माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

लेक लाडाची





👶👩👸👩‍🎓👩‍⚕️... लेक लाडाची...👰👩‍⚕️👩‍🎓👸👩👶
    
     आई - बाबा होण्याची खुशी देई ती आजन्म.....
      तुम्हा देण्या कन्यादानाच पुण्य घेई ती जन्म.....

      मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा.....
      तिच्याकडेच असतो तुमच्या संस्कारांचा ठेवा.....

     करू नका तिची आईच्या पोटात असताना हत्या.....
     कमजोर नका बनवू इतकं की करेल आत्महत्या.....

      तुम्ही रागावले असता तिच्यावर, होते ती गप्प.....
      मनात राग असतानाही नेहमी बसते ती चुप्प.....

      तिचा रुसवा काढताना होते तुमचीच फजिती.....
      ती वाढवते पण सासर आणि माहेरची कीर्ती.....

      देते आनंद जेव्हा पहिल्यांदाच बाबा बोलते .....
      सासरी जाताना मात्र ती खुप रडवूनच जाते.....

     नाकी -नऊ आणते कधी तिचा पुरवताना हट्ट.....
     लाडात येऊन मग ती बिलगते कधी कधी घट्ट.....

     मुलींनाच लागतात सोसावे परिस्थितीचे चटके.....
    मनाला शांत करण्या मग सगळीकडे ती भटके.....

     का जाव लागत नेहमी सांगा मुलीलाच सासरी.....
     तिच्या नशिबी असते का हो गरमागरम भाकरी.....

     किती करावे तितके कमीच मुलीचे हो गुणगान.....
     मुलगी देई खुशी,आनंद,शांती आणि समाधान.....

    मुलगी असे हो तुमच्या घराचा जीव की प्राण.....
    प्रेम, जिव्हाळा ,आपलेपण याची असे खाण.....

   मुलगी असे काळीज बापाच, सावली आईची.....
   जाते करूनच परक एक दिवस लेक लाडाची.....

🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏👸👰👩‍🎓👩‍⚕️👩🙏🙏🧚🏻‍♀️🙏🙏  

( ज्यांना मुलगी नाही त्यांनी सूनेलाच माना मुलगी )

😇😇😇😇😇👸👸👸👸👸😇😇😇😇😇
जागतिक बालिका दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 
      🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

                   

©️®️                          

✍....🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )


२२ टिप्पण्या:

  1. Khup sundar rachna....👍👌✍️🍫...मुलीची महती सुंदर रेखाटली आहे..

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...