माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

बिन फेरे हम तेरे




नको वाटते आम्हाला आजकाल लगीनघाई...!!
लिव-इन-रिलेशनशिपची वाटे नवी नवलाई...!!

खूपच भयानक आहे पाश्चात्त्य संस्कृतीचं खुळ...!!
हलून न जावे त्यामुळे भारतीय संस्कृतीचं मूळ...!!

पुरुषप्रधान संस्कृतीला आहेचं ही ऊपकारक... !!
स्त्रियांसाठी ठरे मात्र ही संस्कृती हानिकारक...!!

पुरुषाच्या अन्यायाला राहत नाही जेव्हा हद्द...!!
स्त्रीलाच नडते तिच्या आधुनिकपणाची जिद्द...!!

फायदे कमी आणी आहेत मात्र तोटेचं जास्त...!!
करावे सर्व भारतीय स्त्रियांनी लग्न बिनधास्त...!!

पश्चिमेलाचं शोभतात सर्व आधुनिकतेचे वारे...!!
आपल्या भारतासाठी मांडवातील लग्नचं बरे...!!


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

१२ टिप्पण्या:

  1. अगदी बरोबर बोललीस सखी आपलं मांडवातल लग्नचं बरं ✍️👌👌👌 वास्तव मांडले ✍️👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. चिंतनशील कविता....मॅडम, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भारतीय अविभक्त कुटुंब पद्धतीला आणि संस्कृतीला मारकच! अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...