बळीराजा....( बळी ?? की राजा ?? )
🙏🙏🙏🧚🏻♀️🙏🙏🙏👳🙏🙏🙏🧚🏻♀️🙏🙏🙏
🙏... रामराम समद्या पाव्हण्यांनो...🙏
मी कोण ??
समद सांगतो, ऊलीसा धीर धरा की....!!
म्या शिरप्या, ( म्हणजे श्रीपत बळवंत भोसले.) आज मी मांडणार आहे तुमच्यापुढं , कैफियत माझ्या दर्दभऱ्या आयुष्याची. ऐकसालं ना लक्ष देऊन , ईळ हाय नव्हं , तुमच्याकडं तेव्हढा....??
तर म्या हाय शिरप्या (तेच ते तुमच्या शहराकडच्या भाषेतलं श्रीपती. ) आमच्या गावाचं नाव वडगावं -बुद्रुक ( एकाच नावाची दोन गावं असली की लहान-मोठे समजण्यासाठी खुर्द आणि बुद्रुक असं म्हणत्यातं नव्हं , जाऊद्या तुम्हास्नी ठाव नसलं ).
तस आमचं हे वडगाव खूप सुंदर गाव बरं. निसर्गानी सौंदर्याची अगदी उधळण केली हाय जणू ,आमच्या गावावर मोकळ्या हातानी. डोंगर- दरी , झाडं , नदी यांनी वेढलेला आमचं गावं म्हंजी स्वर्गचं होता बघा आमचा. सर्व लोकं गुण्यागोविंदाने नांदत व्हती गावात. (तशी छोटीमोठी वादावादी व्हायची बरं गावात, पण मोठी थोरली माणसं सोडवायची भांडणं. आता गावं म्हणलं की बारा भानगडी आल्याचं, न्हवं का ??)
तर अशा आमच्या गावामंदी समदीचं पिक व्हायची की , गहू , बाजरी , ज्वारी , भुईमुग, ऊस , कांदे इ.
मला आठवतयं की, एकदा तुकाराम काकांनी तांदूळ/ भात लावण्याचा प्रयत्न बी केलता की, भाव चांगला मिळतुया म्हणून , पण न्हाय हो पाव्हणं, त्यांचा तो प्रयत्न फसला बघा, अन वरून कर्ज झालं ते वेगळं....😔
तसं सगळ्यांचं बरचं चाललं व्हतं की , पण गेल्या दोन वर्षापासून पावसानी जणू दडीचं मारलीया , आमच्या धरतीमायेला पार भेगा पडल्या होत्या की , आमच्या डोक्यावर ची कर्ज वाढत चालली हायती, अन् अशातचं तुकाराम काकांच्या शेतात त्यांनी गळफास लावून घेतल्याची बातमी आली....👳😔😔😢😢
समदा गाव हळहळला ,आन् माझा बा तर खचून गेला पार , ह्या बातमीनं , त्याचा जीवलग दोस्त होता न्हवं तुकाराम काका. आन् त्याची अवस्थाबी काही यगळी न्हाय न्हवं. पण माझ्या मायनी खूप समजावलं माया बा ला , आपुण ली कष्ट करू पण तुम्ही मामंजीसारखी अन् तुकाराम भावजींसारखं वंगाळ पाऊल न्हाय ऊचलायचं , माह्या बानी होकार दिला होता या गोष्टीला. माया बाचे डोळे भरुन आले कौतुकाने, माह्याकडं बघूनं , त्यांनी वचन दिलं नव्हं आम्हास्नी, कायबी झालं तरी वाईट, वंगाळ कायबी न्हायं करणार...!!
मंग आम्ही समदी डोळ्यातलं पाणी पुसून आन् मन घट्ट करून पुन्ह्यांदा जोमाने कामाला लागलो, लय कष्ट केलं दिस- रातं , ( पोटाला चिमटा घेऊन ), शिवार फुलवलं आम्ही समद्यांनी मेहनत करून ,कांद्याला भाव चांगला होता म्हणून कांदा लावला होता बघा शेतामंदी, मी बारावीला व्हतो त्या साली , म्हावं पूढलं शिक्षणं आता तो कांदाचं ठरीवणारं होता, माह्या बानी अन् मायनी लयी स्वप्नं बघितली हायती बघा
माझ्यासाठी. मी ती समदी स्वप्नं पुरी करणार हायं, लय कष्ट केले त्यांनी आयुष्यभर, म्हातारपणाला त्यांना सुखं द्यायचं हाय मला. आता हा कांदा चांगल्या किमतीला विकला गेला की बास....!!
फुलंल्यालं शिवार बघून , माया बाचं ऊर बी अभिमानानं अन् आनंदानं भरुन येतय बघा. आम्ही समदे खुश हाय आज, ऊदया तो कांदा काढून मग नंतर विकणार हाय माव्हा बा पेठेत नेऊन. मंग आमचे कष्टाचे दिवस संपलेच म्हणून समजा....!!😂😂
पण......, हाय रे आमच्या सर्वांच कर्म.....😢
आमचं फुटकं नशीब शेवटी आड आलचं की , दोन वर्षापासून जणू दडी मारलेला पाऊस , आज लय मुसळधार बरसला , इतका बरसला , का आमच्या समद्या मेहनतीवर पाणीचं फिरवून गेला. आमचं समद पीक आन् आमची सारी स्वप्नं जमीनदोस्त झाली आमच्या डोळ्यांदेखतं , कायबी न्हायं करू शकलो आम्ही.....!!
आन् दुष्काळात तेरावा महिना , हा धक्का सहन न होऊन, माह्या बा नी त्याचं शिवारात आत्महत्या केली , जिथं आम्ही समदी मिळून कष्ट करायचो....!!
माह्या मायलाबी लय मोठा धक्का बसला आन् माझी अवस्था तर ईचारूच नका....😭😭😭
पण तरीबी मला सावरायला हवं , माह्या मायसाठी...!!
फकस्त एकच विनंती हाय, " जय जवान जय किसान अशी नुसती घोषणा देऊ नका , तर त्याचा अर्थबी जरा समजून घ्या, शेतकरी पोशिंदा असतोय तुमच्या समद्यांचा, तव्हां पाव्हणं त्याच्या कष्टांची जाण ठेवून , भाजीपाला विकत घेताना मोल-भाव करू नका , कारण तो आम्ही रक्त आटवून, आमचा जीव गहाण ठेवून पिकवलेला असतोयं , याचं थोडं भान ठेवा"
"🙏👳🙏 राम-राम पाव्हणं यतो म्या, काळजी नका करू, न्हाय आत्महत्या करत मी, कारण मी आत्महत्या केल्यावर तुमचं पोट कसं भरणारं ...!! "
🙏🙏🙏🧚🏻♀️🙏🙏👳🙏👳🙏🙏🧚🏻♀️🙏🙏🙏
रात्र भयाण सरली, पहाट होत आहे...
परी पोशिंदा जगाचा जग सोडून गेला आहे...!!!
भार जगाचा वाहत होता सारा...
देह आज त्याचा दोरीला लटकत आहे...!!!
येतील हजारो मदतीचे हात...
होते दडून जेव्हा होता तो हयात...!!!
जीव ओतून कष्ट केले पण दैवाने ओढून नेले...
काळ्या आईचे मोती पाण्यात वाहून गेले...!!!
होती गरज जेव्हा हात मदतीचे होते मंद...
आज गोळा झाली दुनिया पण आवाज होता बंद...!!!
झालं गेलं आता सगळं ते राहुद्या...
'बळी'च्या बकऱ्याला थोडं 'राजा'सारखं वागू द्या...!!!
👳👳👱👳👳🙏🙏🧚🏻♀️🙏🙏👳👳👱👳👳
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
शेतकरी...देशाचा पोशिंदा !🙏 पण,सरकारी अनास्थेने त्याची दैना कशी होते.हे हृदयस्पर्शी शब्दांत वर्णन केलंय मॅडम!✍️😌😢😢
उत्तर द्याहटवाशेतकरी राजाची व्यथा हृदयस्पर्शी मांडली सखी ✍️🌟👌👌
उत्तर द्याहटवा