...... रोबोट...... 🤖
आला आज आमच्या घरी, छान एक रोबोट.....
त्याच्यामूळे मित्रांमध्ये, वाढली ना माझी वट.....
आवडायचा तो खूप मला, माझा जीव की प्राण...
त्याच्यामुळेच असे आनंदी, माझा प्रत्येक क्षण.....
त्याच नाव ठेवलं होत, मग लाडाने डोरेमॉन.....
आवाज मात्र होता त्याचा ,खरंच खुप छान.....
यांत्रिक असायच्या त्याच्या, सर्व हालचाली.....
करीत असे तो आमच्या, घराची रखवाली.....
रंग होता खुप छान, त्याचा आगळा वेगळा.....
त्याच्यावरून ढळत नसे, कुणाचाच डोळा.....
वेग त्याचा खुप, करी सर्व कामे तो अचूक.....
करी सर्वांची मागणी पूर्ण, मग तो बिनचूक.....
करायचा माझ्याशी ,अनेक गमती जमती.....
चाले मग दिवसभर ,आमची खुप मस्ती.....
वागत असे तो माझ्याशी ,थोडासा विचित्र.....
त्याच्याकडे असायची की, घराची सर्व सूत्र.....
आईची कामात, माझी अभ्यासात, मदत करी.....
माझ्या बाबांभोवती होती, त्याची दुनिया सारी.....
एकेदिवशी त्याच्या यंत्रणेत ,मोठाच बिघाड झाला.....
आणि माझा प्रिय डोरेमॉन, मला सोडून मग गेला.....
अलार्म च्या आवाजाने मग जाग मला आली.....
बर झाल रोबोसह स्वप्नात माझी सैरही झाली.....
.......... 🤖 🤖 🤖 🤖 🤖.......
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अप्रतिम सुंदर ताई, व्हिडिओ छान
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाओहह..,..एकदम अप्रतिम शब्द रचना...आणि सादरीकरण हि....👌👌👌👌👌👍🙏✍️🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवासुंदर सुंदर व्हिडीओ...काव्य सादरीकरण!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप खुपच सुंदर अप्रतिम मस्तच.... 👏👏👏👌👌👌 खुपच सुंदर झालाय .....
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर खरच मला khop आवडला हा प्रयोग
उत्तर द्याहटवामस्तच कविता केली आहेस
उत्तर द्याहटवाआणि सादरीकरण अतिसुंदर 👌👌👌
वाहा वाहा खुप खुप छान ताई 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवावा, खूप सुंदर मस्त 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान ग 👌🏻👌🏻👌🏻 अभिनंदन 💐💐
उत्तर द्याहटवाक्या बात है एंजल..!
उत्तर द्याहटवाअप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌👌
किती दाद दिली तरीही
कमीच की...खूपच छान..👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏