माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

रोबोट ( बालकविता )

 ...... रोबोट...... 🤖



आला आज आमच्या घरी, छान एक रोबोट.....

त्याच्यामूळे मित्रांमध्ये, वाढली ना माझी वट.....
 
आवडायचा तो खूप मला, माझा जीव की प्राण...     

त्याच्यामुळेच असे आनंदी, माझा प्रत्येक क्षण.....

 त्याच नाव ठेवलं होत, मग लाडाने डोरेमॉन.....
आवाज मात्र होता त्याचा ,खरंच खुप छान.....

यांत्रिक असायच्या त्याच्या, सर्व हालचाली.....
करीत असे तो आमच्या, घराची रखवाली.....

 रंग होता खुप छान, त्याचा आगळा वेगळा.....
 त्याच्यावरून ढळत नसे, कुणाचाच डोळा.....

 वेग त्याचा खुप, करी सर्व कामे तो अचूक.....
 करी सर्वांची मागणी पूर्ण, मग तो बिनचूक.....

करायचा माझ्याशी ,अनेक गमती जमती.....
चाले मग दिवसभर ,आमची खुप मस्ती.....

 वागत असे तो माझ्याशी ,थोडासा विचित्र.....
 त्याच्याकडे असायची की, घराची सर्व सूत्र.....

आईची कामात, माझी अभ्यासात, मदत करी.....
माझ्या बाबांभोवती होती, त्याची दुनिया सारी.....

एकेदिवशी त्याच्या यंत्रणेत ,मोठाच बिघाड झाला.....
आणि माझा प्रिय डोरेमॉन, मला सोडून मग गेला.....

अलार्म च्या आवाजाने मग जाग मला आली.....
बर झाल रोबोसह स्वप्नात माझी सैरही झाली.....
 

           
        ..........  🤖 🤖 🤖 🤖 🤖.......

✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू 

( वैशाली पडवळ )

१२ टिप्पण्या:

  1. ओहह..,..एकदम अप्रतिम शब्द रचना...आणि सादरीकरण हि....👌👌👌👌👌👍🙏✍️🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  2. खुप खुप खुपच सुंदर अप्रतिम मस्तच.... 👏👏👏👌👌👌 खुपच सुंदर झालाय .....

    उत्तर द्याहटवा
  3. मस्तच कविता केली आहेस
    आणि सादरीकरण अतिसुंदर 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. क्या बात है एंजल..!
    अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌👌
    किती दाद दिली तरीही
    कमीच की...खूपच छान..👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...