🧚🏻♀️😭😭...पश्चातापातले अश्रू...😭😭🧚🏻♀️
फोनची रिंग वाजली, आणि श्री कुलकर्णींनी फोन उचलला, फोन पोलीस स्टेशन मधून आला होता....
त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते,(त्यांची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये बसून अश्रू ढाळत होती ) फोन ठेवला नंतर लगेच तातडीने ते पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास निघाले.....
" श्री. महेश कुलकर्णी " (पेशाने शिक्षक, त्यामुळे शिस्तप्रिय), आपल्या मुलीला त्यांनी खूप मायेने व प्रेमाने वाढवले होते, सुसंस्कार दिले होते, पण त्यांना कुठे माहित होतं, ज्या मुलीला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, (तिच्यासाठी त्यांनी तिच्या आईचा मृत्यू नंतर, दुसरे लग्नही केलं नाही ), आई-वडिलांचं प्रेम एकट्यानेचं देण्याचा प्रयत्न केला.....
तीच मुलगी एक दिवस, त्यांच्या सर्व अपेक्षांचा भंग करून, त्यांच्या प्रेमाचा अपमान करून, त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेचा विचार न करता, एक दिवस तिच्याशी लग्न करण्यास योग्य नसलेल्या मुलाबरोबर पळुन लग्न करेल...
पोलीस स्टेशनला जात असताना, रिक्षात बसल्या बसल्याचं, त्यांचं मन भूतकाळात हरवलं. त्यांना आठवलं सीमाचं बालपण, सीमाने केलेला हट्ट, तिचा केलेला लाड, तिने लावलेला लळा, ते दोघेचं तर विश्व होते एकमेकांचे.....
पण सीमा जशी जशी मोठी होत होती, तसतसं तिचं विश्व व्यापक होत चाललं होतं, आणी एक दिवस अचानक...
सीमा घेऊन आली, तिच्यासोबत एका तरुणाला, त्याचं नाव स्वप्निल होतं, सुखी संसाराची अनेक स्वप्नं दाखवून त्याने जणू भूलचं पाडली होती, सीमाला....
महेश रावांना, तो तरुण बघताक्षणीच आवडला नव्हता, पण मुलीच्या आग्रहापोटी त्यांनी त्या तरुणाची चौकशी केली असता, खूप धक्कादायक गोष्टी समजल्या त्यांना, स्वप्निलबद्दल.......
त्यांनी सीमाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सीमा स्वप्नीलच्या प्रेमात आंधळी झाली असल्याने , महेश रावांना दिलेलं वचन मोडून, त्यांचं प्रेम, माया पायदळी तुडवून, एक दिवस सीमा स्वप्निल सोबत घरातून पळून गेली. घरात होते नव्हते ते पैसे, दागीने घेऊन....
जाताना सोडून गेली होती ती, एक छोटीशी चिठ्ठी , आणी तिच्या असंख्य आठवणी......
महेश रावांच्या तर पायाखालची जमीनचं सरकली होती , ती चिठ्ठी वाचुन, त्यांना समजत नव्हतं, त्यांची चूक नक्की कुठे आणि कोणती झाली, ते खूप प्रेम करत असणारी त्यांची पहिली प्रेमळ पत्नी "लीला" हिच्या अपघाती मृत्यूनंतर, खूप मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं होतं, सीमा कडे पाहून, आणी सीमाचाचं विचार करून, त्यांनी आपल्या नातेवाईकांचा दुसर्या लग्नाचा प्रस्ताव कधीच स्विकार केला नाही. सिमाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची एक इच्छा मात्र सिमा नाही पूर्ण करू शकली, असं पळून जाऊन, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून, त्यांचा कन्यादानाचा हक्कही हिरावून घेतला होता तिने, त्यांच्या पासून......
काळीज पिळवटून निघालं होतं त्यांच, या घटनेने, आणि वर शेजार्यापाजार्यांचे , नातेवाईकांचे टोमणे , कुस्तीत नजरा, अपमानास्पद बोलणे हे सर्व असह्य होऊन, जीवचं नकोसा झाला होता त्यांना, गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्नही केला त्यांनी, पण आपली प्रेमळ पत्नी लिला, हिला तिच्या शेवटच्या क्षणी दिलेला शब्द त्यांना आठवला, कि ते कधीच सीमाला अंतर देणार नाहीत, तिच्यावरची माया आटु देणार नाहीत, सीमाला कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नाहीत, तिच्याकडून काही चूक झाली तर, मोठ्या मनाने, आईच्या मायेने ती चूक पोटात घालतील....😭😭
गळफास घेत असतानाच, आपल्या प्रिय पत्नीचा फोटो पाहून, त्यांना हे वचन आठवलं, आणि गहिवरून आलं, माफ करून टाकलं त्यांनी, सीमाच्या अक्षम्य अपराधाला..... आईचा मायेने......
त्या दिवसानंतर ते शोध घेऊ लागले सीमाचा (जरी तिने चिठ्ठीत अस लिहिलं होत, की माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, तरीही )त्यांच बापाचं काळीज, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं..... त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, सीमाला शोधण्याची, पण त्यात यश न आल्याने, नाई लाजाने शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती (तिथेही त्यांना खूप अपमानास्पद बोल ऐकावे लागले होते, एका कृतघ्न मुलीचा बाप म्हणून....😞)
आणि आज जवळपास तीन महिन्यानंतर, त्यांची मुलगी सिमा सापडली होती, व तिला ओळख पटवुन घरी घेऊन जाण्यासाठी महेशरावांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते.....
रिक्षात बसले असतानाचं , खूप विचार चालू होते महेशरावांचे , सीमा कशी असेल आता ?? (मनात खूप राग असुनही तितकिच काळजी आपुलकीही वाटत होती त्यांना, आपले एकुलती एक लेक सिमाबद्दल....., शेवटी आई व बाप दोघांचं काळीज होत ना त्यांच ).....
रिक्षातून उतरल्यावर घाईगडबडीत त्याचे पैसे देऊन, त्यांनी पोलिस स्टेशन गाठले, आणि इतक्या दिवसांनी सीमाला पाहून त्यांना गहिवरूनच आले......
कारण सिमा ढाळत होती जणू, पश्चातापातले अश्रू......!
सीमाजवळ जाऊन त्यांनी, सिमाला आपल्या छातीशी कवटाळून घेतले, त्यामुळे त्या दोघांचेही अश्रू पाहून कोणत्याही ओळखीच्या पुराव्याची गरज पडली नाही, पोलिसांना.....
( स्वप्निलने सीमाला सुखी संसाराची स्वप्न दाखवून, तिला फसवून तिचे पैसे व दागिने याची उधळपट्टी करून, तिच्याशी शारीरिक लगट करून, तिचा अतोनात मानसिक, शारीरिक छळ करून , तिला देहविक्रीच्या किळसवाण्या गर्तेत ढकलून, कागदाच्या काही तुकड्यांमध्ये तिच्या समोरच तीचे मोल लावून , निघून गेला होता कायमचा, कदाचित तिच्यासारखी दुसरी सीमा शोधायला......)
पण दैव बलवत्तर, आणि महेशराव तसचं मरणानंतरही असलेल्या लिलाताईंच्या मायेमुळेच सीमा वाचली होती पुढील संकटांमधुन.....
महेशरावांनी सिमाला तिचे पश्चातापातले अश्रू पाहून, जरी माफ केले असले , तरी एक सलं मात्र होती त्यांना, की आपल्याला स्वप्निलबद्दल सर्व काही माहित असतानाही, आपण सिमासाठी वेळेवर काहीच करू शकलो नाही, आपण आपलं कर्तव्य निभावण्यात कुठे कमी तर नाही ना पडलो...??
याचं जाणीवेने महेशरावांच्या डोळ्यातही होतेचं....
" पश्चातापातले अश्रू ".....😭
🙏🙏🧚🏻♀️🙏🙏☺️☺️🧚🏻♀️☺️☺️🙏🙏🧚🏻♀️🙏🙏
(कथा, कथेतील नावे, पात्रे पूर्णपणे काल्पनिक, कोणाच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध असल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.....🙏👼)
🙏🙏🧚🏻♀️🙏🙏☺️☺️🧚🏻♀️☺️☺️🙏🙏🧚🏻♀️🙏🙏
©️®️
✍️... ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अप्रतिमच ... लिहिलंय...कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊन टाकतात..पण अनुभव असलेल्या ..कोणत्याही व्यक्तीचे विचार घ्यायला .. बुद्धी होतच नाही..आणि आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात...आईवडिलांनी इतक्या प्रेमाने वाढविलेले असते ते प्रेम..काही महिन्याच्या प्रेमा पुढे फिके कसे वाटू शकते...एका बापची तळमळ खूप सुंदर रेखाटली आहे👌👌👌👌👌☕अप्रतिमच लिखाण..सुंदर कथा. ...बोध घेण्यासारखी की आपण माणसं ओळखण्यात किती चूक करतो आणि फसतो
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर कथा रंगवली झालेल्या चूका सुधारता येत नाही.
उत्तर द्याहटवापण मनातले घाव जाता जात नाही.
सुंदर कथाविष्कार...!������
उत्तर द्याहटवाअतिशय भावस्पर्शी कथा लेखन ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी कथा 👌👌
उत्तर द्याहटवा