🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🏖️🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊
"रुपेरी वाळुत माडांच्या बनात ये ना"
" चंदेरी चाहुल लावीत प्रितीत ये ना"
" बनात ये ना...जवळ घे ना...हाय..."
हे गाणं ऐकलं...की आपसुकच आठवतो...रम्य सागरकिनारा...!!
आपल्याला सर्वांनाच आवडतो..आपलासा वाटतो
" सागरकिनारा.."
सुर्योदय , सुर्यास्ताच विलोभनीय दृश्य पहायचं असेल...भेळ खात..मित्र- मैत्रींणीसोबत मजा करायची असेल...तर योग्य जागा म्हणजे
" समुद्रकिनारा "....हो ना...??
समुद्राच्या लाटांचा आवाज...मन सुखावणाराच...मन नैराश्याने ग्रासलेल असेल...काय करावं काही सुचत नसेल...कुणाशी बोलावंसं वाटत नसेल...एकांत हवा असेल...तर...,
हमखास...आपली साथ देणारा...आपलं म्हणणं शांतपणे ऐकुन घेणारा एक मित्र असतोच...,
" समुद्रकिनारा "
याच समुद्रकिनाऱ्याशी किती आठवणी जोडलेल्या असतात आपल्या...काही चांगल्या..तर काही वाईट...पण...या आठवणींचा साक्षीदार असतो आपला आवडता हाच " समुद्रकिनारा... "
वरवरं शांत भासणारा हा समुद्रकिनारा म्हणजेच पर्यायाने समुद्र नजाणे कितीतरी वादळ घेऊन बसलेला असतो मनात..अगदी स्थितप्रज्ञासारखा...!!
आपलं मनही असंच असतं ना...समुद्रकिनाऱ्यासारखचं...
कितीतरी विचारांच्या , ईच्छांच्या , अपुर्ण स्वप्नांच्या लाटा आदळत असतात दररोज मनाच्या किनाऱ्यावर...मनाच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या या लाटा शांत करण्यासाठी...शेवटी प्रत्येकाला गरज भासतेच कधीनाकधी...
" समुद्रकिनाऱ्याची...!!"
समुद्राशीच संबंधीत..तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लीहीलेल गीत...सहजच आठवलं आता...
" ने मजसी ने...परत मातृभुमीला..."
" सागरा..प्राण तळमळला...!!"
🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊🏖️🌊
©️®️
✍️...🧚♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
सावरकरांच्या कवितेच्या संदर्भ देऊन सुंदर लेखन केले मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखुपच सुंदर लेख 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखुप खुप धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय छान लेखन 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुरुवात आणि शेवटासह पुर्ण रचना छानच 🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा