शिवनेरी वर तुतारीचा, मंजुळ स्वर निनादला.....
माय जिजाऊंच्या पोटी, ढाण्या वाघ जन्मला.....
सवंगड्याना घेऊन, केली स्वराज्याची आखणी....
पाहा किती शोभे बर, राजांची सुरत ती देखणी...
शाहिस्तेखान, अफजलखान शत्रू फार.....
मावळयांचं मात्र,राजांवर प्रेम ते अपार.....
राजांचा राज्याभिषेक, रायगडावर झाला.....
गनिमी कावा मात्र, नेहमीच कामी आला.....
होता जिवा, म्हणून वाचला हा शिवा.....
धन्य ते राजा, धन्य इतिहासाचा ठेवा.....
स्त्रियांचा केला राजांनी, नेहमीच सन्मान.....
म्हणून गाती सर्व,आता राजांचे गुणगान......
कोंढाण्याच्या लढाईत घात असा झाला...
गड तर आला,पण आपला सिंह गेला.....
राजांनी जिंकून घेतले, दुर्ग ही अनेक.....
रयतेच्या रक्षणाची, मनी भावना नेक.....
असे पराक्रमी, माझे राजे निवर्तले.....
नीतीचा वारसा मात्र देऊनी ते गेले...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव.......
जयभवानी.....
जय जिजाऊ.......
जय शिवराय........
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कशी वाटली कविता...??नक्की सांगा...!!
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.....!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
©️®️
✍️........🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
सुंदर रचना!👌
उत्तर द्याहटवाजय शिवराय 🌹🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा🚩जय शिवराय🚩
जय भवानी जय शिवराय 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌🙏🏼🙏🏼
मनापासून धन्यवाद गणेशदा....🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा🚩जय शिवराय🚩
खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा🚩जय शिवराय🚩
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सचिनदादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा🚩जय शिवराय🚩
Khup chaan... 🚩🚩जय भवानी जय शिवाजी,🚩🚩...
उत्तर द्याहटवाखुप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा