माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

हसणं तुझं ( पंचाक्षरी काव्यरचना )

हसणं तुझं
घायाळ करी
पाहता तुला
धडकी ऊरी

वाहुन गेली
खुप आसवं
सांग सजनी
कसं जगावं

मधाळ हसु
जीवच घेई
बघुन तुला
हुरुप येई

जग दोघांचं
आहे सुंदर
नकोच त्यात
अश्रुंची भर

मिळुन राहु
दोघे आपण
आलाय बघ
दिवाळी सण

🥰🥰🥰🥰🥰🥰

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!


८ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...