🤔😞👦....एक बालपण असही....👦😞🤔
मातीत काम करून मळकटलेल.....
उन्हात फिरून मग काळवंडलेल.....
मंदिराच्या पायरीवर उपाशी पहुडलेल.....
शिक्षणापासून असे वंचित राहिलेलं.....
फाटकी, मळकी , जुनी वस्त्र ल्यालेल.....
अपमान अन् निराशेच घोट प्यालेल.....
अन्याय अत्याचाराच्या बेड्यांत अडकलेलं.....
चेहऱ्यावरचं निरागस हसू जणू मावळलेल.....
आनंद सोडून दुःखच वाट्याला आलेलं.....
खेळणं सोडून श्रमच वाट्याला आलेलं.....
आई - वडिलांच्या मायेला पारख झालेलं.....
एक बालपण असही, स्वप्नं विस्कटलेल.....
🌺🌺🌺🌺 🙏🧚🏻♀️🙏 🌺🌺🌺🌺
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
अप्रतिम कविता
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाह्रदयस्पर्शी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌😌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली 👌👍
उत्तर द्याहटवाक्या बात है...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना केली आहे 👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏