माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

कहाणी सर्प जातीची..!!

🐍🐍🐍🐍  कहाणी सर्प जातीची  🐍🐍🐍🐍🐍
              🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍


आहे हि आमच्या सर्प जातीची कहाणी . . . ! !
ऐका आमची कैफियत आमची जुबाणी . . . ! !

       करतो जेव्हा आम्ही आवाज फिस्स् फिस्स् . . . ! !
       दर्शनाने आमच्या होते ना काळजात धस्स् . . . ??

किती असती रुपे आणी नावे आमची . . . ! !
का बाळगता मनी तुम्ही भीती सर्पांर्ची . . . ??

           नागपंचमीला तुम्ही आमची पूजा करता . . . ! !
           तुमच्या औषधासाठी जीव आमचा घेता . . . ! !

म्हणता हो आम्हाला शेतकऱ्यांचे मित्र . . . ! !
बघून आम्हाला गर्भगळीत होता मात्र . . . ! !

          आमच्या कातड्यांचे बेल्ट घालून मिरवता . . . ! !
         आम्ही दंश केल्यावर वाटे जीवनाची चिंता . . . ! !

नाही आम्ही पृथ्वीवरचे निरुपयोगी किटक . . . ! !
आम्ही आहोत अन्नसाखळीतले एक घटक . . . ! !

      आमचे नागराज आहेत महादेवांनाही प्रिय . . . ! !
      विषारी असण्यात सांगा आमचा दोष काय् . . . ? ?

जगु द्या आम्हांलाही शांतीने सोडा आमची भिती . . . ! !
आहे ऋणी सर्व सर्पमित्रांची आमची सर्प प्रजाती . . . ! !

🐍🐍🐍🙏🐍🐍🐍🙏🧚🏻‍♀️🙏🐍🐍🐍🙏🐍🐍🐍
  

©️®️                                        

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )


                        


७ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे फूस फूस

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिमच लिहिलंय...खूप सुंदर विषय👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खरच सर्प मित्रांनमुळे किती तरी सर्पांना जिवदान मिळालाय

    छान रचना केलीयस ✍✍👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. मस्त लिहिलंय मॅडम! जगा आणि जगू द्या! सुंदर रचना!👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...