एके दिवशी अचानक केला, "एलियन" नी हमला.....
पृथ्वीच्या व्यवस्थेचा मग, गडबडला सर्व मामला.....
स्पेस शिप मधूनी, सर्व "एलियन" अवतरले.....
बघून त्यांना सर्व, पृथ्वी वासी मात्र घाबरले.....
डोळे त्यांचे लाले लाल, बंदुका त्यांच्या हाती.....
लहान थोर सर्वांनाच, वाटू लागली मग भीती.....
सगळे लागले इकडे -तिकडे, सैरावैरा पळू.....
साऱ्यांच खोटं अवसान, लागलं जणू गळू.....
कोणीतरी धीर करून, लागलं प्रश्न विचारू.....
अचानक असा हमला, कसा बरं केला सुरू.....
ह्या त्यांच्या प्रश्नावर मग, "एलियन" उत्तरले.....
"ग्लोबल वॉर्मिंग "ने सांगा, कुणाचे भले झाले.....
प्रगती करता करता केला, तुम्ही पृथ्वीचा ह्रास.....
समजवायला सर्व तुह्मास, यावे लागले खास.....
प्रदूषणाचा तुम्ही खूपच, अतिरेक हो केला.....
म्हणून आज केला आह्मी, असा हा हमला.....
अजुन आहे हो वेळ, आवरा ह्या प्रदूषणाला.....
ठेवा थोडंसं भान, सावरा हो जरा स्वतःला.....
असच चालू राहील ,तर अटळ आहे विनाश.....
सोडवण अवघड होईल, हा मोहाचा पाश.....
अचानक मग घड्याळाचा, अलार्म वाजू लागला.....
भयानक दिवास्वप्नातून ,मला जाग करून गेला.....
हुश्श् म्हणून मी, मग एक सुस्कारा सोडला.....
बरच झाल नाही झाला, एलियन चा हमला.....
👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
छानच...👌👌
उत्तर द्याहटवाजेवढ प्रदुषण कमी करता येईल तेवढं कराव किमान प्रयत्न करवा...
खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च👌👌👌👌 🙏🙏
उत्तर द्याहटवावाह! अतिशय सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाSundar rachna...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली ताई..
उत्तर द्याहटवाव्वाव किती सुंदर रचना...!✍️������
उत्तर द्याहटवा