🐍🐍🐍🐍 कहाणी सर्प जातीची 🐍🐍🐍🐍🐍
🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍
आहे हि आमच्या सर्प जातीची कहाणी . . . ! !
ऐका आमची कैफियत आमची जुबाणी . . . ! !
करतो जेव्हा आम्ही आवाज फिस्स् फिस्स् . . . ! !
दर्शनाने आमच्या होते ना काळजात धस्स् . . . ??
किती असती रुपे आणी नावे आमची . . . ! !
का बाळगता मनी तुम्ही भीती सर्पांर्ची . . . ??
नागपंचमीला तुम्ही आमची पूजा करता . . . ! !
तुमच्या औषधासाठी जीव आमचा घेता . . . ! !
म्हणता हो आम्हाला शेतकऱ्यांचे मित्र . . . ! !
बघून आम्हाला गर्भगळीत होता मात्र . . . ! !
आमच्या कातड्यांचे बेल्ट घालून मिरवता . . . ! !
आम्ही दंश केल्यावर वाटे जीवनाची चिंता . . . ! !
नाही आम्ही पृथ्वीवरचे निरुपयोगी किटक . . . ! !
आम्ही आहोत अन्नसाखळीतले एक घटक . . . ! !
आमचे नागराज आहेत महादेवांनाही प्रिय . . . ! !
विषारी असण्यात सांगा आमचा दोष काय् . . . ? ?
जगु द्या आम्हांलाही शांतीने सोडा आमची भिती . . . ! !
आहे ऋणी सर्व सर्पमित्रांची आमची सर्प प्रजाती . . . ! !
🐍🐍🐍🙏🐍🐍🐍🙏🧚🏻♀️🙏🐍🐍🐍🙏🐍🐍🐍
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुप सुंदर.... 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे फूस फूस
उत्तर द्याहटवाअप्रतिमच लिहिलंय...खूप सुंदर विषय👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाबापरे छानच लिहिलंय
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर ओवी..
उत्तर द्याहटवाखरच सर्प मित्रांनमुळे किती तरी सर्पांना जिवदान मिळालाय
उत्तर द्याहटवाछान रचना केलीयस ✍✍👌👌👌👌
मस्त लिहिलंय मॅडम! जगा आणि जगू द्या! सुंदर रचना!👌👌👌👌
उत्तर द्याहटवा