ई. सन १४ एप्रिल १६७५ रोजी
मोहीतेंच्या घरी कन्या जन्मली
पत्नी राजारामांची ती जाहली
महाराजांची स्नुषाही शोभली
वैधव्यानंतरही नाही ती खचली
मराठ्यांची गादीही सांभाळली
बाळाजी , उदाजी आदी सोबत
पन्हाळा किल्ला लढुन जिंकली
कारंजा राजधानी तिने बनवली
रामचंद्रपंत अमात्यांच मार्गदर्शन
ईतिहासातील यशस्वी स्त्री ठरली
भद्रकाली ठरवले सार्थ संबोधन
मोघलांशी नेहमी लढत राहीली
रणरागिणीच ताराराणी बनली
९ डीसेंबर १७६१रोजी निवर्तली
अंजिक्यतारावर समाधीस्त झाली
🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺👸🏻🤺
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
१३ फेब्रुवारी २०२२
सुंदर शब्दगुंफन केली आहे सखी ✍️🌟👌👍👍
उत्तर द्याहटवासुंदर लिखाण
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लिखाण 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा