एक मॉडर्न सून अशीही...!!
👩💼👩💼🧚🏻♀️👩💼👩💼👸🧚🏻♀️👸🧚🏻♀️👸👩💼👩💼🧚🏻♀️👩💼👩💼
वसुधा , भोसले घराण्याची थोरली सुन....!!
घरची मोठी सुन असल्यामुळे , अर्थात जबाबदारी तिच्यावरच, कारण दुसरे दोन भाऊ आपआपल्या लग्नानंतर
जागेची अडचण सांगून विभक्त झाले होते.
वसुधाचे पती व सासु तिच्याशी खूप प्रेमाने वागत असत पण तिच्या सासर्यांचा स्वभाव मात्र कडक व शिस्तप्रिय होता, तिला खूप त्रास होत असायचा त्यांच्या स्वभावाचा पण ती हे सर्व सहन करत असे.
एक दिवस मात्र दुर्दैवाने तिच्यावर आघातचं
झाला. एका अपघातात तिच्या पतींचा मृत्यू झाला व त्या धक्क्याने तिच्या सासुबाईंचाही हृदय विकाराच्या झटक्याने तत्काळ मृत्यू झाला. आता वसुधाचे सासरे तिला अजूनच मानसिक त्रास देऊ लागले, तिची काही चूक नसताना या सर्वासाठी तिला जबाबदार धरू लागले, पण तरीही ती सर्व सहन करतच राहिली.
यथावकाश तिचा मुलगा मोठा झाला, व घरात वसुधाची सुनही आली.
आधुनिक विचारांची माॅर्डन सुन...
ती आल्यावर तिने वसुधावर होणारा अन्याय पाहिला, व घराबरोबरचं वसुधाच्या सासऱ्यांचे विचारही बदलले. आणि त्या घरात वसुधाला तिची जागाही मिळवून दिली.
इतकेच नव्हे तर वसुधाचा एकेकाळचा प्रियकर , जो फक्त तिच्यासाठी आज पर्यंत अविवाहित राहिला होता , आणी जो अजूनही वसुधावर तितकचं प्रेम करत होता
सुधाकर...!!
त्याच्याशी वसुधाचा पुनर्विवाह करण्यास वसुधाच्या सासऱ्यांना भाग पाडलं....!!
आयुष्यभर अतोनात कष्ट झेलणाऱ्या वसुधाच्या आयुष्यात , सुवर्णक्षण घेऊन आली तिची अशी ही, आधुनिक विचारांची ....,
मॉर्डन सुन.....!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कथा : काल्पनिक
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
छानच... असा विचार करणारे खुप कमी आहेत लोक
उत्तर द्याहटवामॉडर्न सुन... सुस्वागतम्! सकारात्मक विचार लिहिले मॅडम!✍️������
उत्तर द्याहटवा