माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

" भुलोळी "


नमस्कार मित्रमंडळी...🙏🧚🏻‍♀️😊💐

आज आपल्यासमोर " भुलोळी " हा एक नवीनच काव्यप्रकार सादर करताना मनास खुप आनंद होत आहे...!!

भुलोळी या मनास भुलविणाऱ्या सुंदर , अभीनव  काव्यप्रकाराचीची निर्मीती आदरणीय कवीवर्य ,लेखक श्री." पुरुषोत्तम पटेल " सर व त्यांच्या पत्नी सन्मानीय कवयित्री सौ. पुष्पा पटेल ( पुष्पम ) या दोघांनी मिळून केलेली आहे...या काव्यप्रकाराचे नियम मला त्यांच्याकडूनच समजले...जे पुढीलप्रमाणे आहेत...,


🔸एकुण चार ओळींची रचना...,

🔸पहीली ओळ - हिंदी - अक्षरसंख्या - ८

🔸दुसरी ओळ - मराठी - अक्षरसंख्या - १० 

🔸तिसरी ओळ - हिंदी - अक्षरसंख्या - १२ 

🔸चौथी ओळ - मराठी - अक्षरसंख्या - १४ 

🔸 दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक...!!

" भुलोळी " हा मनाला भुलवणारा काव्यप्रकार शिकविणारे पुरूषोत्तम सर व त्यांच्या सुविद्य पत्नी , कवयित्री सौ. पुष्पाताई पटेल  ( पुष्पम्) या माझ्या दोघाही आदरणीय गुरुवर्यांना वंदन करून आपल्यासमोर सादर करते माझी पहीलीच " भुलोळी "

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


देखके तुझे सनम

घायाळ झालंय माझ मनं

आके मेरे सपनोंमे रोज तुम

वाढवतेस ग माझ्या मनाच स्पंदन

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

माझा " भुलोळी " लिहीण्याचा हा पहीलाच प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा...व अशा आणखी रचना वाचण्यासाठी नेहमी भेट देत रहा....,
माझ्या " साहित्यविश्वाला...!!
" धन्यवाद सर्वांचे...🙏🧚🏻‍♀️😊💐🍫

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

✍️.....🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

८ टिप्पण्या:

  1. अरे व्वा खूपच अप्रतिम रचना केली एंजल मस्त प्रयत्न केला ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...