ध्यास तुझा, लागला.....
जीव माझा, दंगला.....
आला ह्या, मनी हुरूप......
पाहुनी तुझ, ग रूप.....
अगाध हा महिमा , तुझा.....
वर्णी न्यास, मी खुजा.....
नावे किती, रूपे किती.....
किती सांगू, तुझी कीर्ती.....
गावु तुझी, किती महती.....
किती महान, तुझी शक्ती.....
सान -थोर ,पाया पडती.....
तुझेच ग, गुणगान गाती.....
माया तुझी, ती बघून.....
येते मनी, मग उधाण.....
तुच दुर्गा, तुच काली.....
तुच आहे, शेरा वाली.....
तुच शक्ती, तु भवानी.....
तुच आहे, माता राणी.....
ह्या विश्वाची, तु ग जननी.....
किती वर्णावी, तुझी कहाणी.....
सांभाळ ग, आई आता.....
चरणी ठेविला ग , माथा.....
पोटात घाल , तु ग चुक.....
तुझ्या भक्तीच , मज अप्रुप.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️.....🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुपच सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सखी....🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर रचना ����
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद मॅम...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूपच सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सचिन दादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा