ई.स. २ मार्च १६६०ला सिद्दी मसूद याने पन्हाळगडास वेढा घातला व राजे अडचणीत सापडले. पुढे पावसाळ्यातही मसुदचा हा वेढा सुटेना. या गंभीर परीस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी शिवरायांनी " शिवा काशिद " यांच्यासह मिळून गनिमी कावा केला. शिवा काशिद यांची अंगकाठी व नावं राजांशी मिळतं-जुळतं असल्याने राजांची ही क्लृप्ती कामी आली व सुमारे १३ जुलै १६६० रोजी महाराज पन्हाळगड्याच्या वेढ्यातुन निसटले.
काही वेळानंतर सिद्धी मसुदला सत्य कळाले व त्याने अतिशय निर्दयीपणे शिवा काशिद यांची हत्या केली तर ३००० सैनिकांची एक तुकडी शिवरायांच्या मागावर पाठवली. पुढेही शत्रु व मागेही शत्रु अशी त्यावेळी शिवरायांची अवस्था झाली. अशावेळी प्रसंगावधान राखत बाजीप्रभू व त्यांचे बंधु फुलाजी प्रभु यांनी राजांना विशाळगडाकडे कुच करण्यास सांगीतले.आम्ही तोपर्यंत खिंड लढवतो असे वचन दिले ,परंतु बाजी ईतर मावळ्यांना अशा गंभीर परीस्थितीत सोडून जाण्यास राजांच मन मानतचं नव्हतं...मग बाजींनी थोडसं दरडावून व निक्षुन राजांना सांगितले की...,
" राजे , लाख मेले तरी चालतील ,परंतु लाखांचा पोशिंदा जगायलाच हवा , तुम्ही निश्चिंत मनाने विशाळगडाकडे निघा व गडावर पोहोचताच तोफांना बत्ती द्या. जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही , तोपर्यंत एकाही गनिमाला ईंचभर पुढे हलू देणार नाही. "
हे ऐकल्यावर मात्र राजांचा नाईलाज झाला व जड अंतःकरणाने ते ३०० मावळ्यांसह विशाळगडाकडे रवाना झाले.
उरलेल्या ३०० मावळ्यांसह बाजी प्रभू, फुलाजी प्रभु प्राणपणाने लढले. अनेक वार बाजींच्या अंगावर झाले..पण बाजींना तसुभरही फरक पडत नव्हता. हर हर महादेव म्हणत हा नरसिंह त्वेषाने शत्रुंवर तुटुन पडत होता. बाजींचा हा जोश बघुन मावळ्यांच्या अंगातील रक्तही ऊसळत होत. दोन्ही हातात तलवारी घेऊन बाजी शत्रुला कापत होते. बाजी लढत असले तरी त्यांच सगळं लक्ष तोफांच्या आवाजाकडेच लागलं होत. दोन्ही बाजूंच्या या धुमश्चक्रीत एक घाव बाजींच्या वर्मी लागला... तरीही बाजी लढतच राहीले... तोपर्यंत... जोपर्यंत विशाळगडाहुन तोफांचा आवाज आला नाही.... अखेरीस तो आवाज आला व बाजींनी समाधानाने आपला प्राण सोडला.
बाजींच्या मृत्युनंतर मावळेही मारले गेले. मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली घोडखिंड या घटनेनंतर "पावनखिंड" म्हणून ओळखली जाऊ लागली.
धन्य होते सर्व मावळे , धन्य होती त्यांची शिवरायांवरील निष्ठा....धन्य होते शिवराय...!!
मानाचा त्रिवार मुजरा सर्व मावळ्यांना व शिवरायांना
...🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️...
🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ)
११ फेब्रुवारी २०२२
सुंदर लेखन केले सखी ✍️✍️🌟
उत्तर द्याहटवाहर हर महादेव
उत्तर द्याहटवाजय शिवराय 🙏🏼🙏🏼
खुप सुंदर लेखन 👌👌👌👌
वा खूपच सुंदर आणि अतिशय महत्त्वाची अशी ऐतिहासिक घटना सांगितली वैशू मराठ्यांचे हे बलिदान पाहून आणि शिवरायांप्रती त्यांच्या सैनिकांची ही एकनिष्ठता पाहून खरोखर छाती अभिमानाने फुलून जाते आणि त्यांचे हे बलिदान पाहून डोळ्यांमध्ये अश्रू येतात 😥 खूप मस्त लिहिलंय अशीच लिहित ✍️✍️✍️ रहा तुझ्या पुढील सर्व लिखाणाला मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🍫🍫🍫👌👌👌👍👍👍
उत्तर द्याहटवा