🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गुलमोहर सोसायटी आज गजबजून गेली होती. निमीत्त होत सर्वांच्या लाडक्या राधाच्या लग्नाचं...!!
गुलमोहर सोसायटीत विविध जाती-धर्माचे लोक मिळून-मिसळून राहत होते व एकमेकांचे सण , रितीरिवाज आनंदाने निभावत होते. तसे मराठी लोक जास्त होते गुलमोहर सोसायटीत. त्यामुळे जवळपास सर्वच लोक मराठी बोलत असत आणी मराठमोळे गुढीपाडवा , मकर संक्रांत , होळी , दिवाळी इ. सण मोठ्या उत्साहात साजरे होत असत.
पण आज मात्र हे सर्व एकत्र जमले होते सर्वांच्या लाडक्या राधाच्या लग्नासाठी...!!
राधा एक , सुस्वभावी , देखणी मुलगी . फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता तिने. तिचं लव मॅरेज होणार होतं वीवान बरोबर . दोघे एकत्रच होते कॉलेजला. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्याचं स्वप्न होतं दोघांचं. एकमेकांबद्दल प्रेम त्यांच्या डोळ्यात नेहमी दिसायचं , त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नासाठी परवानगी दिली होती व आज थाटामाटात राधाचं लग्न होत होतं...!!
मंडप सजला होता. पाहुणे आले होते. राधाही नववधूच्या रुपात छान सजली होती. तिच्या लाल रंगाच्या हिरेजडित साडीवर , तीच्या हातावरची मेहंदी उठून दिसत होती...!
मेहंदीचा रंग खुलून आला होता राधा व विवानच्या प्रेमासारखाचं. आज राधा व विवान लग्न बंधनात बांधले जाणार होते , एकमेकांचे होणार होते. त्या दोघांसह सर्वजण खुश होते.
पण.....,
नियतीला काही वेगळेच मान्य होते...!!
विवान व त्याचे नातेवाईक विवाहस्थळी येण्यासाठी घरून निघाले खरे , पण ..., दुर्दैवाने एका बसचा ब्रेक फेल झाला असल्याने विवानच्या गाडीला बसची जोरदार धडक बसली व विवान जागीचं गतप्राण झाला...!!
कोणालाही काहीच सुचेनासं झालं. झालेल्या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण होतं. विवानच्या आई-वडीलांना तर ह्या गोष्टीची कल्पनाही नव्हती...!! ( कारण विवानची गाडी सर्वात पुढे होती , त्याच्याबरोबर त्याचे चार मित्र व त्याचा भाऊ एवढेच लोक होते. त्यामुळे फक्त त्यांनाचं या गोष्टी बद्दल माहित होत. )
विवानचा भाऊ मोहनवर तर आकाशच कोसळलं दुःखाचं.
काय करावं , परिस्थिती कशी हाताळावी समजत नव्हतं त्याला , स्वतःला कसं सावरायचं , आई-वडिलांना कसं आणी काय सांगायचं , होणारी वहिनी राधा हिला कसं तोंड दाखवायचं...!??
प्रश्न खूप सारे होते मोहन समोर , पण उत्तर मात्र त्यालाचं शोधायचं होतं....!!
राहून राहून मोहनच्या डोळ्यांसमोर लहानपणापासूनच्या विवानसोबतच्या आठवणी जाग्या होत होत्या , मनाला अजूनच दुःखी करत होत्या तरीही अशा कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखून त्याने स्वतःला सावरले व काय करता येईल याचा विचार करू लागला , शेवटी त्याने मनावर दगड ठेवून एक निर्णय घेतला व त्याच्या मित्रांनाही त्याची कल्पना दिली व विवानवर आहे त्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या स्मशानभूमीत जड अंतकरणाने अंतिम संस्कार केले....!!
नंतर स्वतः विवानचे कपडे घालून व चेहरा फुलांच्या बाशिंगामागे लपवून तो स्वत: विवान म्हणून राधाशी लग्न करण्यास बोहल्यावर उभा राहिला...!!
लग्नाच्या गडबडीत मोहन कुठे आहे , उपस्थित आहे की नाही हे कोणाच्याही लक्षात आले नाही. लग्नाचे सर्व विधी यथासांग निर्विघ्न पार पडले. मोहनच दुःख कोणालाही कळत नव्हतं.
घरी जाताना गाडीत बसल्यावर मात्र राधाने मोहनला ( विवान समजून ) विचारलंचं , " बराच वेळ झाला ,मोहन कुठे दिसला नाही ?? "
यावर मोहनचा कंठ दाटून आला , तरीही आपलं दुःख लपवून तो राधाला हसून म्हणाला , " मी आहे ना मग मोहनची का आठवण येतेय तुला. "
येथे राहिलं तर अनेक प्रश्न उपस्थित होतील , त्यामुळे मोहन लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी राधाला घेऊन नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात गेला ( जाण्याआधी त्याने आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून , आपला चेहरा विवानच्या चेहऱ्यासारखा बनवला होता व विवानची डायरी वाचन वाचुन त्याच्या सवयी सुद्धा आत्मसात केल्या होत्या. राधाला सुद्धा कधी कळालं नाही की तो विवान नसून मोहन आहे.)
राधा मोहनला कायम विवान समजत राहीली व मोहनच्या प्रेम रंगात रंगली तर मोहन राधाला आपली जबाबदारी समजून आयुष्यभर जपत राहिला तिचा विवान बनून , फक्त तिच्या हातावर असलेल्या विवानच्या नावाच्या , मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी...!!
🌹🌹🌹🌹🌹🌹☺️☺️☺️☺️☺️🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
सुंदर कलाविष्कार...✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाशुभ सकाळ 🙏
खुप खुप धन्यवाद सर , शुभ सकाळ...आपला दिवस मंगलमय असो...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर , शुभ सकाळ , आपला दिवस मंगलमय असो...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच छान वैशु ������������
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद रंजुदी...👌👍💐🍫
हटवासुंदर लेखन केले सखी ✍️��
उत्तर द्याहटवाछानच खुलवली आहेस स्टोरी 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर लिहिलंय..खूपच मस्त👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिखाण 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम...👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा...🙏