माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

जगावेगळी

            😇💕....जगावेगळी....💕😇


ऐका हो आज, कहाणी हि तिची खुप आगळी.....
या जगात राहूनही, असे ती किती जगावेगळी.....
 
       तीच आजची दुर्गा, आणि तीच भासते काली.....

       ठेवत असते तीच, साऱ्यांची ख्याली-खुशाली.....

कधी करी माया, कधी आणि डोळ्या पाणी.....
कधी बनत असे मग, ती झाशी वाली राणी.....
  
    करी प्रेम साऱ्यांवर, करून दुसऱ्याची चाकरी.....
   किचेन मध्ये राबतसे, सर्वांना मिळण्या भाकरी.....

दूर ठेवीतसे हो मुद्दाम, ती स्वतःचे सारेच छंद.....
जपण्या साऱ्यांच्या, चेहऱ्यावरचा तो आनंद.....

       आवडे तिलाही पोहणे, गायन आणि वाचन.....
       येता मनास आठवण, आक्रंदते हो तिचे मन.....

करी प्रेमाने सार, करी रोज ती धावाधाव.....
सुटण्याच्या वेळीच येई, काम मग वाढावं.....
      
       रोजच होते तिची अशी , तारे वरची कसरत.....
       स्वतःकडे बघायलाही, नसेच तिला फुरसत.....

दुसऱ्यांच्या आनंदाने, होई खुप तिला हर्ष.....
नाही कळलं मग,सरली वर्षा मागून वर्ष.....

      आजारपणात कुणाच्याही, रात्र जागून काढली.....
      तिची मात्र तब्येत मग, दिवसेंदिवस खालावली.....

तिच्या मनाची स्पंदन, कुणीच नाही जाणली.....
देवी म्हणून ती नेहमीच, दुर्लक्षितच राहिली.....
   
             ठेवलं तिला नेहमीच, परंपरांच्या जोखडात.....
           तिच्याकडूनच अपेक्षा, निभवावी रीत-भात.....

तिनेच द्यावा जन्म, करावं पालन पोषण.....
डोळ्यात मात्र खुपे, तीच ते सुंदर दिसणं.....

              तिच्याही असतात काही, अपेक्षा वेड्या.....
              पायात पडल्या मात्र, नियमांच्या बेड्या.....

देवी म्हणून तिच्यावरच, अत्याचार करणं.....
तिचा चिमुकला जीव, पोटातच संपवणं.....
   
            बंद करा हे नाटक, सर्व सोंग - ढोंग करणं.....
            मुठीत ठेवण्याची तिला, शोधू नका कारण.....

सहन करा हो तिचं, कधी लटक रागावणं.....
आठवा तीच, न सांगताही मन ओळखण.....
     
         तिचं असे दुर्गा, आणी तिचं महिषासुरमर्दिनी.....
       तिच्यामुळेच असे, आनंद तुमच्या हो जीवनी.....

तीच्यापोटी जन्म घेऊन, होती सर्व धन्य.....
तिच्यामुळेच असतं ना, घरात धन धान्य.....
    
     ती असे मंगल, कल्याणकारी, तिचं असे पवित्र.....
    तिच्याशिवाय रखडती, मग घराची सारीच सूत्र.....

अशी ही आजच्या स्त्रीची, कहाणी हि वेगळी.....
सामावून ही ह्या जगात, असे ती जगावेगळी.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🧚🏻‍♀️😊🧚🏻‍♀️🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏

  ( कशी वाटली स्त्रीची कहाणी हि आगळीवेगळी , कळवा देऊन प्रतिक्रिया तुमची जगावेगळी......)

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🧚🏻‍♀️😊🧚🏻‍♀️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️

✍️.....🧚🏻‍♀️ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ)


९ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर, अप्रतिम काव्य रचना ������������✍️✍️✍️✍️✍️����

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच स्वताच्या जोडीदाराच्या मनाचा विचार करून तिच्या बरोबर
    मित्रत्वाचं नातं राखता यायला हवं
    अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...