माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

मनाची तृप्ती ( हायकु काव्यरचना )

झालयं मन
आज पाखरासम
सोन्याचा दिन

सोन्याचा दिन
राहो असा सदैव
हेच मागणं

हेच मागणं
माझं आहे बाप्पानां
हेच सांगणं

हेच सांगणं
व्हावीच स्वप्नंपुर्ती
नित्य प्रगती

नित्य प्रगती
होत रहावी सदा
यशाची प्राप्ती

यशाची प्राप्ती
देतसे समाधान
मनाची तृप्ती

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


आज " डॉ. सलीम अली " यांचा जन्मदिवस म्हणजेच...,
" जागतिक पक्षी दिन "

सर्व पक्षीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

२ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...