माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

हद्दपार


त्या आठवणींना हद्दपार करायच होत
मनातल्या वेशींना मात्र हे मान्य नव्हतं

तुला आयुष्यातून काढून टाकातच होत
मनातल्या भावनांना मात्र शक्य नव्हतं

तुला गुपीत ह्रदयातल हे सांगायच होतं
पण तुला ते ऐकणं मात्र शक्यचं नव्हतं

आठवणीं मला त्या सर्व विसरायच होतं
पण आठवणींनां हट्टीपणाने यायचं होतं

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

५ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...