निरोप...!!
निरोप तसा नवीन नव्हताच कधी तिला...
शाळेत सोडवताना आईची पप्पी घेऊन दिलेला निरोप...
लग्नाच्यावेळी पाठवणी करताना सर्वांनी दिलेला निरोप...
माहेरपणाहुन सासरी परतत असताना घेतलेला निरोप...
स्वत:च्या मुलीला सासरी पाठवताना दिलेला निरोप...
तसा प्रत्येकच निरोप पिडामय व दु:खदायीच...पण...,
आजचा निरोप मात्र काळीज पिळवटून , अंतर्बाह्य हलवून गेला तीला...!!
कारण...,
कारण आज निरोप द्यायचा होता तीला...,
स्वत:च्या डोळ्यांसमोर चितेवर जळत असलेल्या...,
स्वत:च्याच निष्प्राण देहाला...!!
😥😥😥😥😥
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️.....🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खूपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम अल्क कथा
उत्तर द्याहटवाखूप छान अप्रतिम 👌🏻👌🏻 निःशब्द
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर..
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा