📚.........माझे कलाम........📚
टण-टण-टण शाळेची घंटा वाजली,
नेहाची आईही, नेहाला घरी नेण्यासाठी आली होती.
( इतर पालकांप्रमाणेच, घरही जवळचं असल्याने स्कूल बसचही प्रस्थ नव्हतचं), नेहाच्या वर्गशिक्षिका त्यांच्या वर्गातील सर्व मुलांना शिस्तीत, रांगेत घेऊन आल्या, रोजच्या सारखच, पण आज मात्र, नेहाच्या चेहऱ्यावर जास्तच आनंद झळकत होता...
( कारणही तसच होत ना, आज १३ तारीख होती, आज चित्रकला स्पर्धेचा निकाल लागला होता आणि नेहा तिच्या वर्गातून पहिली आली होती चित्रकला स्पर्धेत, आपले राष्ट्रपती "ए. पी. जे. अब्दुल कलाम "यांचे खुप सुरेख चित्र रेखाटले होते तिने, आणि म्हणूनच दोन दिवसांनी, म्हणजेच दिनांक १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत भाषण करण्याची नामी संधी तिला मिळाली होती, तेही तिच्या आवडत्या व्यक्तिमत्त्वा बद्दल, म्हणजेच " ए.पी.जे. अब्दुल कलाम "यांच्याबद्दल, त्यामुळे ती जास्तच खुशीत होती आज.....)
प्रत्येक वर्गातून निवडलेल्या, चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या,एकूण पंचवीस मुलांमधील तीन जणांची निवड वकृत्व स्पर्धेचा विजेता म्हणून केली जाणार होती.
उत्तेजनार्थ मुलांना प्रमाणपत्र तर विजेत्यांना, अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं (विंग्ज ऑफ फायर , पुस्तकाचं अनुवादित पुस्तक- अग्निपंख), बक्षीस म्हणून मिळणार होत, तसच अब्दुल कलाम यांचं चित्र, आणि प्रमाणपत्र, तसच प्रत्येकी ३००/ रू. च रोख रकमेच बक्षीस मिळणार होत, प्रथम येणाऱ्यास तर या सर्व बक्षिसाबरोबरच 🏆ट्रॉफी सुध्दा मिळणार होती, आणि नेहाला ती 🏆ट्रॉफी मिळवायची होती.......
म्हणून शाळा सुटल्यापासून घरी येईपर्यंत, "अब्दुल कलाम " यांच्याबद्दल नाना प्रश्न विचारून, तिने आपली आई लतिकाच डोकं भंडावून सोडलं होत, लतिका तिला म्हणाली होती, मी घरी गेल्यावर गूगल वर सर्च करुन तुला सर्व माहिती सांगते, पण ऐकेल ती नेहा कसली, ती जबरदस्त फॅन होती ना कलाम यांची, लहानपणापासून ती टी.व्ही. , मासिक, वर्तमानपत्र अश्या माध्यमांमध्ये कलाम यांच्या बद्दल पाहत, वाचत, ऐकत आली होती, आणि तिला खुप आदर वाटू लागला होता कलाम यांच्याबद्दल.
तिने आपले पप्पा अरुण यांनाही पुरत हैराण केलं प्रश्न विचारून( अब्दुल कलाम यांच्या विषयी) शेवटी जेव्हा तिच्या मनाच समाधान झालं, तेव्हाच ती शांत झोपली....
तिने दोन दिवस खूप सराव केला भाषणाचा, ( लतिका आणि अरुण ला कंटाळा येईपर्यंत), सरतेशेवटी तिची चांगली तयारी झाली भाषणाची.....
आणि शेवटी तो दिवस उजाडला( १५ ऑक्टोबर- सन्माननिय राष्ट्रपती कलाम यांचा जन्मदिवस सुध्दा).....
ज्यादिवशी तिला तिच्या आवडत्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल भाषण करण्याची संधी मिळणार होती, स्वारी जाम खूश होती आज, कळी खुलली होती तिची.
तिचा उत्साह पाहून कुणालाही शंका नसती वाटली की, प्रथम क्रमांकाची मानकरी नेहाच असेल...( फक्त नेहाला थोडी भीती वाटतं होती, आपण जिंकलो नाही तर, आपल्याला ते पुस्तक अग्निपंख मिळणार नाही..)...🙁🙂
तिचा चेहऱ्यावर संमिश्र भावना होत्या. आनंद ,भीती, दुःख ते पाहून तिच्या वर्ग शिक्षिका कुसुम मॅम नी तिला समजावले, तेव्हा तिची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढला, आणि तिच्या चेहऱ्यावर आता बेचैनी पसरली तिचा नंबर, कधी येणार ? ह्याची....
शेवटी एकदाचा नेहाचा नंबर आला, आणि ती स्टेजवर जाऊन माईक समोर उभी राहिली, हा सुवर्ण क्षण होता खर तर तिच्या आयुष्यातला, तिला सगळ्यांसमोर तिच्या आवडत्या, लाडक्या ए.पी.जे. अब्दुल कलामांबद्दल बोलण्याची संधी मिळाली होती, तिला 🏆ट्रॉफी मिळवायची होती, आत्मविश्वासपूर्वक तिने भाषणाला सुरुवात केली, अगोदर तिने सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, तसच तिच्या सर्व सवंगड्याना नमस्कार 🙏केला आणि पुढे बोलण्यास सुरुवात केली...
🙏🙏🙏🙏🙏
"१५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात "जागतिक विद्यार्थी दीन" म्हणून साजरा केला जातो, कारण ह्याच दिवशी , आपले लाडके , भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पुरस्कारविजेते आपले सर्वांचे आवडते "राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम" यांचा जन्मदिवस असतो.
आपल्या प्रिय राष्ट्रपतीं बद्दल मी इतकुशी लहान मुलगी काय बोलणार, तरी प्रयत्न करते बोलण्याचा......🙏
त्यांच पुर्ण नाव "डाॅ. अबुल पकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम(म्हणजेच ए. पी. जे अब्दुल कलाम).
तामिळनाडू राज्यातील, रामेश्वर या ठिकाणी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील जेनुलाब्दिन आणि माता आशी अम्मा होय.त्यांचे थोरले बंधू किराणा मालाचे दुकान चालवत . कलाम यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना शिकण्यासाठी पैसे दिले होते.
त्या कॉलेजमधून " एरोनॉटिक्स " चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील " नासा " या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने " एरोस्पेस टेक्नॉंलॉजीचे " प्रशिक्षण घेतले.
ज्यांना राष्ट्रपती बनन्या आधी, "भारतरत्न "सन्मान मिळाला आहे अश्या लोकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर कलाम होते. त्यांच्या आधी हा सन्मान डाॅ. सर्वपल्ली राधाकृषणन् (१९५४), आणि डाॅ. झाकीर हुसेन(१९६३) यांना मिळाला होता. "लक्ष्मी सहगल" यांचा पराजय करून कलाम राष्ट्रपती बनले.
कलाम यांनी त्यांच्या कार्यकाळात अत्याचार करणाऱ्या "धनंजय चॅटर्जी" यांच्यां ,"दया याचिकेस" नकार दिला. २००५ मध्ये बिहारमध्ये,"राष्ट्रपती राजवट" लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.२००३ मध्ये त्यांनी "भारतातील समान नागरी कायदा "करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.त्यांचा कार्यकाल २५ जुलै २००२- २५ जुलै २००७ पर्यंत होता.
कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन केंद्र "इस्त्रो" मध्ये कार्यरत होते. कलाम ११ वे राष्ट्रपती होते." "अग्नी क्षेपणास्त्र" च्या यशस्वी चाचणीमुळ जगभरातून त्यांचे कौतुक झाले. देशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रभावी धोरणांची त्यांनी आखणी केली. त्यांनी "अर्जुन "हा रणगाडा व एल. सी. एफ् यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. ते डी. आर. डी. ओ चे प्रमुख ही होते. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामावर त्यांचा भर असे.
आपल्या कार्यपद्धती मुळे ते " लोकांचे राष्ट्रपती" म्हणून ओळखले जात होते.
विज्ञानाचे परम भोक्ता, असणारे कलाम मनाने खूप संवेनशील व साधे होते.त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा तसेच लहान मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. कलाम अविवाहित असून पूर्ण शाकाहारी होते.
बालपण अथक परिश्रमातून व्यतीत केल्यावर विद्येची अखंड साधना करत खडतर आयुष्य जगलेले आणी जगातील मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डाॅ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. पुढील वीस वर्षात विकसित होणाऱ्या भारताचे स्वप्न ते नेहमी पाहत असत. मे २०१२ मध्ये कलाम यांनी भ्रष्टाचाराचा पराजय करण्यासाठी मी काय करू शकतो? याबद्दल भारताच्या तरुणांसाठी एक कार्यक्रम सुरू केला.
त्यांनी अनेक प्रेरणा दायक पुस्तकं लिहिली. त्यांना "मिसाईल मेन "असेही म्हटले जाई. त्यांना "इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार" मिळाला तसच "विर सावरकर "पुरस्कारही मिळाला. त्यांनी कार्यालय सोडल्यानंतर विझिटिंग प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. " रामेश्वरम् ते राष्ट्रपती भवन - डॉ. अब्दुल कलाम हे त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकानं पैकी एक पुस्तक.
२७ जुलै २०१५ रोजी (पृथ्वी नावाचा जिवंत ग्रह तयार करणे या विषयावर ते बोलत असताना ते स्टेजवरून कोसळले. त्यांना "बैथनी हॉस्पिटल" 🏥 मध्ये "हृदय विकाराच्या झटक्यानंतर मृत घोषित करण्यात आले(८३ वर्षे वय), आणि आपला भारत देश एका महान व्यक्तीला मुकला......😒☹️😭😓😢, माझे ए. पी. जे.अब्दुल कलाम आपल्याला सोडून गेले.....😭
अस बोलून नेहाने आपल भाषण तर संपवलं ( पण तिला रडू आवरत नसताना, तिने कसबसं आपल रडू आवरलं...., 🏆 ट्रॉफी जी मिळणार होती..😇😇
टाळ्यांचा घोष च तिला विजयी घोषित करत होता. निकाल सांगण्याची आवश्यकताच नाही पडली.....
सर्व बक्षीस आणि ट्रॉफी🏆 घेऊन ती तीची आई लतिकाला येऊन बिलगली, मग मात्र दोघींनीही रडून घेतलं...पण हे अश्रू मात्र आनंदाश्रु होते....!!
📚📚📚📚📚📚📖📖🙏📖📖📚📚📚📚📚📚
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
वाचन प्रेरणा दिन म्हणजेच राष्ट्रपती ऐ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त....श्री. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन 🙏
व सर्वांना वाचन प्रेरणा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....📚📚📚🙏📖🙏📚📚📚
Very nice
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर सुरेख लेख 👌👌👌
उत्तर द्याहटवाकलाम साहेब.... सुंदर व्यक्तीचित्रणं रेखाटले मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा