🙏🎇🎆🎁🎆अशीही एक दिवाळी🎆🎁🎆🎇🙏
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
"उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली"
हेच वाक्य टी. व्ही. वरील जाहिरातीत ऐकुन मोठी झालेली आपली पिढी ( आताही ह्या वाक्यावर आधारित अनेक विनोद, फिरत असतातच मोबाईलवर आणि हे वाक्यही पडत कानावर पण थोड्या बदललेल्या रुपात...😂😂 )
तर हेच वाक्य ऐकून आपण सर्व मोठे झालो, म्हणजे आपल्याला इतकी सवय आहे ना या वाक्याची, नव्हे मोती साबणाची, दिवाळी आणि मोती साबण हे समीकरणच बनून गेले आहे जणू.....
लहानपणी हे वाक्य, मोती साबण याबरोबरच अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत आपल्या सर्वांच्याच......
दिवाळी म्हणजे पणती, रांगोळी, दिवाळी फराळ, नवे कपडे, आणि खुप सारी मजा, खुप सारा आनंद.....
ते दिवाळी पाडव्याच्या दिवशी सुगंधी तेल आणि उटण लावून केलेलं अभ्यंगस्नान.....बायकोने प्रेमाने नवरोबाला ओवाळण...नवऱ्यानेही तितक्याच प्रेमाने बायकोस ओवाळणी म्हणून भेटवस्तु देण...( बहुधा साडीच...😅)
नरक चतुर्दशीच्या दिवशी दाराबाहेर फोडलेल कारीट
( नरकासुराच प्रतीक म्हणून )......
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेली लक्ष्मीची पूजा
( घरातील नवीकोरी केरसुणी, पैसे, सोन्याचे दागिने ई. ठेवून करण्यात आलेली पूजा), पांढरेशुभ्र बत्तासे ,लाह्या , धने - गुळं याचा नैवैद्य , अगरबत्ती , धुप यांचा सुगंध......
भाऊबीजच्या दिवशी वेड्या बहिणीची भावाप्रती
वेडी माया, बहिणीच प्रेमाने भावाला ओवाळणं.....
किती भारलेले, मंतरलेले दिवस असायचे ते...
( आताही असतात पण आता इतकं नाही.., आताच्या पिढीला हे सगळ साग्रसंगीत अनुभवायला मिळेलच असं नाही...😔😔, काही ठिकाणी मिळत असेलही त्या लहानग्यांना असा अनुभव पण ते फक्त अपवादानेच....🙁🙁)
आपल्याा लहानपणी किती मजा करायचो ना आपण दिवाळीला.....
आम्ही तर सर्वजण खूपच मस्ती मजा करायचो, शेजारच्या काकूंना फराळ करण्यात मदत करायचो, आई घराची साफसफाई करत असताना उगाच मध्ये मध्ये लुडबुड कराचो आणि कधी कधी आईचं कौतुक तर कधी ओरडा ऐकायला भेटायचा....☺️☺️
दिवाळीच्या दिवसांत तर रांगोळी हा जिव्हाळ्याचा विषय असायचा सर्वच जणींचा..!!
एकमेकांच्या मदतीने छान ,सुंदर रांगोळी काढणं
( कलर कमी पडला तर मैत्रिणीकडे उधार मागून रांगोळी पूर्ण करायची. रांगोळी वाला त्याची हातगाडी घेऊन आला की मग कलर विकत घेऊन उसना घेतलेला रंग परत करायचा....😂😂) पण रांगोळी मात्र आकर्षक असायला हवी, लक्ष वेधून घेणारी..... आता मात्र स्वतःची रांगोळी काढायला वेळ नसतो कधी कधी 🙏 😂😂 ( रांगोळीच्या साच्याच्या मदतीने रांगोळी काढतात आजकाल, उरकायच म्हणुन उरकुन घेतलं जात🙏 जागेचाही अभाव असतोच....😂😂)
ह्या सर्वाबरोबरच दिवाळीचा गृहपाठ असायचा दिलेला , छंद वही सुद्धा सांगितलेली असायची बनवायला शाळेतून,ज्याचा विषय दर वर्षी वेगळा असायचा. ज्याची छंद वही सर्वात छान असायची त्याला बक्षीस ही असायचं...!!
गृह पाठात पाढे लिहा, ठिपके जोडून चित्र रंगवा, कंदिलाच चित्र, रांगोळी काढून रंगवणं, अस सगळ असायचं गृहपाठ वहीत करायला, खुप मजा यायची हे सर्व करायला......😂☺️😇
फटाक्यांच्या आतषबाजीच तर विचारूच नका,
🎇🎆💥✨💫🌠🎆🎇💥⭐✨💫🌟🌠🎆🎇
इतकी धमाल करायचो आम्ही सर्व, खूपच मजा यायची....कोणाचे फटाके संपले तर आम्ही देत असू एकमेकांना फटाके वाजवायला ( हे तुझ - ते माझं अस काहीच नसायचं खरं तर...)
आता मात्र जरा वेगळचं चित्र मिळतय पाहायला, फटाक्यांच्या वाढलेल्या भरमसाट किमती ,कमाईही वाढली तशी तेव्हाच्या तुलनेत, पण तरीही मिळकत आणि खर्चाची सांगड घालताना नकी नऊ येतात सर्वांच्याच....🙏☺️ त्यामुळे फटाके वाजवण्याच प्रमाण कमीच, एका अर्थाने बरचं म्हणा, प्रदूषणाला आळा बसतो जरा..त्यातही फटाके दुसऱ्या कुणाबरोबर वाटून घेणे म्हणजे ...बोलायलाच नको, आतेभावंड, मामे भावंडं, चुलत, मावस भावंडं यांच्याबरोबर सुद्धा वाटून घेत नाही मुलं फटाके....🤔🙄 आपलीच चूक असावी कदाचित, आपण शेअर करायला शिकवण्यात कमी पडलो बहुधा ह्या पिढीला...🙁🙁...असो..!!
दिवाळीच्या वेळी नवीन कपडेही भेटायचे घालायला..त्याच तर विशेष कौतुक असायचं, जोपर्यंत आजूबाजूच्या सर्व काकूंना कपडे दाखवत नसू तोवर चैन पडत नसे.....
( तेव्हा नवीन कपडे वाढदिवस आणि दिवाळीलाच मिळायचे फक्त त्यामुळे अप्रूप असायचं नवीन कपड्यांचा खुपचं....😅)
विशेष म्हणजे, भाऊबीजेला ओवाळणी म्हणून जमा झालेल्या पैश्यांतूनही कपडे घ्यायचे, तेव्हा कपडेही स्वस्त असायचे आता पेक्षा ( तेव्हा दीड दोन हजारात सर्वांचे नवीन कपडे घेऊन व्हायचे...., दिवाळीला आता मात्र एकाच व्यक्तीला लागतात तितके ब्रँडेड कपड्यांसाठी..., बरोबर ना..?.. क्षमस्व🙏😂)
हल्ली , दिवाळीत सुद्धा बहीण भावाची भेट होईल का..?? याबद्दल खात्री नसते...( कटु सत्य, कारण आपण आत्मकेंद्री बनत चाललो आहोत सर्व, सगळ्यांचे आपापले वेगळे प्लॅन्स ठरलेले असतात दिवाळीचे..., हा अजुनही आवर्जुन निभावली जाते भाऊबीजची प्रथा, मी सांगितलेली स्थीती अपवादानेच दिसते, तरीही पहिल्यासारखी आपुलकी, जिव्हाळा मात्र नाही दिसून येत आता, हेही तितकचं खर....)
तरीही अजुनही दिवाळीचं महत्व मात्र तसचं अनन्यसाधारण आहे आपल्या आयुष्यात, आजही आणि नेहमीच राहील तसच...!!
माझ्या सर्व वाचक , लेखक, मित्र, मैत्रिणी, बंधू ,भगिनी आणि त्यांच्या परिवारास मी आणी माझ्या परिवारातर्फे....,
"दिवाळीच्या लक्ष - लक्ष शुभेच्छा, शुभ दिपावली"
🎆 " दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा " 🎆
आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत,
आपल्या जीवनात सुख - समृद्धी नांदो, आपल्याला सुदृढ आरोग्य मिळो हीच माझी बाप्पाचरणी प्रार्थना... 🙏🙏🙏🙏
मित्रमंडळी , मला एक विचारायचं आहे तुम्हा सर्वांना, खरतरं मलाही तो प्रश्न पडलाच आहे स्वतःला...!!
आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो, आपल्या पद्धतीने, आपल्या बजेटनुसार, जमेल तेवढा, वाटेल तितका खर्च करतो, काही गोष्टींकडे दिवाळी आहे, होऊदे खर्च म्हणून दुर्लक्ष करतो, पण आपण हा विचार कधीच नाही करत...!!
आपल्यापेक्षा आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेले, गरीब असलेले लोक आपली दिवाळी कशी साजरी करत असतील......???🤔🤔😞😞
पेटत असेल का दिवा त्यांच्याही घरात दिवाळीला ?? मिळत असतील का त्यांनाही फराळाचे पदार्थ ?? त्यांच्या नशिबात असतील का नवे कपडे , दिवाळी फराळ, फटाके ?? त्यांचं घराचं अंगणही होत असेल का रांगोळीने सुशोभित ?? येत असेल का लक्ष्मी माता त्यांच्याही घरात ??
दिवाळी घेऊन येत असेल का तोच आनंद त्या गरिबांच्या , आर्थिक दुर्बल लोकांच्या चेहऱ्यावर ....??? जो आपल्या चेहऱ्यावर असतो ??☺️🤔
खरंच खुपच अंतर्मुख करणारा प्रश्न.....
कल्पनाही करवणार नाही आपल्याचाने त्या दुःखाची,त्या उनिवेची, त्या अभावाची, त्या वेदनेची......
आर्थीकदृष्ट्या दुर्बल खुप लोक असतात, आहेत... अगदी आजच्या जमान्यात ही....आपल्याच आजूबाजूला पण...,
आपण स्वतः मध्ये इतके गुंतलेले असतो की आजूबाजूला लक्षचं नाही जात आपलं...!!
ह्या सर्व गरीब लोकांना आनंदी राहायचा, दिवाळी साजरी करण्याचा, खुश राहण्याचा अधिकारच नाही का????
नाही मी मान्य करते की , त्यांच्या आर्थिक परिस्थिती साठी आपण जबाबदार नाही, पण तीही आपल्यासारखीच माणसं आहेत आणि देवाने त्यांना गरीब बनवलं यात त्यांची काय चूक?? आपण सर्व त्यांच्यापेक्षा थोड्या, म्हणजे बऱ्याच प्रमाणात चांगल्या आर्थिक परिस्थितीत आहोत, आणि म्हणूनच....,
माणुसकी म्हणून हे आपलं कर्तव्य नाही का, की आपण त्यांना थोडीशी मदत करावी....???
(आर्थिक स्वरुपातच असावी मदत असंही काही नाही, कोणत्याही स्वरुपात करु शकतो आपण त्या गरजू लोकांना मदत, म्हणजे ......
(१)आपण त्यांना दिवाळीचा फराळ देऊ शकतो.......
( घरी बनवलेला असेल तर ऊत्तमच, अन्यथा बाजारातुन विकत घेऊनही देऊ शकतो....😂😂)
(२)त्यांना थोडेसे फटाके घेऊन देऊ शकतो....( शक्य असेल तर...)
(३) आपल्याला जमत असेल तर नवे, अन्यथा आपण वापरत नसलेले पण सुस्थितीत असलेले कपडे देऊ
शकतो.......( असे कपडे असतातच आपल्याकडे जे घालावेसे वाटत नाहीत, आणि टाकून देण्याचीही हिम्मत होत नाही आपली, असे कपडे आपण नक्कीच देऊ शकतो त्या गरजवंतांना.....)
(४)आपण कंदील देऊ शकतो त्यांना...(जे आपण घरीही कमी खर्चात बनवू शकतो, आपल्या चील्या- पिल्यांचीही मदत घेऊ शकतो ह्या कामात, मुलांना आणि आपल्यालाही आनंद भेटेल आणि संस्कारही होतील त्यांच्यावर चांगले.....
(५)पणत्या, केरसुणी(लक्ष्मी)रांगोळीचे रंग, रांगोळीचे साहित्य, मिठाई, जुन्या सुस्थितीत असलेल्या चप्पल, बूट ई.देऊ शकतो आपण अश्या लोकांना.....
(६)आपण त्यांना गोष्टींची, कलरिंग बुक, कलर, शालोपयोगी साहित्य देऊ शकतो( हेही कपड्यांसारखचं सुस्थितीत असलेले, पण वापरलं जात नाही आणि टाकणं जीवावर येतं असं साहित्य....)
(७)आणि सर्वात महत्त्वाचं यातलं काहीच नाही जमलं तर निदान अश्या लोकांना भेटून, त्यांना हस्तांदोलन करून हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.....
( बरोबर ना, आणि त्यासाठी पैसे नाही तर आपला थोडासा अमूल्य वेळ मात्र खर्च करावा लागेल.....😂😂☺️☺️)
तर जे मला सुचलं ते मी सांगितलं, तुम्हाला अजुन काही सुचत असेल तर कमेंट मध्ये सांगाच
( ज्याने सर्वांना दिशा मिळेल एक वेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी...)
मला खात्री आहे तुम्ही जरूर एखादा यातील किंवा तुम्हाला सुचलेला मार्ग निवडाल दिवाळी खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी........
आपण निवडलेल्या ह्या मार्गाने थोडीशी आर्थिक, वेळेची झळ बसेल ही आपल्याला, पण त्या गरीब , गरजवंत लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदा समोर हे नुकसान काहीच नाही, शिवाय जितका आनंद त्यांना भेटेल तितकीच प्रार्थना ते आपल्या सुख समृद्धी साठी करतील देवाकडे, तोंड भरून मायेने आशीर्वाद देतील ते आपल्याला, कौतुकच करतील ते आपलं आणी ते सर्व कौतुक ऐकुन ,त्यांचा आनंद बघून आपल्यालाही जाग जिंकल्याचा आनंद होईल, आपली फक्त दिवाळीचं नाही तर सर्व आयुष्य समृद्ध होईल, सार्थकी लागेल...पटतयं ना मित्रमंडळी...??
आपल छोटंसं पाऊल आणेल , त्या गोरगरीब, उपेक्षित लोकांच्या जीवनात आनंद आणि त्याचे पडसाद उमटतील आपल्या आयुष्यात.....बरोबर ना....
बघा माझ्या वाचक/ लेखक, मित्र - मैत्रिणींनो, बंधू - भगिनींनो मला जे योग्य वाटल ते मी सांगितलं....... (काही चुकलं असेल तर क्षमस्व......🙏🙏 लहान तोंडी मोठा घास घेतला अस समजुन माफ करा मला....☺️☺️),पण तरी एकदा विचार जरूर करा ह्याबाबतीत, ही नम्र विनंती आपल्या सर्वांना...🙏🙏☺️☺️
माझा हा लेख आणि आयडिया तुम्हाला कशी वाटली ?? तुम्ही काही करायचं ठरवलतं, केलंत तर नक्कीच कळवा मला..!!
माझ्या ह्या लेखाने एका गरिबाच्या चेहऱ्यावर जरी आनंद आला तरी माझी ह्या वर्षीची दिवाळी सार्थकी लागेल......
आनंद भेटेल मला आणि तुम्हालाही...हो ना..??😇
पुन्हा एकदा माझ्या तमाम वाचक, लेखक , मित्र - मैत्रिणींना, बंधु - भगीनींना आणी आपणा सर्वांच्या गोड परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा......🙏🙏🙏
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
बालपणीपासून ते सांसारिक जीवनातील दिपावलीच्या सुंदर आठवणी लिहिल्या मॅडम.. सुंदर रचनाशैली!��✍️������
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवासगळे बालपणनाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्यात
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद देवदादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय सुंदर आठवणी 👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...👌👍💐🍫
हटवाखुप छान आठवणीं सांगितल्यास आणि तितकाच छान संदेश दिलायस 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवामन:पुर्वक धन्यवाद गणेशदा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासंपुर्ण दिवाळी आणि त्या दिवाळीची सजावट आकषॅक चित्रे टाकुन हा लेख खुप छान लिहिला वैश्युताई 👍👍👍👍👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद मोहनदा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा१९७० ते १९९० या दशकात जन्मलेल्या मुलांच्या दिवाळीतील गोड आठवणी सुंदर लिहील्या आहेत... आणि खूप सुंदर msg ही दिला आहे..खूप सुंदर लिखाण...अप्रतिमच👌👌👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवादिवाळी अगदी घरात आल्यासारखं वाटलं...सुरेख लेख...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवा