ देऊ नकोस, मला त्यांचा क्षणभर अभिमान वाटला, भारावल्यासारखे त्यांच्याकडे पहात राहिले मी एकटक, मग त्यांनीच टाळी वाजवून भानावर आणलं मला......... (मी हसतच तिथून निघाले.....☺️, खुप भाग्यवान होतो मी, मला त्यांच्यासारखे समजूतदार, हसतमुख आणि प्रेमळ पती मिळाले होते)
त्याच आनंदात बाहेर आल्यावर, मी सफाई वाल्या दादांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन आले, दादा मात्र पुन्हा अवघडून गेले, उदास झाले.......☹️☹️
मी त्याच कारण विचारलं असता, ते मला म्हणाले, "ताई तुम्ही तर मोठ्या मनाने ओवाळाल तुमच्या या गरीब भावाला, पण माझ्याकडे माझ्या या लाडक्या बहिणीला देण्यास काहीच नाही हो, उलट मीच तुमच्याकडे दिवाळी मागण्याचा विचार करत होतो"......(हे बोलत असताना पुन्हा त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले......😧😧)
मलाही जरा गहिवरून आलं, तरी मी स्वतःला सावरून, दादांना म्हणाले "दादा मन तर तुमच मोठा आहे, गरीब तर ही बहीण आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही स्वतःला का गरीब समजताय, देशसेवेची, मेहनतीची, कष्टांची श्रीमंती आहे माझ्या ह्या भावाकडे, आणि राहिला प्रश्न ओवाळण्याचा तर ती तुम्ही रोजच देत असता मला, आपली सोसायटी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, स्वच्छता राखून, या पेक्षा श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल माझ्यासाठी तुम्हीच सांगा बरं.....??
दादांचा चेहरा समाधानाने उजळून निघाला....😂
मग बहिणीच्या मायेने मी त्यांना ओवाळलं,....
त्यांनीही ताटा चा मान ठेवण्यासाठी ,वीस रु. ची नोट माझ्या ताटात टाकली, आज ती २०/- रू. ची नोट, मला माझ्या सख्ख्या भावाने ओवाळणीत दिलेल्या २००० /- रू च्या नोटेपेक्षा खुप श्रेष्ठ, वरचढ वाटत होती.......😂😂
ते दादा नको नको म्हणत असताना मी त्यांच्या मुलीसाठी, माझ्या मुलीचे नवीनच परंतु वापरात नसलेले सर्व कपडे देऊन टाकले, सोबतच माझ्या पतींने आणलेले फटाके, मिठाई, पुस्तक, रंग हेही दिलं. दादांना खूप आनंद झाला, हात जोडतच, त्यांनी ती बहिणीच्या प्रेमाची भेट स्वीकारली, आमच्या दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, त्यांच या क्षणी आम्हाला वाईट वाटत नव्हतं......😂😂(ही पहिलीच अशी आगळीवेगळी भाऊबीज होती, ज्यात बहिणीने आपुलकीने भावाला भेट दिली होती, आम्हाला दोघांनाही खूप अप्रूप वाटलं ह्या जगावेगळ्या भाऊबीजेच....🙂🙂😇😇
शेवटी पुन्हा एकदा आभार मानून दादा निघाले, मला काही तरी आठवून मी त्यांना थांबवलं, आणि म्हणाले दादा, सर्व सांगितलं पण, तुमचं नाव विचारायचंच राहून गेलं...
दादा मात्र हसून म्हणाले "माझं नाव तर तेच....."
सफाईवाला.....😂😂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
२२ जानेवारी २०२२
माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
हिरकणी माता
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
-
🧚🏻♀️😱😰 तिने भविष्य पाहिले होते ....!! 😰😱🧚🏻♀️ 🌺🌸🌺😱🧚🏻♀️😱🌺🌸🌺 दुपारची वेळ होत...
-
🙏🙏🌺🌺 देवाची माया 🌺🌺🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺 // देवा तूझ्या कृपेची राहो सदा छाया // // राहो देवा अखंड अश...
-
होऊ लहान विसरू भुक- तहान पुन्हा एकदा पुन्हा एकदा विसरु मतभेद हाच ईरादा हाच ईरादा बालदिन सर्वांचा सुखाचा जावा 💐💐💐💐💐💐💐💐💐...
खूप छान संदेश समाजाला पटवून दिला तुम्ही
उत्तर द्याहटवासुंदर संदेश दिला सखी ✍️🌟👌👍👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवामला खूप आवडली कथा..... अस वाटलं खरा प्रसंग आहे 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवामौलिक संदेश देणारी अप्रतिम शब्दगुंफण असलेली कथा!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाह अप्रतिम सुरेख लिहिले माणसानेच माणसाला ओळखले पाहिजे माणूस असूनही जर आपण एकमेकांच्या भावना ओळखू शकलो नाही एकमेकांना समजू शकलो नाही तर आपला माणूस होण्याला काय अर्थ ? आणि भावना या प्रत्येकाला असतात आणि इच्छा, स्वप्न ही सर्वांना असतात त्यात कुणी गरीब-श्रीमंत नसतो किंवा कुणी गुलाम मालिकही नसतो.
उत्तर द्याहटवामस्त लिहिं 👍👍👍👌👌👌👌