माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

अमर प्रेम श्री राधाकृष्णाचे....!!

अमर प्रेम राधा-कृष्णाचे.....!!

💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟 ‌‌


श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ,

हे नाथ नारायण् वासुदेव...!!

हरे कृष्णा कृष्णा कृष्णा ,

राधे कृष्णा कृष्णा कृष्णा...!!

राधा-कृष्ण, प्रभु श्री कृष्ण आणि राधाराणींचे नाव ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो. श्रीकृष्णाच्या नावाआधी राधाराणींचे नाव घेतले जाते, यातच त्यांच्या अमर प्रेमाची महती सामावलेली आहे.

बालपणीची श्रीकृष्ण लीला, कंस वध, गोपिका व राधा राणींबरोबरची रासलीला या सर्व गोष्टी तर आपल्याला माहीतच आहेत. मी एक छोटीसी लेखिका शब्दांत काय वर्णन करणार त्यांच्या अमर प्रेमाचं....!!

प्रभु श्रीकृष्ण हे ऊर्जेचा स्रोत असून राधाराणी संपूर्ण ऊर्जामय आहेत. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व आहेत. अग्नी आणि त्याची धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.

एकदा असेच सोबत बसले असताना, राधाराणींनी प्रभू श्रीकृष्णाला विचारले...,

 "आपण एकमेकांवर इतके प्रेम करत असताना, आपलं लग्न का होऊ शकत नाही ??" 

यावर प्रभू श्रीकृष्ण स्मित हास्य करत उत्तरले.....,

" हे राधे, विवाहासाठी दोन व्यक्तींची आवश्यकता असते, पण आपण दोघे तर एकच आहोत.....!!"

आता मी एक विचारू प्रिये , " अशी एखादी जागा सांग पाहू, जिथे माझं अस्तित्व नाही ??" , प्रभु श्रीकृष्ण थोड्याशा गर्वात म्हणाले.

मोठ्या दु:खी मनाने राधाराणी ऊत्तरल्या.....

              " माझ्या नशिबात "


असे असूनही , ( राधा राणी आणी प्रभु श्रीकृष्णांचा विवाह झाला नाही तरी आजही त्यांच्या अमर प्रेमाचे गोडवे सर्वांच्या मुखी रुळलेले आहेत.....💟)

💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟

©️®️

 ✍️.....🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )

                         


      


५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दगुंफण... निर्व्याज प्रेमाचे मलमली आदर्श म्हणून श्रीराधाजी व णि श्रीकृष्णजी युगानुयुगे राहतील.✍️������
    जय राधाकृष्णजी !����������

    उत्तर द्याहटवा
  2. अजरामर प्रेम आहे ते.....राधे राधे....👌👍✍️🍫🍫

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...